आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिणेत लागला नाही 'या' अभिनेत्रींचा टिकाव:कतरिनापासून प्रियांकापर्यंत, बॉलिवूड अभिनेत्रींना साऊथ चित्रपटांमध्ये दाखवला आली नाही कमाल

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या अशा अभिनेत्रींबद्दल ज्या बॉलिवूडमध्ये हिट पण दक्षिणेत ठरल्या फ्लॉप -

साऊथचे सिनेमे आणि स्टार्स बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालत आहेत. श्रीदेवीपासून समंथापर्यंत अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये जलवा कायम राहिल्या. तर दुसरीकडे मात्र बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नशीब आजमावले, पण त्यांना यश मिळू शकले नाही आणि त्यांचे चित्रपट फ्लॉप ठरले. या यादीत प्रियांका चोप्रा आणि कतरिनाच्या नावाचाही समावेश आहे. चला तर मग आज एक नजर टाकूया अशाच काही अभिनेत्रींवर ज्या बॉलिवूडमध्ये हिट पण दक्षिणेत ठरल्या फ्लॉप -

प्रियांका चोप्रा

​​​​​​

प्रियांका चोप्राने तामिळ चित्रपट 'थमिझन'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण साऊथ इंडस्ट्रीमध्ये पीसीला हवे तसे स्थान मिळू शकले नाही. त्यानंतर पीसीने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळला. नंतर, बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव जोडले गेले. त्यानंतर पीसीने जंजीर आणि तुफान चित्रपटांद्वारे पुन्हा आपले नशीब आजमावले. जंजीरमध्ये प्रियांकासोबत साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार रामचरण तेजा झळकला होता. 'जंजीर' 2013 मध्ये रिलीज झाला होता. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. पण हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही आणि फ्लॉप झाला. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत ठसा उमटवणारी प्रियांका चोप्रा साऊथ इंडस्ट्रीत मात्र चांगली कामगिरी करु शकली नाही.

कतरिना कैफ

कतरिना कैफने 2004 मध्ये 'मल्लिस्वरी' चित्रपटाद्वारे तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. या चित्रपटाचे खूप कौतुकही झाले होते. या चित्रपटानंतर ती तेलुगु चित्रपट 'अल्लरी पिदुगु' आणि मल्याळम चित्रपट 'बलराम Vs थरदास' मध्ये देखील काम केले. मात्र असे असूनही कतरिना कैफची जादू साऊथ चित्रपटसृष्टीत चालू शकली नाही.

बिपासा बसू

महेश बाबू, लिसा रे आणि बिपाशा बसू यांनी 'टक्करी दोंग' चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या, परंतु, चित्रपटात इतकी मोठी नावे असूनही, बॉक्स ऑफिसवर याला फारच चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि चित्रपट फ्लॉप ठरला. तेव्हापासून बिपाशाने प्रादेशिक चित्रपट करणे बंद केले.

ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्नाने बॉलिवूडमध्ये 'मेला' आणि 'इंटरनॅशनल खिलाडी'सारखे अनेक चित्रपट केले. पण तिचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले. यानंतर तिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीत हात आजमावला आणिदग्गुबती व्यंकटेशसोबत 'सीनू' चित्रपटात काम केले. हा चित्रपट हिट ठरला होता. पण ट्विंकलचे नाव साऊथ सिनेसृष्टीत प्रसिद्ध होऊ शकले नाही. यामुळे ट्विंकलने पुढे कोणत्याही दक्षिण भारतीय चित्रपटात काम केले नाही.

अमृता राव

अमृता रावने तेलुगू इंडस्ट्रीत 'अथिदी' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटात ती महेश बाबूसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि त्यानंतर अमृताने स्वत:ला साऊथ इंडस्ट्रीपासून दूर केले.

मनीषा कोईराला

महेश भट्ट दिग्दर्शित 'क्रिमिनल' या चित्रपटात मनीषा कोईराला अभिनेते नागार्जुन आणि राम्या कृष्णासोबत दिसली होती. या चित्रपटात मनीषाने दाक्षिणात्य कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती. यानंतर तिने काही साऊथ चित्रपट केले पण, तिने बॉलिवूडमध्ये जसा आपला ठसा उमटवला तेवढी साऊथ चित्रपटांमध्ये ती लोकप्रिय होऊ शकली नाही.

आयशा टाकिया

आयशा अभिनेता नागार्जुन अक्किनेनी, सोनू सूद, अनुष्का शेट्टी यांच्यासोबत 'रॉबरी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. मात्र, या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटातून आयशा साऊथ इंडस्ट्रीत स्थिरावू शकली नाही. यानंतर अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीपासून दुरावली.

शमिता शेट्टी

​​​

शमिता शेट्टीने 2002 मध्ये आलेल्या 'राज्जियम' या चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटानंतर शमिता साऊथ इंडस्ट्रीच्या कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

बातम्या आणखी आहेत...