आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहित आहे का?:मुंबईत इंदिरा गांधींना मिळाला नव्हता हॉल, तेव्हा बॉलिवूडने केली होती त्यांना मदत; वाचा हे खास किस्से

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची 103 वी जयंती आहे.

आणीबाणीनंतर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इंदिरा गांधी यांना मुंबईत (तेव्हा बम्बई) पत्रकार परिषदेसाठी कुठलेही हॉटेल जागा देण्यास तयार नव्हते. तेव्हा सुनील दत्त आणि राज कपूर त्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते. 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची 103 वी जयंती आहे. यानिमित्ताने दिव्य मराठीने प्रसिद्ध चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसेंसोबत बातचित केली असता, त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. चौकसे यांनी सांगितल्याप्रमाणे, वरील फोटो त्याकाळात सहारा हॉटेलच्या लॉनमध्ये क्लिक झालेला होता.

राज बब्बर यांनी काही वर्षांपूर्वी पोस्ट केला होता फोटो
काही वर्षांपूर्वी राज बब्बर यांनी इंदिरा गांधी आणि फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गजांचा एक फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. तेव्हा हा फोटो बराच व्हायरल झाला होता. मात्र हा फोटो कधी आणि कुठे क्लिक झाला होता, याविषयीची माहिती समोर आली नव्हती. चौकसे यांनी हा फोटो कधी आणि कुठचा आहे, याविषयीची माहिती दिली. चौकसे यांनी सांगितल्याप्रमाणे इंदिरा गांधी नसत्या तर रिचर्ड एटेनबरो यांचा सिनेमा ‘गांधी’ कधी बनू शकला नसता.

चौकसे सांगतात, आणीबाणीनंतर जेव्हा इंदिरा गांधी निवडणुक हरल्या होता. त्यानंतर 1977 मध्ये त्यांचे मुंबईत येण्याचे निश्चित झाले होते. येथे त्यांना एक पत्रकार परिषद घ्यायची होती. मात्र कुठेही त्यांना जागा मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी सुनील दत्त यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यास सांगितले. सुनील दत्त इंदिरा यांच्या जवळचे होते. त्यांनी दिलेल्या तिकिटावरच ते निवडणुक लढले होते. सुनील दत्त यांनी राजकपूर आणि दिलीप कुमार यांच्याशी चर्चा केली, "हे जे सरकार (मोरारजी देसाई सरकार) आले आहे, यामध्ये इंदिरा गांधी यांना प्रेस कॉन्फरन्साठी मुंबईत कुठेही हॉल उपलब्ध होत नाहीये. प्रत्येक जण बुकिंगचा बहाणा पुढे करत आहेत, काय करु? तेव्हा राज कपूर म्हणाले, काळजी करु नका, एअरपोर्टसमोर जे सहारा हॉटेल आहे, मी तिथे माझ्या नावाने बुकिंग करुन देतो, तेथेच प्रेस कान्फरन्स होईल." अशाप्रकारे या सहारा हॉटेलमध्ये इंदिरा गांधीनी पत्रकार परिषद घेतली होती. चौकसे सांगतात, हा त्याकाळातीलच फोटो आहे. सहारा हॉटेलच्या लॉनमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील सर्व दिग्गज एकत्र आले होते. हा क्षण त्यावेळी कॅमे-यात कैद झाला होता.

धावत-धावत इंदिरा गांधींच्या पार्टीत पोहोचले होते राज कपूर
चौकसे सांगतात, दिलीप कुमार यांनी इंदिरा गांधींसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी राज साहेब (राज कपूर) चेन्नईत दाक्षिणात्य सिनेमा 'नजराना'चे शूटिंग करत होते. दिलीप यांनी त्यांना फोन करुन 'तुमचे पार्टीत उपस्थित राहणे गरजेचे आहे', असे सांगितले होते. मात्र राज कपूर यांची फ्लाइट मिस झाली. दुसरी फ्लाइट घेऊन ते मुंबईत दाखल झाले, मात्र त्यांना पोहोचायला उशीर झाला होता, पार्टी संपत आली होती. राज कपूर धावत-धावत पोहोचले, तेव्हा दिलीप साहेब म्हणाले होते, 'मी तुला बालपणापासून ओळखतोय, तुझी उशीरा येण्याची सवय काही जाणार नाही.' चौकसे सांगतात, दिलीप कुमार आणि राज कपूर एकमेकांना प्रेमाने लाले म्हणून हाक मारायचे. दोघेही पेशावरी पठान असून एकाच गल्लीत समोरासमोर राहायचे. त्यांची नेहमीच घनिष्ठ मैत्री राहिली होती. त्यांच्याविरोधात वृत्तपत्रांमध्ये भांडणाच्या चुकीच्या बातम्यासुद्धा प्रकाशित झाल्या होत्या.

नेहरु यांचे पाहुणे असायचे फिल्म स्टार्स, होस्ट इंदिरा
दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर नेहरु यांच्या जवळचे होते. चौकसे सांगतात, की नेहरु नेहमीच या तिघांना दिल्लीत बोलावत असे. त्यांच्या प्रेरणेवरुन अनेक सिनेमेसुद्धा बनले आहेत. नेहरुजींच्या घरी नेहमीच फिल्म स्टार्स पाहुणे म्हणून येत असत. इंदिरा गांधी त्यांच्या होस्ट असायच्या. सगळ्यांचे इंदाराजींसोबतही खूप चांगले संबंध होते.

इंदिरा नसत्या तर बनला नसता एटेनबरो यांचा 'गांधी' सिनेमा
चौकसे सांगतात, जर इंदिरा गांधींनी मदत केली नसती तर रिचर्ड एटेनबरो यांचा 'गांधी' हा सिनेमा पुर्ण होऊ शकला नसता. ते सांगतात, गांधी सिनेमाची स्क्रिप्ट नेहरुंनी वाचली होती. त्यांनी काही बदलही सुचवले होते. नेहरुजींनी म्हटले होते, की महात्मा गांधींवर ऑथेंटिक सिनेमा यायला हवा. एटेनबरो परत गेले. काही काळ त्यांनी भारत सरकारसोबत संपर्क साधला नाही. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात 1980 मध्ये रिचर्ड यांनी पुन्हा एकदा फायनल ड्राफ्ट इंदिरा गांधींसमोर सादर केला. इंदिरा संतुष्ट झाल्या आणि त्यांनी NFDC ला रिचर्ड यांना हवी ती मदत देण्यास सांगितले. इतकेच नाही तर सिनेमाच्या निर्मितीतही सहभागी होण्याचा सल्ला त्यांनी NFDC दिला. त्यामुळे एनएफडीसी प्रॉफिट शेअरिंगमध्ये पार्टनर झाले.

एनएफडीसीने शूटिंगमध्ये संपूर्ण मदत केली. इतकेच नाही तर सिनेमासाठी रेल्वे कम्पार्टमेंट/ट्रेनची निर्मितीसुद्धा केली. त्यांना नफ्यात भागीदारी मिळाली. इंदिरा यांच्या पाठिंब्यामुळे हा सिनेमा पुर्ण झाला. प्रेक्षकांचाही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. चौकसे सांगतात. जेव्हा अंत्यसंस्काराचे शूटिंग होणार होते. तेव्हा रिचर्ड एटेनबरो यांनी घोषणा केली, की जास्तीत जास्त लोकांनी साधे कपडे परिधान करुन शूटिंगमध्ये सहभागी व्हावे. त्यामुळे लाखो लोक शूटिंगमध्ये आले होते. त्यामुळे सिनेमाचा सिक्वेन्स अगदी ख-याखु-या फ्युनरलसारखा वाटतो.

सिनेमात काम करणार होते नेहरु, इंदिराजींनी मागितली होती माफी
चौकसे सांगतात, जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा यांना सिनेमात रुची होती. लंडनमध्ये शिकत असताना त्यांनी अनेक सिनेमे पाहिले होते. भारतातील पहिला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (1951)मध्ये त्यांनीच आयोजित केला होता. फिल्ममेकर केवळ हॉलिवूडच्या सिनेमांनी प्रभावित होऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी जापान, जर्मनीसह इतर देशांचे सिनेमेही बघावेत. 'दो बीघा जमीन', 'बूट पॉलिश' हे सिनेमे बनले. अब दिल्ली दूर नहीं या सिनेमात नेहरुजींचा सहभाग होता. नेहरुजींनीच राज कपूर यांना म्हटले होते, 'भारतात मुलांना केंद्रस्थानी ठेऊन सिनेमे फार कमी तयार होता. माझी इच्छा आहे. की भारतीय फिल्ममेकर्सनी याकडे अधिक लक्ष द्यावे.'

जेव्हा 'दिल्ली दूर नहीं'ची कथा बनली आणि नेहरुजींना त्याची कथा ऐकवण्यात आली. तेव्हा या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. क्लायमॅक्समध्ये गावातील एक मुलगा पंतप्रधानांकडे त्याच्या वडिलांसाठी न्याय मागतो.

नेहरुजींनी सांगितले, मी तुम्हाला माझे दोन दिवस देईल. त्यादिवशी शूटिंग करु. नेहरुजी सिनेमात काम करणार म्हणून उत्साहात राज कपूर यांनी सिनेमा बनवला. मात्र जेव्हा क्लायमॅक्सच्या शूटिंगची वेळ आली तेव्हा इंदिराजींनी राज कपूर यांना म्हटले, 'भारताच्या पंतप्रधानाने सिनेमात काम करु नये, यासाठी मोरारजी देसाईंनी खूप दबाव आणलाय. त्यांनी हा मोठा मुद्दा बनवला होता. नेहरुजी कुठल्याही वादात अडकू इच्छित नाहीत. त्यांच्यासमोर देशातील इतर मोठ्या समस्या आहेत. मी तुमची माफी मागते.' राजकपूर यांनी म्हटले, 'काही हरकत नाही. मी फिल्म डिविजनमधून शॉट्स घेऊन सिनेमा पूर्ण करेल.'

बातम्या आणखी आहेत...