आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतचा पहिला स्मृतीदिन:ट्रेड अ‍ॅनालिस्ट सांगतात - सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या एक वर्षानंतरही निर्मात्यांना त्यांच्या आगामी 10 चित्रपटांसाठी पर्याय मिळालेले नाहीत

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरुण, सिद्धार्थ असलेल्या युवा ब्रिगेडच्या लीगमध्ये होता सुशांत : अतुल मोहन

आज सुशांत सिंह राजपूतचा पहिला स्मृतीदिन आहे. गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांतने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आजही त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. सुशांत एक उत्कृष्ट कलाकार होता. अभिनयाच्या बळावर त्याने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. निर्माते त्याला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सुक असायचे. चित्रपटसृष्टीत त्याला बरीच मागणी होती याबद्दल शंका नाही. व्यापार विश्लेषकही याला दुजोरा देतात. सुशांतच्या हातात बरेच प्रोजेक्ट्स होते. विशेष म्हणजे त्याच्या हातात जे 10 चित्रपट होते, त्यासाठी अद्याप निर्मात्यांना रिप्लेसमेंट मिळू शकलेले नाहीत.

रमेश तोरानी सुशांतसोबत अ‍ॅक्शन चित्रपट बनवणार होते
निधनाच्या एक दिवस आधी सुशांतची रमेश तोरानी यांच्याशी एका चित्रपटाविषयी चर्चा झाली होती. निखिल अडवाणीही या चित्रपटाची सहनिर्मिती करणार होते. सुशांतच्या निधनानंतर या चित्रपटात ते कुणाला घेणार हे अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. हा एक अॅक्शन चित्रपट होता, असे रमेश तौरानी यांनी सांगितले होते.

रुमी जाफरी, संदीप सिंह, शेखर कपूर यांच्यासह चित्रपट करणार होता सुशांत
रूमी जाफरीदेखील सुशांतसोबत अ‍ॅक्शन थ्रिलर बनवणार होते. हा चित्रपट काहीसा अल्फ्रेड हिचकॉकच्या जोनचा होता. वाशू भगनानी याचे निर्माते होते. चित्रपटात रिया चक्रवर्ती मुख्य भूमिका साकारणार होती. रुमी अद्याप सुशांतच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांचा चित्रपट अजूनही अडकला आहे. संदीप सिंहने सुशांतसोबत 'वंदे मातरम्' ची घोषणा केली होती. शेखर कपूरच्या 'पानी' या चित्रपटाच्या नायकाच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.

सुशांत या निर्मात्यांसोबतही करणार होता चित्रपट
व्यापार विश्लेषकांनी सांगितले, 'धोनी' या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांनी एका दाक्षिणात्य चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते. हा चित्रपट ते सुशांतसोबत करणार होते. संदीप सिंहने सुशांतसोबत 'वंदे मातरम्'ची घोषणा केली होती. विक्रम मल्होत्रा ​​त्याच्यासोबत 'रायफलमॅन' बनवणार होते. आतापर्यंत या चित्रपटांसंदर्भात पुढील वृत्त आलेले नाही. याशिवाय कुमार मंगत पाठक सुशांत आणि कार्तिक यांच्यासह एका लव्ह स्टोरीवर आधारित चित्रपटाची योजना आखत होते. सध्या तो चित्रपटही फ्लोअरवर आलेला नाही. रसूल पुकट्टी या चित्रपटाचे निर्माते होते. आनंद गांधी सुशांतसोबत 'इमरजेंस' नावाच्या चित्रपटासाठी डिल करणार होते. यासह ते आणखी दोन चित्रपटांसाठी चर्चा करत होते. 'इमरजेंस' हा चित्रपट महामारीवर आधारित होता. बाकीच्या दोन चित्रपटाचा तपशील अजून आला नव्हता.

वरुण, सिद्धार्थ असलेल्या युवा ब्रिगेडच्या लीगमध्ये होता सुशांत : अतुल मोहन
अतुल मोहन सांगतात, सुशांतने त्याच्या कारकीर्दीत फक्त 9 चित्रपट केले. तो अतिशय चुझी होता. या 9 चित्रपटांमध्ये त्याचे 'छिछोरे' आणि 'धोनी' हे दोन चित्रपट 100 कोटी क्लबच्या वरचे होते. 'पीके'मध्ये सुशांतचा कॅमिओ होता. तो चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये होता. त्याचे श्रेय खरं तर आमिर खानला जाते, पण चित्रपटातील सुशांतच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ट्रेडच्या भाषेत सांगायचे झाल्यास, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा असलेल्या स्टार पॉवरच्या लीगमध्ये तो होता. त्याची खास गोष्ट अशी की, तो निर्णय घेताना घाई करत नसे. 'धोनी' बायोपिकनंतर तो बरेच चित्रपट साइन करू शकला असता, पण तो थांबला. इंडस्ट्रीत स्टार पॉवर असलेले कलाकार कमी आहेत. सुशांतच्या जाण्याने रिक्त जागा तयार झाली आहे. सुशांत नवीन निर्मात्यांबरोबरही काम करत असे. सुशांतचे 'सोनचिडिया' आणि 'ड्राइव्ह' हे चित्रपट चालले नाहीत, पण त्याची ब्रँड व्हॅल्यू जास्त होती.

बातम्या आणखी आहेत...