आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याची ट्रॅजिक लाइफ:या बॉलिवूड अभिनेत्याच्या वाढदिवशीच संपले होते त्याचे संपूर्ण कुटुंब, वडिलांनीच आई आणि बहिणीची हत्या करुन केली होती आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 व्या वाढदिवशी घडलेली घटना आठवली की आजही त्याच्या अंगावर शहारे उभे राहतात.

नव्वदच्या दशकात 'बेखुदी' या चित्रपटातील काजोलसोबत मोठ्या पडद्यावर झळकलेला अभिनेता कमल सदानाला कदाचितच लोक आता ओळखत असावेत. या अभिनेत्याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 ऑक्टोबर 1970 रोजी जन्मलेल्या कमलच्या वाढदिवशीच अशी एक घटना घडली जो तो कधीही विसरु शकत नाही. 20 व्या वाढदिवशी घडलेली घटना आठवली की आजही त्याच्या अंगावर शहारे उभे राहतात.

वडिलांनी उचलले होते टोकाचे पाऊल

कमल सदानाचे वडील ब्रिज सदाना
कमल सदानाचे वडील ब्रिज सदाना

21 ऑक्टोबर 1990 रोजी कमल आपल्या 20 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत मग्न होता. तेव्हाच अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. कमलच्या वाढदिवशी त्याचे वडील ब्रिज सदाना यांनी त्याची आई आणि बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली होती. कमल दुस-या खोलीत असताना अचानक त्याला बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकू आला. तो धावत दुस-या खोलीत गेला, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याची आई सईदा खान आणि बहीण नम्रता यांच्यावर गोळी झाडली होती. कमलने सांगितल्यानुसार, त्याच्या वडिलांनी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण तो कसाबसा वाचला. या घटनेनंतर कमलच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. कमलच्या आईवडिलांचे नेहमीच खटके उडत असत. ही संपूर्ण घटना कमलच्या डोळ्यासमोर घडली. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले होते.

'बेखुदी' मध्ये काजोल सोबत कमल.
'बेखुदी' मध्ये काजोल सोबत कमल.

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत कमलने या घटनेचा उल्लेख करताना वडिलांनी असे भयानक पाऊल का उचलले याचे मुळ कारण आजपर्यंत माहित नसल्याचे म्हटले होते. कमलने सांगितल्यानुसार, त्यांची परिस्थिती हलाखीची नव्हती. वडिलांनी प्रॉपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती, त्यामुळे पैशांची अडचण नव्हती. मात्र आईवडिलांचे सतत खटके उडत असल्याचे त्याने सांगितले होते.

कमलचे वडील ब्रिज बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी 'दो भाई', 'ये रात फिर ना आयेगी', 'उस्तादों के उस्ताद', 'व्हिक्टोरिया नंबर 203', 'प्रोफेसर प्यारेलाल' यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.

कमलने 1992 मध्ये केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण
1990 मध्ये कुटुंब संपल्यानंतर कमलने 'बेखुदी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1993 मध्ये आलेल्या दिव्या भारतीसोबतच्या ‘रंग’ या चित्रपटाला जबरदस्त यश मिळाले, पण या चित्रपटानंतर कमलची बॉलिवूड कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. चित्रपटसृष्टीतील फ्लॉप करिअरमुळे त्याने अभिनयाला रामराम ठोकला.

2006 मध्ये लोकप्रिय टीव्ही मालिका 'कसम से' मधून त्याने पुनरागमन केले. शिवाय 2014 मध्ये त्याने 'रोरो : टायगर्स ऑफ सुंदरबन' नावाचा चित्रपट बनवला होता, ज्याची कथा त्याने स्वत: लिहिली होती.

बातम्या आणखी आहेत...