आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेझॉन मिनी टीव्हीची पहिली वेब सीरिज:मल्टीस्टारर 'काली पीली टेल्स'चा ट्रेलर लाँच, मुंबई शहरातील प्रेम, नाती आणि जीवनाचा विस्तृत पट रंगवणारी वेब सीरिज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'काली पीली टेल्स' हीअमेझॉन मिनी टीवीची पहली मल्टी-स्टारर वेब सीरिज आहे.

अमेझॉनची मोफत व्हिडीओ मनोरंजन सेवा– मिनी टीव्हीने एका आकर्षक ट्रेलरच्या लाँचसह आपली पहिली कथामालिका, काली पीली टेल्सच्या एक्सक्लूसिव प्रीमिअरची घोषणा केली आहे. येत्या 20 ऑगस्ट रोजी ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. मैडमिडास फिल्म्सचे अदीब रईस यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या 'काली पीली टेल्स' मध्ये मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर सहा छोट्या छोट्या कथांचा अतिशय मनोरंजक कथापट मांडण्यात येणार आहे.

‘काली पीली टेल्स’मधून मुंबई शहरातील प्रेम, नातेसंबंध आणि जीवनाच्या जटिलतेला उत्तम प्रकारे दर्शवण्यात आले आहे. यातील सहा अनोख्या कहाण्यांचे कथानक परिवर्तन आणि स्वीकृतिच्या सीमारेषेवर उभे असणाऱ्या तरुणांच्या आणि इथल्या शहरी व्यक्तिरेखांच्या आस पास फिरणारे आहे, यामध्ये विनय पाठक, गौहर खान, सयानी गुप्ता, मानवी गगरू, सोनी राजदान, हुसैन दलाल, शारिब हाशमी, प्रियांक्षी पेन्युली, तन्मय धनानिया, सादिया सिद्दीकी आणि अदीब रईस यांसारखे दिग्गज कलाकार असणार आहेत.

या वेब सीरिजमधील प्रत्येक कथापट प्रणय, विवाह, धोका, समलैंगिकता, माफी आणि घटस्फोट या विषयांवर केंद्रित असून महानगरीय जीवनातील आणि सध्याच्या डिजिटल युगातील अनिश्चिततेला लक्षात घेऊन, आपापसातील नातेसंबंधांना पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून सादर करते. काली पीली टॅक्सी ही मुंबईची ओळख आहे आणि वेब सीरिजमधील कथांना जोडणारा दुआदेखील आहे. सिंगल झुमका, लव्ह इन ताडोबा, मॅरेज 2.0, फिश फ्राय और कॉफी, हरा भरा आणि लूज एंड्स ही या कथांची शीर्षके आहेत.

काली पीली टेल्सचे दिग्दर्शक अदीब रईस म्हणाले की, “या कथासंग्रहातील सर्व सहा कथा प्रेमाच्या आणि नात्यांच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात. नवीन प्रेमापासून ते विवाहित जीवनाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत, प्रेमातील धोका इथपासून घटस्फोटापर्यंत, त्याची प्रत्येक कथा प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांनी भरलेल्या मजेदार प्रवासात घेऊन जाईल. नामांकित कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीसह, मुंबई शहर या प्रत्येक कथेमध्ये एक मनोरंजक आयाम जोडणारे ठरते.”

बातम्या आणखी आहेत...