आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफचा आगामी चित्रपट:15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होऊ शकते 'भूत पोलिस’चे ट्रेलर! भूत पळवणाऱ्या बाबांच्या भूमिकेत दिसणार सैफ-अर्जुन कपूर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाची कथा उत्तर भारतावर आधारित आहे.

सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका असलेल्या “भूत पोलिस” चित्रपटाचे ट्रेलर 15 ऑगस्ट रोजी रिलीज होऊ शकते. निर्माते त्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. आधी या चित्रपटाचे डिजिटल अधिकार 60 कोटींना विकल्याचे आणि या चित्रपटाचे बजेट 40 कोटी असल्याची बातमी आधी आली होती.

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर याचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे आणि रमेश तौरानी, ​​अक्षय पुरी आणि जया तौरानी यांनी मिळून निर्मिती केली आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. त्याची कथा उत्तर भारतावर आधारित आहे. यामध्ये अर्जुन आणि सैफ भूत पळवणाऱ्या बाबांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गेल्या महिन्यात करीना कपूरने इंस्टाग्रामवर सैफच्या पात्राचे फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये सैफने ब्लॅक शर्टवर लेदर जॅकेट घातले आहे. सैफचे पात्र सांगताना करीनाने पोस्टमध्ये लिहिले होते...‘पॅरानॉर्मल से डरें नहीं, ‘विभूती’ के साथ महसूस करें ‘सैफ’ (सेफ). ‘भूत पुलिस’ लवकच येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार वर.'

बातम्या आणखी आहेत...