आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर रिलीज:इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स शोमध्ये झळकणार अजय देवगण, म्हणाला - हा कोणता खेळ नाहीये भावा!

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा एपिसोड 22 ऑक्टोबरला डिस्कव्हरी प्लसवर प्रसारित केला जाणार आहे.

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्यानंतर आता अजय देवगण 'इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' या प्रसिद्ध शोमध्ये दिसणार आहे. या स्पेशल एपिसोडचा टीझर मंगळवारी रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये अजय देवगण आणि बेअर ग्रिल्स एकत्रितपणे धोक्यांचा सामना करत रोमांच आणि धाडसी कृत्यांच्या प्रवासाला निघणार आहेत. या शोचा प्रीमिअर येत्या 22 ऑक्टोबर रोजी डिस्कव्हरी प्लसवर सकाळी सहा वाजता होणार आहे.

मी नशीबवान आहे की मला ही संधी मिळाली - अजय
सोशल मीडियावर टीझर शेअर करुन अजय देवगण म्हणाला की, 'जोपर्यंत तुम्ही जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे मी हे केले आहे. बेअर ग्रिल्ससोबत हिंदी महासागरातील निर्जन बेटांना एक्स्प्लोअर केले. हा कोणता खेळ नाहीये भावा! Into The Wild मधील कधी न विसरता येणाऱ्या आमच्या प्रवासाची ही काही क्षणचित्रे.'

शूटिंगच्या अनुभवाविषयी अजय म्हणतो, “जंगलातील ही माझी पहिली मोहीम आहे. माझे वडील अ‍ॅक्शन डायरेक्टर होते आणि इंडस्ट्रीत 30 वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत मला काही धोकादायक अ‍ॅक्शननसह अनेक भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मला खूप आनंद झाला की मला ही संधी मिळाली, यामुळे मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास आणि पुढे जाण्यास मदत झाली."

अजय आणि विकी एकाच भागात एकत्र दिसणार नाहीत
अजय देवगण नंतर विकी कौशल भारताचा पाचवा सेलिब्रिटी आहे ज्याने या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले आहे. डिस्कव्हरी चॅनलने खुलासा केला होता की, अजय आणि विकी एकाच भागात एकत्र दिसणआर नाहीत. गेल्या वेळी अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी बेअर ग्रिल्ससोबत शूट केले होते. त्यावेळी शूटिंग भारतातच झाले होते. सर्व भाग डिस्कव्हरी प्लस अ‍ॅपवर उपलब्ध असतील.

ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांमध्ये त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये अजय आणि बेअर ग्रिल्स जंगल आणि हिंदी महासागराच्या उसळत्या लाटांवर धोक्याचा सामना करताना दिसत आहे. सप्टेंबरमध्ये हा एपिसोड मालदीवमध्ये शूट करण्यात आला होता. मालदीवमध्ये अजय देवगणचा मुलगा युग आणि त्याची टीम उपस्थित होती.

अजयचे आगामी प्रोजेक्ट्स अजय देवगणने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून बेअर ग्रिल्ससोबत शूटिंग केले आहे. अजय अलीकडेच 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसला होता. याशिवाय तो आरआरआर, मैदान आणि मेडे सारख्या अनेक प्रोजेक्टचा एक भाग आहे. अजय देवगण 'रुद्र' या वेब सीरिजद्वारे वेब स्पेसमध्येही पदार्पण करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...