आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाबाश मिठू:मिताली राजचा बायोपिक 'शाबाश मिठू'चा ट्रेलर रिलीज, क्रिकेटरच्या भूमिकेत तापसी पन्नू

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पहा...

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिचा बायोपिक 'शाबाश मिठू'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये मितालीचा संघर्ष आणि यशापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात मितालीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नूने साकारली आहे. मितालीच्या संघर्षाची आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळात तिने कसा प्रवेश केला याची कथा आहे. या भूमिकेसाठी तापसीने खूप मेहनत घेतली आहे. श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 15 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे लेखन प्रिया अवन यांनी केले असून वायाकॉम 18 ने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...