आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Trailer Release Of Shweta Basu Prasad's 'Jamun' With Teaser Of Manoj Bajpayee's 'The Family Man 2' And Parineeti Chopra's 'The Girl On Train'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेब सीरिज-फिल्मचे टीझर रिलीज:मनोज बाजपेयीचा 'द फॅमिली मॅन 2' आणि परिणीती चोप्राच्या 'द गर्ल ऑन ट्रेन'च्या टीझरसह श्वेता बसू प्रसादच्या 'जामून'चा ट्रेलर रिलीज

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या हे सर्व टीझर सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
  • परिणीती चोप्राच्या आगामी 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटाचा टीझर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच ‘द गर्ल ऑन ट्रेन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट 26 फेब्रुवारी 2021 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात परिणीती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या 20 सेकंदाच्या टीझरमध्ये परिणीतीचा अभिनय पाहण्यासारखा आहे. या चित्रपटात परिणीतीच्या भूतकाळाचा भविष्यावर परिणाम होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. टीझर प्रदर्शित होताच परिणीतीने चित्रपटातील एक पोस्टर देखील शेअर केले आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत अदिती हैदरी, क्रिती कुल्हारी आणि अविनाष तिवारी देखील भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी ‘द गर्ल ऑन ट्रेन’ हा चित्रपट 8 मे 2020 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता.

  • मनोज बाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन' सीझन 2 चा टीझर रिलीज

अभिनेता मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनचे बरेच कौतुक झाले होते. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजच्या एक मिनिट सहा सेकंदाच्या टीझरमध्ये श्रीकांत म्हणजे मनोज बाजपेयीच्या आयुष्यात अडचणी असल्याचे पाहायला मिळते. तसेच सर्वजण तो गायब असल्याचे बोलताना दिसत आहेत. टीझरच्या शेवटी मनोज बाजपेयीची झलक पाहायला मिळते.

‘द फॅमिली मॅन 2’ ही सीरिज 12 फेब्रुवारी 2021 मध्ये अॅमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणी, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

  • 'जामून'चा ट्रेलर झाला रिलीज

दिग्दर्शक गौरव मेहराच्या आगामी जामून या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या लाइफ ड्रामा चित्रपटात रघुबीर यादव, श्वेता बसू प्रसाद, सनी, हिंदुजा, सौरभ गोयल आणि कृष्णा बिष्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 21 जानेवारी रोजी eros now वर रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा वडील-मुलीच्या नातेसंबंधावर आधारित आहे.

बातम्या आणखी आहेत...