आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. एवढंच नाही तर तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी कंगनाला तीव्र शब्दांत सुनावले आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने योग्य वाटत असेल तिथे राहावे. तिने आपला बोरा बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोललेले आम्ही ऐकून घेणार नाही. कंगनाने आपले बस्तान उचलावे हेच योग्य ठरेल, अशा शब्दांत अनिल परब यांनी इशारा दिला आहे.
पुढे अनिल परब म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फक्त कंगनालाच का भेटावे, मुंबईत इतरही गरीबांची अनधिकृत बांधकामं पडत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या गरीबांनाही भेटले पाहिजे, अशा टोला देखील त्यांनी लगावला.
'कंगना रनोट स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असं म्हणतात. तिला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे, डॉक्टर नाही भेटले तर शिवसेना मदत करेल. शिवसेना कंगनाला काही बंदी घालणार नाही ती महत्वाची नाही. अशा अनेक कंगना आल्या आणि गेल्या', असेदेखील अनिल परब म्हणाले आहेत.
मनालीला परतली कंगना
दरम्यान, कंगना आज म्हणजे 14 सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईहून मनालीला परतली आहे. पण मुंबई सोडण्यापूर्वी तिने पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला. 'जेव्हा रक्षकच हे भक्षक झाल्याचे दाखवत आहे, त्यामुळे तेच लोकशाहीचे चीरहरण करत आहे. मला कमकुवत समजून त्यांनी मोठी चूक केली आहे', असे ट्विट तिने केले.
तसंच, त्यांना वाटलं मी एक महिला आहे. घाबरून जाईन. पण मला भीती घालवून त्यांनीच आपली प्रतिमा धुळीस मिळवली आहे, अशी टीकाही कंगनाने केली.
आपल्या आणखी एक ट्विटमध्ये कंगना म्हणाली, 'खूप जड अंतकरणाने मी मुंबई सोडत आहे. या दिवसात माझ्यावर दहशत बसवण्याचा प्रयत्न केला गेला. माझे ऑफिस तोडल्यानंतर माझे घर तोडण्याचा प्रयत्न होत आहे, माझ्याभोवती सावध सुरक्षा होती. पीओकेबद्दलचा माझा मुद्दा बरोबर होता, असे म्हणायला हरकत नाही', असे ट्विट कंगनाने केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.