आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये परततेय 'तिरछी टोपीवाली' फेम सोनम:दोन लग्ने, अंडरवर्ल्डशी संबंध, रझा मुराद यांची पुतणी; जाणून घ्या एवढी वर्षे कुठे होती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम तब्बल तीन दशकानंतर आता बॉलिवूडमध्ये परतणार असल्याचे वृत्त आहे. एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत सेक्स सिम्बॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनमने ऐन करिअर यशोशिखरावर असताना अभिनयाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. पण आता एवढ्या वर्षांनी ती इंडस्ट्रीत कमबॅक करतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनम म्हणाली की, तिला खूप अगोदरच बॉलिवूडमध्ये परतायचे होते, पण ते काही कारणाने शक्य झाले नाही.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत सोनम म्हणाली की, "मला तीन वर्षांपूर्वीच भारतात परतायचे होते. मात्र काही कारणाने ते शक्य झाले नाही. नंतर जगभरात कोविडची साथ पसरली. त्यामुळे सर्व गोष्टी पुन्हा पूर्ववत होण्यास बराच वेळ गेला. मी नेहमीच माझ्या कुटुंबासोबत राहिले. त्यामुळे आता भूतकाळातील गोष्टी भूतकाळातच सोडून द्यायला हव्यात," असे ती म्हणाली. आता लवकरच सोनम ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा वेब सीरिजमधून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.

जाणून घेऊया सोनमविषयी बरंच काही....

  • वयाच्या 16 व्या वर्षी डेब्यू..

2 सप्टेंबर 1975 रोजी मुंबईत जन्मलेल्या सोनमचे पुर्ण नाव बख्तावर मुराद खान असे आहे. अभिनेता रजा मुराद यांची सोनम पुतणी आहे. चित्रपटांसाठी तिने सोनम हे नाव निवडले. 1988 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती. सोनमने 'विजय' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. वयाच्या अवघ्या 16 वर्षी तिला यशराज बॅनरच्या 'विजय' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सोनमसाठी ही संधी एखाद्या स्वप्नापेक्षा काही कमी नव्हती.

पहिलाच चित्रपट यशराज बॅनरचा होता. शिवाय अनिल कपूर, ऋषी कपूर, मिनाक्षी शेषाद्री, राजेश खन्ना, हेमा मालिनी हे दिग्गज कलाकार या चित्रपटात तिच्यासोबत होते. त्यावेळी इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी सोनमला फारसा संघर्ष करावा लागला नव्हता. ‘त्रिदेव’, ‘मिट्टी और सोना’ या चित्रपटांतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. 1989 मध्ये 'त्रिदेव'मध्ये तिची जोडी नसीरुद्दीन शहांबरोबर जमली. त्यावेळी सोनम 17 वर्षांची तर नसीरुद्दीन शहा 38 वर्षांचे होते.

  • 'त्रिदेव'पासून सुरू झाली होती लव्ह स्टोरी..

'त्रिदेव' या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात निर्माते-दिग्दर्शक राजीव राय आणि सोनम यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तीन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. तेव्हा ती केवळ 19 वर्षांची होती. राजीव रॉय यांचा 'विश्वात्मा' हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा हे दोघे पती-पत्नी होते. सोनमच्या या निर्णयाने सर्वांना धक्का बसला होता. सोनमने विचार केला असता तर ती आणखी उंचीवर जाऊ शकली असती. परंतु, तिने राजीव आणि कौटुंबिक आयुष्याला अधिक पसंत केले होते.

  • परदेशात झाले स्थायिक

लग्नाच्या काही दिवसांनी राजीव राय यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर ते देश सोडून लॉस एंजिलिसला गेले. त्यानंतर ते स्वित्झर्लंडला स्थायिक झाले होते.

  • लग्नाच्या 15 वर्षांनी घटस्फोट आणि दुसरे लग्न

लग्नाच्या 15 वर्षांनंतर सोनम आणि राजीव यांचा घटस्फोट झाला. दोघांचा एक मुलगादेखील आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत संबंध असल्यानेच सोनम आणि तिच्या पतीचा घटस्फोट झाला असल्याचे बोलले गेले. 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. दोन वर्षांपूर्वी सोनमने व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुरली पोडुवल यांच्याशी दुसरे लग्न थाटले.

  • वयाने मोठ्या अभिनेत्यांसोबत केला रोमान्स

सोनमने 6 वर्षांच्या करिअरमध्ये 30 चित्रपटांत काम केले. सोनमने बहुतांश चित्रपटांत भरपूर एक्सपोज केले. स्वतःपेक्षा दुप्पट वय असलेल्या हिरोबरोबरही तिने स्क्रीन शेअर केली. सोनमचे खरे नेम बख्तावर खान आहे. पण चित्रपटांसाठी तिने सोनम नाव निवडले. त्यावेळी सोनमचे सौंदर्यच तिची फिल्म इंडस्ट्रीतील ओळख होती. तोकडे कपडे घालून एक्स्पोज करायला तिची हरकत नसायची. तिचा बोल्ड अंदाज बघण्यासाठी प्रेक्षक थिएटरकडे वळत होते. सोनमच्या चित्रपटात काही गाणी, एखाद-दोन बोल्ड आणि इमोशनल सीन्स असायचे.

बातम्या आणखी आहेत...