आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबाज खानच्या 'पिंच 2'मध्ये पोहोचली कियारा:ट्रोलर्स म्हणाले - अक्षय कुमारसोबत काम करु नकोस, कियारा आडवाणीने दिले सडेतोड उत्तर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्लास्टिक सर्जरीवर बोलली कियारा

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी हिने अलीकडेच अभिनेता अरबाज खान याचा कार्यक्रम 'पिंच'मध्ये हजेरी लावली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अरबाज कियाराला नेटकऱ्यांची तिच्याबद्दलची मतं वाचून दाखवत आहे. तर कियारादेखील तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत आहे.

कार्यक्रमात अरबाज कियाराला ट्रोल करणाऱ्यांचे कमेंट वाचून दाखवताना सांगतो की, कियाराने अभिनेता अक्षय कुमारसोबत आणखी चित्रपट करु नये. यावर कियाराने उत्तर देताना म्हटले, 'आपल्याला स्वतःला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे किंवा आपण ते स्वतः ठरवले पाहिजे की आपल्याला इतरांसोबत कधी आणि किती दूर राहायचे आहे.' कियाराने अक्षय कुमारसोबत 'गुड न्यूज' आणि 'लक्ष्मी' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

यासोबतच काही लोकांनी कियाराला गर्विष्ठ म्हटले आहे. नेटकऱ्यांच्या या ट्रोलवर कियारा म्हणाली, 'लोक मला गर्विष्ठ म्हणतात कारण त्यांनी असेच कलाकार पाहिले असतात जे एखाद्या चित्रपटाला नकार देतात किंवा आधी हो म्हणतात आणि मग आपले हात काढून घेतात. हे पाहून चाहत्यांना वाटते की आम्ही गर्विष्ठ आहोत. पण तसे काहीही नसते. आमच्या वागण्यामागे देखील काही कारण असेल याचा विचार ते करत नाहीत.'

प्लास्टिक सर्जरीवर बोलली कियारा

अनेक युझर्सनी कियाराने प्लॅस्टिक सर्जरी केली असल्याचे म्हटले. यावर कियाराने उत्तर देत म्हटले, 'इतके लोक मला म्हणतायत की मी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे की मला आता स्वतःवरच शंका यायला लागली आहे.'

'शेरशाह'मध्ये दिसली कियारा
कियारा सध्या शेरशाह या चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने डिंपल चीमा यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि डिंपल त्यांची भावी वधू होती. 1999 मध्ये कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले होते. ते शहीद झाल्यानंतर डिंपल यांनी कुणाशीही लग्न केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...