आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 8 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रणबीर आणि श्रद्धाची ऑन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि विशेष म्हणजे ती पसंतीसही पडली.
पहिल्या दिवशी चित्रपटाने 15.73 कोटींचा गल्ला जमवला. तर चार दिवसांत चित्रपटाची 50 कोटींहून अधिकची कमाई झाली. सातव्या दिवशीदेखील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली असून चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सात दिवसांत चित्रपटाची कोट्यवधींची कमाई
शाहरुखच्या 'पठाण'नंतर 'तू झूठी मैं मक्कार' हा हिट ठरणारा 2023 मधील दुसरा चित्रपट आहे. सात दिवसांपासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. खरं तर सहाव्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईत घट पाहायला मिळतेय. असे असूनही चित्रपटाने सात दिवसांत एकुण 82.31 कोटींचे कलेक्शन केले आहे.
सात दिवसांत चित्रपटाची कमाई
100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार 'तू झूठी मैं मक्कार'
'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाने सात दिवसांत 82.31 कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून बोनी कपूर यांनी अभिनयात पदार्पण केले आहे. लवकरच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची माहिती आहे. रणबीर आणि श्रद्धाच्या या चित्रपटाला आयएमडीवर पहिल्याच दिवशी 10 पैकी 6.7 रेटिंग मिळाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.