आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुनिषा-शिझानच्या ब्रेकअपवर बहीण फलकचा यु-टर्न:म्हणाली- ब्रेकअप परस्पर संमतीने झाले होते, दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझानची बहीण फलक नाजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने शिझान आणि तुनिषाचे ब्रेकअप परस्पर संमतीने झाल्याचे सांगितले आहे. दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता, असा खुलासा तिने केला.

खरं तर आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत शिझानच्या बहिणी फलक आणि शफक नाज यांनी शिझान आणि तुनिषा यांचा ब्रेकअप झालाच नव्हता असे वक्तव्य केले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता त्याच वक्तव्यावर फलकने व्हिडिओ शेअर करत दोघांचे परस्पर संमतीने ब्रेकअप झाले होते, असे सांगितले आहे.

व्हिडिओमध्ये फलक नाज म्हणतेय, "ब्रेकअप झाले की नाही हा प्रश्न खूप फिरवून विचारला गेला होता, म्हणून मी पुन्हा सांगतोय की जेव्हा पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा आम्ही म्हणालो होतो की, ब्रेकअप दोघांच्या संमतीने झाले होते. ज्यात कोणाच्याही बाजूने भांडण किंवा वाद झाले नाही. पत्रकार परिषद सुरू असताना खूप प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे हा गोंधळ झाला आहे. व्हॉट्सअॅप चॅटवर दोघांचे यांसदर्भात बोलणे झाले होते, त्याचा पुरावाही पोलिसांकडे आहे, असे फलक म्हणाली. पत्रकार परिषद सुरु असताना खूप प्रश्न विचारले जात होते, त्यामुळे हा गोंधळ झाला आहे, असे फलकने स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या होत्या फलक आणि शफाक
पत्रकार परिषदेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिझानची बहीण शफाक म्हणतेय की, "प्रत्येकाचे नाते असते, प्रत्येकाचे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असतात, पण जर कोणी मानसिक तणावाशी संघर्ष करत असेल, डिप्रेशनमध्ये असेल तर आपण त्याला समजून घेतले पाहिजे." यानंतर जेव्हा ब्रेकअपचा प्रश्न विचारला केला जातो, तेव्हा फलक नाज मध्येच ओरडते, की ब्रेकअप झालेच नव्हते. फलकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुनिषाला दर्ग्यात नेले नाही - शिझानच्या बहिणी

तुनिषा आत्महत्या प्रकरणी शिझान खानच्या कुटुंबीयांनी सोमवारी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्या आई आणि बहिणींनी तुनिषाची आई वनिता शर्मा यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. शिझानच्या बहिणी फलक आणि शफाक यांनी सांगितले की, त्यांनी तुनिषाला कधीही दर्ग्यात नेले नाही. हिजाबबद्दल जे बोलले गेले ते चुकीचे आहे. टीव्ही सीरियलच्या शूटिंगदरम्यान तुनिषाने हिजाब परिधान केला होता.

शिझानचे कुटुंबीय आणखी काय म्हणाले -

तुनिषाच्या आईचे आरोप खोटे आहेत, तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला नाही

शिझानचे कुटुंबीय म्हणाले- वनिता शर्मा यांनी शिझानवर खोटे आरोप केले आहेत. आम्ही कुणावरही धर्मांतरासाठी दबाव टाकू शकत नाही. आम्ही तिला कधीही हिजाब घालण्याची सक्ती केली नाही. तुम्ही म्हणाला की, मी तुमच्या लेकीला घेऊन दर्ग्यात गेले, तर सांगा कधी घेऊन गेले होते, असा सवाल शिझानची फलक नाजने तुनिषाच्या आईला केला आहे. तुनिषा आणि शिझान खूप आधीच वेगळे झाले होते, असेही फलकने सांगितले.

आम्ही तुनिषाच्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज प्लॅन करत होतो
शिझानच्या बहिणी म्हणाल्या - आम्ही तिला ओळखत होतो. ती आम्हाला मोठ्या बहिणी मानत होती. 4 जानेवारीला तिचा वाढदिवस आहे, त्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन करत होतो. वडिलांच्या निधनानंतर तुनिषाने तिचा वाढदिवस कधीही मोठ्या प्रमाणात साजरा केला नव्हता. आम्ही तुनिषाला फक्त 5 महिन्यांपासून ओळखत होतो.

तुनिषाची आई सतत फोन करायची

शिझानची बहीण म्हणाली - आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे, की पाच महिन्यांत आम्ही तुनिषाला देता येईल तितका आनंद दिलाय. तुनिषा आतून खूप दु:खी होती. तिची आई तिला कुठेच बाहेर जाऊ देत नव्हती. तिला यातून बाहेर पडायचे होते. कुठेही गेली तरी, तिची आई सतत तिला फोन करायची. आम्ही पहिल्यांदा तिला समुद्र दाखवला ती खूप आनंदी होती.

वनिता यांना शिझानने तुनिषाप्रमाणे आत्महत्या करावी असे वाटते
बहिणी म्हणाल्या - आम्ही तुनिषाला दर्ग्यात नेले तर त्याचा काही फोटो आहे का? शिझानने तिच्यावर हात उगारला होता, याचा काही पुरावा आहे का? राहिला प्रश्न उर्दू भाषा बोलण्याचा तर शूटिंगदरम्यान उर्दू बोलावे लागते. आमची एक मुलगी गेली आणि आता आमच्या मुलाने आत्महत्या करावी अशी वनिताजींची इच्छा आहे.

वाढदिवशी आई वनिताने तुनिषाचा मोबाईल तोडला होता

शिझानच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे, तुनिषाला टीव्ही मालिकांमध्ये काम करायचे नव्हते. तिला जग बघायचे होते. तुनिषाचे तिच्या कुटुंबाशी चांगले संबंध नव्हते. आई वनिता हिने वाढदिवशी तुनिषाचा मोबाईल फोडला होता. तुनिषाला पैशांची अडचण होती. तुनिषाच्या पैशांवर तिच्या आईचे नियंत्रण असायचे. तुनिषला हजार दोन हजार रुपयेदेखील आईला मागावे लागायचे. त्यासाठी तिची आई तिला प्रश्न विचारायची, असा दावा शिझानच्या बहिणींनी केला आहे.

तुनिषाची अल्बम साँगसाठी जबरदस्तीने सही घेतली गेली
शिझानची बहिण म्हणाली, "आत्महत्येआधी तुनिषा आणि माझे बोलणे झाले होते. आवाजावरुन ती आनंदी वाटत होती. नाताळची दोन दिवसांची सुटी तिला चंदीगडला साजरी करायची होती. सुटी मिळवण्यासाठी तिने प्रोडक्शन हाऊसला विनंती करण्यास मला सांगितले होते. प्रोडक्शन हाऊसकडून तिला सुटी मिळत नव्हती. तुनिषाच्या आईने जबरदस्तीने दोन म्युझिक व्हिडिओ साइन केले होते. मी तिचे तिकीट बुक केले होते. तिच्या सुटीसाठी प्रोडक्शन हाऊसला विनंती करत होते."

लव्ह जिहादचा संबंध नाही

शिझानचे कुटुंबीय म्हणाले - शिझानने तुनिषाला कानाखाली मारली तेव्हा तुम्ही काही बोलला का नाहीत, तेव्हा गप्प का बसला. पोलिसांनी लव्ह जिहादचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केले आहे. वनिताजी, तुमची लेक गेली आहे, तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की, तिने हे का केले, हे पाऊल का उचलले. पण तुम्ही मात्र दुसऱ्याला टॉर्चर करताय.

बातम्या आणखी आहेत...