आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुनिषाच्या आईचा दावा - सेटवर ड्रग्ज घ्यायचा शिझान:धर्मांतर करण्यासाठी तुनिषावर दबाव टाकला, तिचा मानसिक छळ केला

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

24 वर्षीय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिचा प्रियकर शिझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझान सेटवर ड्रग्ज घ्यायचा. इतकेच नाही तर शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषावर धर्मांतरासाठी आणि बुरखा घालण्यासाठी दबाव टाकला होता, शिझान तुनिषाचा मानसिक छळ करायचा असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत शिझानवर हे आरोप केले आहेत.

धर्मांतरासाठी तुनिषावर दबाव टाकण्यात आला

माध्यमांशी बोलताना तुनिषाची आई म्हणाली, "शिझान आणि त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. तिला बुरखा घालण्यासाठीही शिझानच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. शिझानची बहीण फलक नाझने तिला जबदरस्तीने हातावर टॅटू काढायला लावला," असा खुलासा त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, "शिझान तुनिषाचे मानसिक आणि आर्थिक शोषण करत असे. शिझानची बहीण फलक नाज तुनिषाला दर्ग्यात घेऊन जायची. शिझान तुनिषाकडून महागड्या भेटवस्तू मागायचा."

तुनिषा शिझानपेक्षा दहा वर्षांनी लहान होती. तुनिषाबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना त्याने दुसऱ्या मुलीशी संबंध का ठेवले? तुनिषाने 25 हजारांचे गिफ्ट्स शिझानला दिले होते. त्यांनी तुनिषाचा उपयोग करुन घेतला, असे आरोपही तुनिषाच्या आईने शिझानवर केले आहेत

तुनिषाच्या आईने शिझानवर 7 गंभीर आरोप केले होते

1. तुनिषा म्हणाली होती- शिझानने तिचा वापर केला.

2. शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा खूप नाराज होती.

3. सीरियलच्या सेटवर शिझानने तुनिषाला थापड मारली होती.

4. शिझानची बहीण तुनिषाला दर्ग्यात घेऊन जायची.

5. शिझान तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता.

6. शिझानच्या आईला सर्व काही माहित होते, तरीही ती काही बोलली नाही.

7. शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाला ट्रॅप केले होते.

तुनिषा घालू लागली होती हिजाब - तुनिषाचे मामा

तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर तिचे मामा पवन शर्मा यांनीही खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यांनी सांगितल्यानुसार, शिझानला भेटल्यानंतर तुनिषाच्या वागण्याबोलण्यात खूप फरक झाला होता. तिचे राहणीमान बदलून गेले होते. इतकेच नाही तर तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती. त्यांनी पोलिसांनी याप्रकरणाचा प्रत्येक दृष्टीकोनातून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आतापर्यंत 18 जणांची झाली चौकशी

दरम्यान, तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस वेगाने तपास करत आहेत. या तपासावेळी पोलिसांनी दोन आयफोनसह तीन फोन जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 18 जणांची चौकशी केली असून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांच्या मते शिझानने तुनिषा आणि तिच्या आईबरोबर व्हॉट्सअपवर केलेले संभाषण डिलिट करून टाकले आहेत. त्याच्या फोनमधून त्याने दुसऱ्या गर्लफ्रेंडबरोबर केलेले चॅट मिळाले आहे.

तुनिषाने 24 डिसेंबर रोजी केली आत्महत्या

तुनिषाने 24 डिसेंबर रोजी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर काही तासांनंतर तिच्या आईच्या तक्रारीवरून तिचा सहकलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली. शिझानवर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. बुधवारी न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवली. शिझान आणि तुनिशा जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेच्या 15 दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते.

तुनिषा कुठे फाशी घेतली

अल्बमच्या शूटिंगदरम्यान शनिवारी सेटवरील मेकअप रूममध्ये तुनिषाने गळफास लावून घेतला. ही मेकअप रूम शिझान खानची होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर शिझानने सांगितले होते की, जेव्हा तो शूटिंगवरून परतला तेव्हा खोली आतून बंद होती. गेट न उघडल्याने दरवाजा तोडण्यात आला. तुनिषा बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा...

  • गळफास घेण्याआधी शिझानशी बोलली होती तुनिषा:शिझानने सिक्रेट गर्लफ्रेंडसोबतचे चॅट डिलीट केले, तीही टीव्ही अभिनेता - पोलिसांची माहिती

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माचे गळफास घेण्याआधी शिझान खानसोबत बोलणे झाले होते. तसेच आरोपी शिझान हा तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. वाचा सविस्तर...

  • शीझानची बहीण फलक नाज आणि तुनिषाचे नाते होते घट्ट:अंत्यसंस्काराच्या वेळी रडताना दिसली, तीन आठवड्यांपूर्वी तुनिषाने म्हटले होते- माझी आवडती व्यक्ती!

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा सहकलाकार शीझान अहमदला अटक केली आहे. तुनिषाच्या आईने शीझान हा मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. मंगळवारी तुनिषाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एक फोटो समोर आला आहे. या फोटोत आरोपी शीझानची बहीण स्मशानभूमीत रडताना दिसत आहे. वाचा सविस्तर...