आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूला 99 दिवस पूर्ण झाले आहेत. डिसेंबर महिन्यात तुनिषाने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूप्रकरणी तिचा माजी प्रियकर आणि टीव्ही अभिनेता शिझान खानला जबाबदार धरण्यात आले. त्याला अटकदेखील झाली. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला आहे. दरम्यान, रविवारी (2 एप्रिल) शिझानने तुनिषाच्या आठवणीत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. शिझानने शेअर केलेल्या व्हिडिओत दोघांचे फोटो आणि मस्ती करतानाचे काही क्षण दिसत आहेत.
तुनिषाच्या आठवणीत शिझान भावुक
तुनिषाच्या निधनानंतर शिझानने पहिल्यांदाच तिच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. कवितेच्या माध्यमातून तो तुनिषाला किती मिस करतोय हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.
शिझानने शेअर केलेली कविता...
एक परी उतरी फलक से शफ़क़ की लाली लिए कहकशा ज़ैसी उसकी आँखें ग़ज़ब की अदाएं लिए, खुदको देखा भी नहीं खुदको पहचाना भी नहीं तकब्बुर होता हैं क्या यह उसने जाना ही नहीं हवा की तरहा आयी वोह पर हवा कही ठहरती नहीं. क्या तूफ़ान थे उसने सीने में दबाए यह बात वोह किसी से कहती नहीं थम गया तूफ़ान अचानक अजब सी खामोशी छायी है बिखरे कुछ टुकड़ों में हमने सिर्फ़ उदासी पायी है दिल अचानक से है भारी आँखें भी भर आईं है उसके हमारे दरमियान अब सदियो की तन्हाई है शफ़क़ को लाली देके वापिस फलक पे वह यूँ चली गई कहकशा में घर बनाया उसने और वही पर रह गई – शीज़ान ख़ान ‘फक्त माझीच तुन्नी’, अशी पोस्ट शिझान खानने शेअर केली आहे.
शिझानच्या कवितेवर नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
शिझानच्या या पोस्टवर नेटकरी आता प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले- 'तू ही कविता खूप सुंदर लिहिली आहे.' आणखी एकाने लिहिले, 'धीर धर, सर्व काही ठीक होईल, तुझी आई, तुझ्या दोन बहिणींनी तुझ्यासाठी खूप संघर्ष केला आहे, तू बरोबर आहेस आणि तू बरोबर आहेस.' तिसऱ्या यूजरने लिहिले- 'तुम्ही गेल्यापासून मी हा शो पाहणे बंद केले आहे. मला आशा आहे की तू लवकरच शोमध्ये परतशील.' आणखी एका यूजरने लिहिले- 'आम्ही सर्वजण तुनिषाला खूप मिस करतोय.'
4 मार्च रोजी शिझानला मिळाला जामीन
24 डिसेंबर रोजी पोलिसांनी तुनिषा आत्महत्या प्रकरणी शिझानला अटक केली होती. 4 मार्च रोजी त्याला जामीन मंजुर झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.