आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुनिषाला दर्ग्यात नेले नाही - शिझानच्या कुटुंबीयांचा दावा:बहिणी म्हणाल्या- तुनिषाचे कुटुंबासोबतचे नाते ठिक नव्हते, आई तिला कंट्रोल करायची

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आज शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी तुनिषाच्या आईने त्यांच्यावर लावलेल्या आरोपांवर खुलासा केला आहे. तुनिषाच्या आई वनिता शर्मा यांनी शिझानवर खोटे आरोप लावल्याचा दावा शिझानच्या बहिणींनी केला आहे. आम्ही कधीही कुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकू शकत नाही. तिला कधीही दर्ग्यात नेले नाही. तसेच तुनिषाचा हिजाबमधील फोटो हा एका शोमधील होता. तिच्यावर कधीही हिजाब घालण्यासाठी दबाव टाकला नाही, असा खुलासा शिझानच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तुनिषाचे आईसोबतचे नातेसंबंध बिघडले होते. वडिलांच्या निधनानंतर तिने कधीही आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला नाही, असेही शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिझानचे कुटुंबीय काय म्हणाले -

1. तुनिषाच्या आईचे आरोप खोटे आहेत, तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला नाही

शिझानचे कुटुंबीय म्हणाले- वनिता शर्मा यांनी शिझानवर खोटे आरोप केले आहेत. आम्ही कुणावरही धर्मांतरासाठी दबाव टाकू शकत नाही. आम्ही तिला कधीही हिजाब घालण्याची सक्ती केली नाही. तुम्ही म्हणाला की, मी तुमच्या लेकीला घेऊन दर्ग्यात गेले, तर सांगा कधी घेऊन गेले होते, असा सवाल शिझानची फलक नाजने तुनिषाच्या आईला केला आहे. तुनिषा आणि शिझान खूप आधीच वेगळे झाले होते, असेही फलकने सांगितले.

2. आम्ही तुनिषाच्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज प्लॅन करत होतो
शिझानच्या बहिणी म्हणाल्या - आम्ही तिला ओळखत होतो. ती आम्हाला मोठ्या बहिणी मानत होती. 4 जानेवारीला तिचा वाढदिवस आहे, त्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन करत होतो. वडिलांच्या निधनानंतर तुनिषाने तिचा वाढदिवस कधीही मोठ्या प्रमाणात साजरा केला नव्हता. आम्ही तुनिषाला फक्त 5 महिन्यांपासून ओळखत होतो.

3. तुनिषाची आई सतत फोन करायची

शिझानची बहीण म्हणाली - आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे, की पाच महिन्यांत आम्ही तुनिषाला देता येईल तितका आनंद दिलाय. तुनिषा आतून खूप दु:खी होती. तिची आई तिला कुठेच बाहेर जाऊ देत नव्हती. तिला यातून बाहेर पडायचे होते. कुठेही गेली तरी, तिची आई सतत तिला फोन करायची. आम्ही पहिल्यांदा तिला समुद्र दाखवला ती खूप आनंदी होती.

3. वनिता यांना शिझानने तुनिषाप्रमाणे आत्महत्या करावी असे वाटते
बहिणी म्हणाल्या - आम्ही तुनिषाला दर्ग्यात नेले तर त्याचा काही फोटो आहे का? शिझानने तिच्यावर हात उगारला होता, याचा काही पुरावा आहे का? राहिला प्रश्न उर्दू भाषा बोलण्याचा तर शूटिंगदरम्यान उर्दू बोलावे लागते. आमची एक मुलगी गेली आणि आता आमच्या मुलाने आत्महत्या करावी अशी वनिताजींची इच्छा आहे.

4. वाढदिवशी आई वनिताने तुनिषाचा मोबाईल तोडला होता

शिझानच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे, तुनिषाला टीव्ही मालिकांमध्ये काम करायचे नव्हते. तिला जग बघायचे होते. तुनिषाचे तिच्या कुटुंबाशी चांगले संबंध नव्हते. आई वनिता हिने वाढदिवशी तुनिषाचा मोबाईल फोडला होता. तुनिषाला पैशांची अडचण होती. तुनिषाच्या पैशांवर तिच्या आईचे नियंत्रण असायचे. तुनिषला हजार दोन हजार रुपयेदेखील आईला मागावे लागायचे. त्यासाठी तिची आई तिला प्रश्न विचारायची, असा दावा शिझानच्या बहिणींनी केला आहे.

5. तुनिषाची अल्बम साँगसाठी जबरदस्तीने सही घेतली गेली
शिझानची बहिण म्हणाली, "आत्महत्येआधी तुनिषा आणि माझे बोलणे झाले होते. आवाजावरुन ती आनंदी वाटत होती. नाताळची दोन दिवसांची सुटी तिला चंदीगडला साजरी करायची होती. सुटी मिळवण्यासाठी तिने प्रोडक्शन हाऊसला विनंती करण्यास मला सांगितले होते. प्रोडक्शन हाऊसकडून तिला सुटी मिळत नव्हती. तुनिषाच्या आईने जबरदस्तीने दोन म्युझिक व्हिडिओ साइन केले होते. मी तिचे तिकीट बुक केले होते. तिच्या सुटीसाठी प्रोडक्शन हाऊसला विनंती करत होते."

6. लव्ह जिहादचा संबंध नाही

शिझानचे कुटुंबीय म्हणाले - शिझाननं तुनिषाला कानाखाली मारली तेव्हा तुम्ही काही बोलला का नाहीत, तेव्हा गप्प का बसला. पोलिसांनी लव्ह जिहादचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केले आहे. वनिताजी, तुमची लेक गेली आहे, तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे की, तिने हे का केले, हे पाऊल का उचलले. पण तुम्ही मात्र दुसऱ्याला टॉर्चर करताय.

शिझानचा जामीनासाठी अर्ज

शिझान खानला 31 डिसेंबर रोजी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याच्या जामीनासाठी वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर शिझान खानवर अनेक आरोप झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अटक केली. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?
हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचे शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा बॉयफ्रेंड शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतले आहे. तुनिषा शर्माने शिझान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तुनिषा आणि शिझान हे दोघे सब टीव्हीच्या अलिबाबा... दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. तुनिषाने गळफास घेतल्याचे लक्षात येताच, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

  • तुनिषा प्रकरणात आरोपी शिझानला 14 दिवसांची कोठडी:वसई कोर्टाचे आदेश, सिक्रेट गर्लफ्रेंड आणि ड्रग्ज अँगलने पोलिसांची चौकशी

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. न्यायालयाने आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्याला वसई कोर्टात हजर करण्यात आले होते. शुक्रवारी न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली होती. आज त्याची पोलिस कोठडी संपत असतानाच न्यायालयाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. दरम्यान शुक्रवारी तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत शिझान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. वाचा सविस्तर...

  • तुनिषाच्या आईचा दावा - सेटवर ड्रग्ज घ्यायचा शिझान:धर्मांतर करण्यासाठी तुनिषावर दबाव टाकला, तिचा मानसिक छळ केला

24 वर्षीय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिचा प्रियकर शिझान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझान सेटवर ड्रग्ज घ्यायचा. इतकेच नाही तर शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषावर धर्मांतरासाठी आणि बुरखा घालण्यासाठी दबाव टाकला होता, शिझान तुनिषाचा मानसिक छळ करायचा असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत शिझानवर हे आरोप केले आहेत. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...