आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण:शिझान खानला कोर्टाकडून परदेशात जाण्याची परवानगी, 'खतरों के खिलाडी' शोमध्ये होणार सहभागी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझान खानला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वसई सत्र न्यायालयाने पोलिसांना शिझान खानचे पासपोर्ट परत करण्याचे निर्देश दिले असून शिझानला परदेशी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिझान लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'खतरों के खिलाडी' कार्यक्रमाच्या 13 व्या पर्वात तो स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी शिझानने कोर्टाकडे परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. शिझानचा अर्ज स्वीकारत कोर्टाने त्याला परवानगी दिली आहे.

'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाचे चित्रीकरण अर्जेंटिनामध्ये होणार आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना परदेशात जावे लागणार आहे. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अटक झलेला अभिनेता शिझान खान सध्या जामिनावर बाहेर आहे. शिझान शेवटचा 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या शो मध्ये दिसला होता. याच शोच्या सेटवर त्याची सहकलाकार तुनिषा हिने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती. तुनिषाच्या आईने शिझान खानवर गंभीर आरोप करत त्यालाच या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवले होते.

कोर्टाने 10 जुलै 2023 पर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली
4 मार्च 2023 रोजी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिझानने पासपोर्ट परत करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने शिझानने अर्ज स्वीकारत त्याला 10 जुलै 2023 पर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिझानच्या वकिलांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, 'खतरों के खिलाडीसाठी शिझानला परदेशात जाण्याची परवानगी देणार्‍या माननीय न्यायालयाचे आम्ही आभारी आहोत.'

दुसरीकडे, तुनिषाच्या आईने टीव्ही चॅनलला विनंती केली आहे. जो माणूस अद्याप निर्दोष सिद्ध झालेला नाही, त्याला टीव्हीवर दाखवून त्याचा गौरव करू नका.

'शिझान अजून निर्दोष सिद्ध झालेला नाही, टीव्ही चॅनेल्सनी अशा व्यक्तीला व्यासपीठ देऊ नये'
तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा म्हणाल्या, 'माझी टीव्ही चॅनेल आणि शोच्या निर्मात्यांना विनंती आहे की, अशा व्यक्तीला व्यासपीठ देऊ नका, जो या प्रकरणात अद्याप निर्दोष सिद्ध झालेला नाही.'

तुनिषा आणि तिची आई वनिता शर्मा
तुनिषा आणि तिची आई वनिता शर्मा

शिझान 70 दिवस तुरुंगात होता, 4 मार्चला मिळाला जामीन
जवळपास 70 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर 4 मार्च रोजी शिझान खानला जामीन मिळाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिझान आपल्या आई आणि बहिणीच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडला होता.

तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर काही तासांनंतर तिच्या आईने शिझान मोहम्मद खानविरुद्ध तक्रार दाखल केली. 25 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांनी शिझानला अटक केली होती. शिझानवर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. हे छायाचित्र शिझानला कोर्टात हजर करतानाचे आहे.
शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. हे छायाचित्र शिझानला कोर्टात हजर करतानाचे आहे.

25 डिसेंबरपासून शिझान तुरुंगात होता. दरम्यान, तुनिषाच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तुनिषाची आई आणि मामाने सांगितले होते की, शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिशा खूप डिप्रेशनमध्ये होती. शिझान आणि तुनिषा जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेच्या 15 दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते.