आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिझानचे केस कापण्यास महिनाभर बंदी:तुनिषा प्रकरणातील आरोपीला तुरुंगात सुरक्षा पुरवावी - न्यायालयाचे आदेश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मुंबईतील वसई सत्र न्यायालयाने मंगळवारी शिझान खानला दिलासा दिला आहे. आपले केस कापू नयेत, तसेच तुरुंगात सुरक्षा द्यावी, अशी विनंती शिझानने न्यायालयाला केली होती. ही मागणी मान्य करत न्यायालयाने शिझानचे केस कापण्यास महिनाभर बंदी घातली आहे. यासोबतच त्याला कारागृहात सुरक्षा पुरविण्यात यावी आणि समुपदेशनही करण्यात यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शिझानच्या जामीन अर्जावर येत्या 7 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, शिझानला न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी दोन याचिका दाखल केल्या, ज्यात त्यांचे म्हणणे आहे की, शिझान मानसिक तणावात आहे. अशा परिस्थितीत तो कोणतेही चुकीचे पाऊल उचलू शकतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवावी लागेल. याशिवाय केस न कापण्यासाठी आणखी एक अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचे हे दोन्ही अर्ज मान्य केले आहेत. पुढील महिनाभर कारागृहात शिझानचे केस कापू नयेत, असे आदेश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.

शिझानला केस का कापायचे नाहीत?
शिझानने अलिबाबा दास्तानें काबुल या टीव्ही मालिकेसाठी त्याचे केस वाढवले ​​आहेत. या मालिकेत त्याचा लूक लांब केस असलेल्या हीरोचा आहे. जर शिझानचे केस कापले गेले, तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो या मालिकेसाठी काही महिने शूटिंग करू शकणार नाही किंवा त्याला विग घालून काम करावे लागेल अशी शक्यता आहे. याच कारणामुळे शिझानच्या वकिलाने त्याचे केस कापू नयेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती.

शिझानने न्यायालयात आपल्या पाच मागण्या मांडल्या होत्या
मागील सुनावणीदरम्यान तुनिषा प्रकरणातील आरोपी शिझानने केस न कापण्यासोबतच तुरुंगात घरचे जेवण आणि सुरक्षा मिळावी, असे न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाने त्याच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

शिझानने न्यायालयाकडे केली होती या पाच गोष्टींसाठी विनंती

  • त्याचे केस कापू नयेत.
  • मीडिया ट्रायल करू नये.
  • घरचे जेवण मिळावे.
  • दम्यासाठी इनहेलर वापरण्याची परवानगी द्यावी.
  • त्याला पोलिस संरक्षण देण्यात यावे.

आत्तापर्यंत या प्रकरणात काय घडलं, समजून घ्या या 8 मुद्द्यांमध्ये...

1. तुनिषाने 24 डिसेंबर रोजी गळफास घेतला
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला.

2. आत्महत्येच्या 15 दिवस आधी तुनिषाचे ब्रेकअप झाले होते
मुंबईचे एसीपी चंद्रकांत जाधव यांनी सांगितल्यानुसार, तुनिषा आणि तिचा को-स्टार शिझान यांचे अफेअर होते. मृत्यूच्या 15 दिवस आधी त्यांचे ब्रेकअप झाले होते, त्यामुळे 24 डिसेंबरला तुनिषाने तिच्या शोच्या सेटवर गळफास लावून घेतला.

शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा नाराज होती
शिझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा नाराज होती

3. आईच्या तक्रारीवरून शिझानला अटक
तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिझान खानला अटक केली. 25 डिसेंबर रोजी त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

4. शिझानने चौकशीदरम्यान तुनिशासोबतचे ब्रेकअप स्वीकारले
26 डिसेंबर रोजी पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान शिझान खानने वय आणि धर्मामुळे तुनिषासोबत ब्रेकअप केल्याचे स्वीकारले. श्रध्दा खून प्रकरण हे देखील त्यांच्या ब्रेकअपचे कारण असल्याचे आरोपीने सांगितले. त्यावेळी देशात जे वातावरण होते त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता, असे शिझान म्हणाला.

शिझानने मान्य केले - तुनिषासोबत ब्रेकअप झाले
शिझानने मान्य केले - तुनिषासोबत ब्रेकअप झाले

5. पोलिसांनी शिझानचा फोन जप्त केला
पोलिसांनी शिझानकडून तीन फोन जप्त केले आहेत. पोलिसांनी शिझानच्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप चॅटची 250 पाने जप्त केली आहेत. यादरम्यान सिक्रेट मैत्रिणीसोबतचे चॅट समोर आले होते. शिझानने ते चॅट आधीच डिलीट केले होते.

पोलिस ते चॅट रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी तुनिषाने आत्महत्या केली, त्याच दिवशी शिझानचे त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबत बोलणे झाले होते.

6. कोर्टाने शिझानच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ केली
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 28 डिसेंबर रोजी न्यायालयाने शिझानच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. शिझान तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

7. न्यायालयाने आणखी एक दिवस कोठडी वाढवली
30 डिसेंबर रोजी न्यायालयाने शिझानच्या कोठडीत आणखी एक दिवसाची वाढ केली होती. शिझानच्या आईची पत्रकार परिषदेनंतर न्यायालयाने पुढील तपासासाठी शिझानच्या पोलिस कोठडीत आणखी एक दिवस वाढ करण्याचा निर्णय घेतला.

8. शिझानच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मुंबईतील वसई न्यायालयाने शनिवारी आरोपी शिझानच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

शिझानवरील आरोप बिनबुडाचे : वकील
या संपूर्ण प्रकरणात शिझानच्या वकिलाने पोलिसांकडे शिझानविरुद्ध कोणताही पुरावे नसल्याचे सांगितले. तुनिषाच्या आईने केलेले सर्व आरोप निराधार आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, शिझान दोषी नाही, असे वकिलांनी म्हटले आहे.

  • तुनिषा आत्महत्या प्रकरण:तुनिषाची आई आणि संजीव कौशल यांचे अफेअर?, म्हणाले - माझ्यासाठी तुनिषा लेकीसारखीच होती

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी तिचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. शिझानने जामीनासाठी अर्ज केला असून येत्या 7 जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान सोमवारी शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत तिच्या तुनिषाच्या आईने लावलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. तुनिषाच्या आईचे आरोप खोटे आहेत. आईचे तिच्यावर नियंत्रण होते. आम्ही तिच्यावर कधीही धर्मांतरासाठी दबाव आणला नाही. आई वनिता यांनी तुनिषाचा मोबाईल तिच्या वाढदिवसाला तोडला होता. शिवाय तुनिषाच्या आईची संजीव कौशलसोबत मैत्री होती आणि तुनिषा त्यांच्या नावाने घाबरायची. वडिलांच्या मृत्यूनंतर तुनिषाने तिचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला नाही, असे शिझानच्या कुटुंबीयांनी सांगितले. वाचा सविस्तर...

  • तुनिषा-शिझानच्या ब्रेकअपवर बहीण फलकचा यु-टर्न:म्हणाली- ब्रेकअप परस्पर संमतीने झाले होते, दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते

टीव्ही अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझानची बहीण फलक नाजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने शिझान आणि तुनिषाचे ब्रेकअप परस्पर संमतीने झाल्याचे सांगितले आहे. दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता, असा खुलासा तिने केला. वाचा सविस्तर...

  • तुनिषाला दर्ग्यात नेले नाही - शिझानच्या कुटुंबीयांचा दावा:बहिणी म्हणाल्या- तुनिषाचे कुटुंबासोबतचे नाते ठिक नव्हते, आई तिला कंट्रोल करायची

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आज शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी तुनिषाच्या आईने त्यांच्यावर लावलेल्या आरोपांवर खुलासा केला आहे. तुनिषाच्या आई वनिता शर्मा यांनी शिझानवर खोटे आरोप लावल्याचा दावा शिझानच्या बहिणींनी केला आहे. आम्ही कधीही कुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकू शकत नाही. तिला कधीही दर्ग्यात नेले नाही. तसेच तुनिषाचा हिजाबमधील फोटो हा एका शोमधील होता. तिच्यावर कधीही हिजाब घालण्यासाठी दबाव टाकला नाही, असा खुलासा शिझानच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...