आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुनिषा आत्महत्या प्रकरण:तुनिषाची आई आणि संजीव कौशल यांचे अफेअर?, म्हणाले - माझ्यासाठी तुनिषा लेकीसारखीच होती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी तिचा सहकलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. शिझानने जामीनासाठी अर्ज केला असून येत्या 7 जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान सोमवारी शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत तिच्या तुनिषाच्या आईने लावलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. तुनिषाच्या आईचे आरोप खोटे आहेत. आईचे तिच्यावर नियंत्रण होते. आम्ही तिच्यावर कधीही धर्मांतरासाठी दबाव आणला नाही. आई वनिता यांनी तुनिषाचा मोबाईल तिच्या वाढदिवसाला तोडला होता. शिवाय तुनिषाच्या आईची संजीव कौशलसोबत मैत्री होती आणि तुनिषा त्यांच्या नावाने घाबरायची. वडिलांच्या मृत्यूनंतर तुनिषाने तिचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला नाही, असे शिझानच्या कुटुंबीयांनी सांगितले.

शिझानच्या कुटुंबीयांनी तिची आई वनिता संजीव कौशलबरोबर चंदीगढमध्ये राहायची आणि या दोघांचे अफेअर असल्याची शक्यताही वर्तवली होती. या संपूर्ण प्रकरणावर संजीव कौशल यांनी आता मौन सोडलंय.

संजीव कौशल यांनी ‘ईटाईम्स’शी बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा करत बाजू मांडली आहे. तुनिषाच्या पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपांवर संजीव कौशल म्हणाले, 'आमचा तुनिषाच्या पैशांवर डोळा होता, हे बोलणं चुकीचे आहे. ती फक्त 20 वर्षांची होती. त्यामुळे आम्ही तिचे व्यवहार पाहायचो. तिचे पैसे ती हवे तितके आणि तिला वाट्टेल तेव्ही ती खर्च करत होती. आम्ही तिला कधीही पैसे खर्च करण्यापासून कधीच रोखले नाही. तिला अभिनय आवडायचा म्हणून की करायची. तिला जबरदस्ती केली जात नव्हती, तिने आतापर्यंत कायम चांगले प्रोजेक्ट्स केले होते," असेही त्यांनी म्हटले.

तुनिषाच्या संपत्तीबद्दल खुलासा
संजीव कौशल यांनी तुनिषाच्या मालमत्तेबाबतही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "लोक असाही दावा करत आहेत की तुनिषा 16 कोटींची संपत्ती मागे ठेवून गेली आहे, पण त्यात तथ्य नाही. अगदी तिची कार आणि लॅपटॉप देखील हप्त्यांवर विकत घेतले होते."

तुनिषाच्या कुटुंबासोबत असलेल्या संबंधांवर केले भाष्य
तुनिषाच्या आईसोबतच्या नात्यावर संजीव कौशल यांनी मौन सोडले आहे. त्यांनी स्पष्टपणे नात्याचा उल्लेख केला नसला तरी, काही नाती ही रक्ताच्याही पलिकडलीची असतात, असे ते म्हणाले. "तुनिषा माझी मुलगी नव्हती याची मला नेहमीच खंत राहील. मी तिच्यावर माझ्या मुलीइतकेच प्रेम केले. माझ्या मुलीचे नाव रितिका असून ती 22 वर्षांची आहे. आम्ही गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तुनिषाच्या कुटुंबाला ओळखतोय. रितिका आणि तुनिषा यांचा वाढदिवस देखील आम्ही एकत्र साजरा करायचो. माझ्या मुलीला आणि तुनिषाला कायम समान वागणूक दिली. नाती रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त असतात, अशी नाती प्रत्येकाची असतात," असे ते म्हणाले.

  • तुनिषा प्रकरणात मामा पवन शर्मांचा दावा:ती धर्मांतराबाबत आईशी बोलली, आई-मुलगी भांडणाचा आरोप खोटा

आज 4 जानेवारीला तुनिषा शर्माचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत दिव्य मराठी नेटवर्कने तुनिषाचे मामा पवन शर्मा यांच्याशी चर्चा केली आहे. तुनिषा आत्महत्या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे खुलासे त्यांनी केले आहेत. शिझानच्या कुटुंबीयांनी सोमवारी पत्रकार परिषदेत संजीव कौशलचा उल्लेख केल्याबाबत मामा पवन शर्मा यांनी सांगितले की, तो तुनिषाचा कौटुंबिक मित्र आहे आणि तुनिषाचे त्याच्याशी खूप चांगले संबंध होते. वाचा काय म्हणाले पवन शर्मा...

  • तुनिषा-शिझानच्या ब्रेकअपवर बहीण फलकचा यु-टर्न:म्हणाली- ब्रेकअप परस्पर संमतीने झाले होते, दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते

टीव्ही अभिनेत्री तुनिषा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझानची बहीण फलक नाजने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने शिझान आणि तुनिषाचे ब्रेकअप परस्पर संमतीने झाल्याचे सांगितले आहे. दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता, असा खुलासा तिने केला. वाचा सविस्तर...

  • तुनिषाला दर्ग्यात नेले नाही - शिझानच्या कुटुंबीयांचा दावा:बहिणी म्हणाल्या- तुनिषाचे कुटुंबासोबतचे नाते ठिक नव्हते, आई तिला कंट्रोल करायची

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आज शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी तुनिषाच्या आईने त्यांच्यावर लावलेल्या आरोपांवर खुलासा केला आहे. तुनिषाच्या आई वनिता शर्मा यांनी शिझानवर खोटे आरोप लावल्याचा दावा शिझानच्या बहिणींनी केला आहे. आम्ही कधीही कुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकू शकत नाही. तिला कधीही दर्ग्यात नेले नाही. तसेच तुनिषाचा हिजाबमधील फोटो हा एका शोमधील होता. तिच्यावर कधीही हिजाब घालण्यासाठी दबाव टाकला नाही, असा खुलासा शिझानच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...