आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुनिषा आत्महत्या प्रकरणी शिझानला दिलासा नाही:कोर्टाची आजची सुनावणी स्थगित, आता 9 जानेवारीला होणार जामिनावर सुनावणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या शीजानच्या जामीन अर्जावर आज म्हणजेच 7 जानेवारीला सुनावणी होणार होती, मात्र आता मुंबईच्या वसई न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख आता 9 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी सांगितले की, तुनिषाचे कुटुंब अद्याप तिच्या मृत्यूनंतर करण्यात येणा-या विधींत व्यस्त आहे. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवता आला नाही. पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी 13 जानेवारीपर्यंत मुदत मागितली आहे. न्यायालयाने पोलिसांना 9 जानेवारीला उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

शिझानच्या वकिलाने जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्याला उत्तर देताना कोर्टाने पोलिसांना नोटीस पाठवून शिझानच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले होते. याबाबत आज सुनावणी होणार होती.

आतापर्यंत 18 जणांची झाली चौकशी
दरम्यान, तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस वेगाने तपास करत आहेत. या तपासावेळी पोलिसांनी दोन आयफोनसह तीन फोन जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 18 जणांची चौकशी केली असून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांच्या मते शिझानने तुनिषा आणि तिच्या आईबरोबर व्हॉट्सअपवर केलेले संभाषण डिलिट करून टाकले आहेत. त्याच्या फोनमधून त्याने दुसऱ्या गर्लफ्रेंडबरोबर केलेले चॅट मिळाले आहे.

आत्तापर्यंत या प्रकरणात काय घडलं, समजून घ्या या 8 मुद्द्यांमध्ये...

1. तुनिषाने 24 डिसेंबर रोजी गळफास घेतला

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला.

2. आत्महत्येच्या 15 दिवस आधी तुनिषाचे ब्रेकअप झाले होते

मुंबईचे एसीपी चंद्रकांत जाधव यांनी सांगितल्यानुसार, तुनिषा आणि तिचा को-स्टार शिझान यांचे अफेअर होते. मृत्यूच्या 15 दिवस आधी त्यांचे ब्रेकअप झाले होते, त्यामुळे 24 डिसेंबरला तुनिषाने तिच्या शोच्या सेटवर गळफास लावून घेतला.

3. आईच्या तक्रारीवरून शिझानला अटक

तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिझान खानला अटक केली. 25 डिसेंबर रोजी त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

4. शिझानने चौकशीदरम्यान तुनिशासोबतचे ब्रेकअप स्वीकारले

26 डिसेंबर रोजी पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान शिझान खानने वय आणि धर्मामुळे तुनिषासोबत ब्रेकअप केल्याचे स्वीकारले. श्रध्दा खून प्रकरण हे देखील त्यांच्या ब्रेकअपचे कारण असल्याचे आरोपीने सांगितले. त्यावेळी देशात जे वातावरण होते त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता, असे शिझान म्हणाला.

5. पोलिसांनी शिझानचा फोन जप्त केला

पोलिसांनी शिझानकडून तीन फोन जप्त केले आहेत. पोलिसांनी शिझानच्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप चॅटची 250 पाने जप्त केली आहेत. यादरम्यान सिक्रेट मैत्रिणीसोबतचे चॅट समोर आले होते. शिझानने ते चॅट आधीच डिलीट केले होते.

पोलिस ते चॅट रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी तुनिषाने आत्महत्या केली, त्याच दिवशी शिझानचे त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबत बोलणे झाले होते.

6. कोर्टाने शिझानच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ केली

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 28 डिसेंबर रोजी न्यायालयाने शिझानच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. शिझान तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

7. न्यायालयाने आणखी एक दिवस कोठडी वाढवली

30 डिसेंबर रोजी न्यायालयाने शिझानच्या कोठडीत आणखी एक दिवसाची वाढ केली होती. शिझानच्या आईची पत्रकार परिषदेनंतर न्यायालयाने पुढील तपासासाठी शिझानच्या पोलिस कोठडीत आणखी एक दिवस वाढ करण्याचा निर्णय घेतला.

8. शिझानच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मुंबईतील वसई न्यायालयाने शनिवारी आरोपी शिझानच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

तुनिषाने 24 डिसेंबर रोजी केली आत्महत्या
तुनिषाने 24 डिसेंबर रोजी शूटिंग सेटवर गळफास लावून आत्महत्या केली होती. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर काही तासांनंतर तिच्या आईच्या तक्रारीवरून तिचा सहकलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली. शिझानवर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. बुधवारी न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवली. शिझान आणि तुनिशा जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या घटनेच्या 15 दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते.

तुनिषा कुठे फाशी घेतली
अल्बमच्या शूटिंगदरम्यान शनिवारी सेटवरील मेकअप रूममध्ये तुनिषाने गळफास लावून घेतला. ही मेकअप रूम शिझान खानची होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर शिझानने सांगितले होते की, जेव्हा तो शूटिंगवरून परतला तेव्हा खोली आतून बंद होती. गेट न उघडल्याने दरवाजा तोडण्यात आला. तुनिषा बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा...

  • गळफास घेण्याआधी शिझानशी बोलली होती तुनिषा:शिझानने सिक्रेट गर्लफ्रेंडसोबतचे चॅट डिलीट केले, तीही टीव्ही अभिनेता - पोलिसांची माहिती

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माचे गळफास घेण्याआधी शिझान खानसोबत बोलणे झाले होते. तसेच आरोपी शिझान हा तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. वाचा सविस्तर...

  • शीझानची बहीण फलक नाज आणि तुनिषाचे नाते होते घट्ट:अंत्यसंस्काराच्या वेळी रडताना दिसली, तीन आठवड्यांपूर्वी तुनिषाने म्हटले होते- माझी आवडती व्यक्ती!

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा सहकलाकार शीझान अहमदला अटक केली आहे. तुनिषाच्या आईने शीझान हा मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. मंगळवारी तुनिषाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एक फोटो समोर आला आहे. या फोटोत आरोपी शीझानची बहीण स्मशानभूमीत रडताना दिसत आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...