आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुषार कपूरने घेतला कधीही लग्न न करण्याचा निर्णय:एका मुलाचा बाबा आहे तुषार, म्हणाला - मी भविष्यात स्वतःला इतर कोणासोबत वाटून घेऊ शकत नाही

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला वाटतं मी योग्य निर्णय घेतला आहे - तुषार

अभिनेता तुषार कपूर मुलगा लक्ष्यचा सिंगर फादर आहे. 2016 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून तुषारच्या मुलाचा जन्म झाला. अलीकडेच एका मुलाखतीत तुषारने त्याच्या लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले आहे. सोबतच भविष्यात स्वतःला इतर कोणासोबत वाटून घेऊ शकत नाही, असेही तो म्हणाला आहे.
मला वाटतं मी योग्य निर्णय घेतला आहे - तुषार
मुलाखतीत तुषारला तू लग्न कधी करत आहेस, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, 'नाही, माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. कारण जर माझा लग्नाचा विचार असता तर मी एकट्याने मुलाचा सांभाळ करायचे का ठरवले असते. मी प्रत्येक दिवशी माझ्या मुलासोबत काही ना काही नवीन करत असतो. त्याच्याशिवाय इतर कोणताही पर्याय मी निवडू शकत नाही. मी स्वतःला इतर कोणासोबत वाटून घेऊ शकत नाही. आताही नाही आणि भविष्यातही नाही. शेवटी सगळे ठीक होते आणि आताही सगळे ठीक सुरू आहे. मला वाटतं मी योग्य निर्णय घेतला आहे,' असे तुषार म्हणाला. मागील वर्षी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तुषारने सांगितले होते की, प्रकाश झा यांनी त्याला सरोगेसीच्या माध्यमातून बाप बनण्याचा सल्ला दिला होता.

'मुझे कुछ कहना है'द्वारे केली होती फिल्मी करिअरची सुरुवात
तुषार हा बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेत जितेंद्र यांचा मुलगा आणि टीव्ही-चित्रपट निर्माती एकता कपूरचा भाऊ आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन येथून शिक्षण घेतलेल्या तुषारचा जन्म 20 नोव्हेंबर 1976 रोजी झाला. 2001 मध्ये करीना कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटाद्वारे तुषारने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्याला बेस्ट मेल डेब्यू अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. पुढच्या दोन वर्षांत त्याचे 'क्या दिल ने कहा', 'ये दिल', 'जीना सिर्फ मेरे लिए' आणि 'कुछ तो है' हे चित्रपट आले, मात्र हे चित्रपट हिट ठरु शकले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...