आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'अदालत', 'सीआयडी', 'सावधान इंडिया', 'क्राइम अलर्ट' या टीव्ही शोमध्ये झळकलेली अभिनेत्री चंद्रिका साहा हिने तिच्या नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिचा नवरा अमन मिश्राने त्यांच्या 15 महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीने केला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
काय घडले नेमके?
41 वर्षीय चंद्रिकाचे लग्न 21 वर्षीय अमन मिश्रासोबत झाले आहे. चंद्रिकाचे अमनसोबतचे हे दुसरे लग्न आहे. 2020 मध्ये घटस्फोटानंतर चंद्रिका अमनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. त्यातच ती प्रेग्नेंट राहिली. पण तिने गर्भपात करावा अशी अमनची इच्छा होती. पण तरीही तिने बाळाला जन्म दिला. बाळ 14 महिन्यांचे झाल्यानंतर गेल्याच महिन्यात दोघांनी लग्न केले होते.
अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी तिचा मुलगा खूप रडत होता आणि त्याच्या शरीरावर जखमा होत्या. अभिनेत्रीने आधी मुलाला रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. घडलेला प्रकार पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अमनने तिच्या मुलाला तीन वेळा जमिनीवर आपटले होते, हे सीसीटीव्हीतून पुढे आले आहे. चंद्रिकाला तिचा मुलगा जखमी अवस्थेत घरामध्ये आढळून आला, तेव्हा ती सीसीटीव्ही फुटेजसह पोलिस ठाण्यात पोहोचली. बांगुर पोलिस ठाण्यात अमनविरोधात अभिनेत्रीने तक्रार दाखल केली असून सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिले आहे.
अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीत सांगितले की, शुक्रवारी ती स्वयंपाकघरात होती, तेव्हा तिने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. तिने अमनला मुलाकडे लक्ष देण्यास सांगितले, तेव्हा तिने पाहिले की अमन त्याला बेडरुममध्ये घेऊन गेला. अभिनेत्रीने काहीच मिनिटांमध्ये तिच्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि धम्म असा आवाजही तिला ऐकू आला. ती धावतच खोलीमध्ये पोहोचली, तेव्हा तिचे बाळ जखमी अवस्थेत पडले होते.
अमन मिश्राविरोधात जुवेनाइल जस्टिस कलम 75 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.