आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उरल्या फक्त आठवणी:ऋषी कपूर यांच्या निधनाला झाले 20 दिवस, भाऊ रणधीर म्हणाले - 'त्यांच्या निधनाच्या दु:खातून कुटुंब अजून सावरलेले नाही'  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही प्रत्येक क्षणाला ऋषीला मिस करतोय, असे रणधीर म्हणाले.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाला 20 दिवसांहून अधिक काळ झाला आहे, परंतु कुटुंबातील सदस्य त्यांच्या निधनाच्या दुःखातून अद्याप स्वतःला सावरु शकलेले नाहीत.

ऋषींच्या निधनानंतर त्यांचे मोठा भाऊ रणधीर कपूर यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बातचित केली.  रणधीर म्हणाले, 'ऋषी यांना गमावल्याचे दुःख खूप मोठे आहे. त्यातून सहजासहजी सावरणे कठीण आहे. पण मी देवाचे आभार मानतो की, त्याने संपूर्ण कुटुंबाला हे दुःख पचवण्याची शक्ती दिली आहे. आम्ही प्रत्येक क्षणाला ऋषीला मिस करतोय. आम्ही दोघांनी मित्र, कुटुंब, भोजन आणि चित्रपटांवर कॉमन बाँडिंग शेअर केली आहे.'

चाहत्यांचे आभार:

रणधीर पुढे म्हणाले, 'जगभरातील लोकांनी ऋषीवर प्रेम केले. आम्हाला सर्व ठिकाणांहून श्रद्धांजलीचे संदेश प्राप्त झाले. काही लोकांनी ऋषीसमवेत घालवलेले क्षणही आमच्याबरोबर शेअर केले.'

'प्रत्येकाला उत्तर देणे अशक्य आहे, परंतु मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि मी माझ्या चाहत्यांना एवढेच सांगू शकतो की, ऋषी त्यांच्या चित्रपटातून कायम जिंवत राहिल.'

ब्लड कॅन्सरने होते पीडित :

ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते. तो 67 वर्षांचे होता. ऋषी ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग)ने पीडित होते. लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंत्यसंस्कारात केवळ 20 लोक उपस्थित राहू शकले होते.

बातम्या आणखी आहेत...