आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रिटी पॅरेंटिंग:आठ वर्षांच्या लेकीला वाचनाची गोडी लागावी म्हणून ट्विंकलही रोज सकाळी तिच्यासोबत 25 पाने वाचते

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलीवूडच्या मॉम्स मुलांचे भविष्य घडवण्यासाठी अवलंबत आहेत अनोख्या पद्धती

पैसे आणि लाडाकोडामुळे मुले बिघडून जातात, असे सामान्यपणे म्हटलं जातं. मात्र बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी मॉम्स आपल्या मुलांच्या पालनपोषणाचा नवा आदर्श घालून देत आहेत. मुलीलाही वाचनाची सवय लागावी म्हणून अभिनेत्री ट्विंकल खन्नाने स्वत:साठी तसेच लेकीसाठी दररोज सकाळी कोणत्या न कोणत्या पुस्तकाची किमान २५ पाने वाचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ट्विंकल दररोज हे उद्दिष्ट गाठण्याचाही प्रयत्न करते.

अभिनेता अक्षयकुमारची पत्नी आणि लेखिका ट्विंकलने मंगळवारी सोशल मीडियावर स्वत:ची एक पोस्ट शेअर केली. सोबतच्या फोटोत या मायलेकी एक पुस्तक वाचत असल्याचे दिसत आहे. ट्विंकलने पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी ८ वर्षांची लेक नितारा हिला सांगितले की, तुला दररोज किमान २५ पाने वाचायची आहेत. मीही २५ पाने वाचून काढेन.’ लेकीने विचारले, पण मम्मा, तुला कोण टार्गेट देतंय? त्यावर मी उत्तरले, ‘मोठं असण्याचा हाच सर्वात किचकट भाग आहे. तुम्हाला तुमच्यासाठी असे टास्क द्यावेच लागतात. त्यावर ठाम राहू, हेही पाहावे लागते.’ ब्रश केल्यानंतर केस न विंचरताच आम्ही दिवसाचा सर्वाेत्तम पद्धतीने शुभारंभ केला. रोज २५ पानांचे बंधन नाही. कधी पाचच पाने वाचली जातात. शेवटी ही साखळी अबाधित राहणे महत्त्वाचे.

‘संवाद करा’सारखे शब्द संस्कारांशी जोडा : ट्विंकल बऱ्याचदा मुलांशी संबंधित अनुभव शेअर करत असते. संगोपनाबाबत सल्लेही देते. तिने २ पुस्तके लिहिलेली आहेत. ती म्हणते, ‘आपल्या देशात आई-वडिलांची पूजा केली जाते. आपण सन्मान करा, आज्ञाधारक बना आदी शब्द एेकत मोठे झालो आहोत. आपण त्यांत संवाद साधा, विनाशर्त प्रेम करा व ‘सहारा बना’ असे शब्द जोडू शकत नाही का?’

या अभिनेत्रींचाही वस्तुपाठ
जीवनशैली : शिल्पा शेट्टीने योगाला अवलंबले आहे. ती मुलगा विवानसोबत योगासने करताना दिसते. त्याला प्रोत्साहितही करते.
आरोग्य : माधुरी दीक्षितचा दोन्ही मुलांनी हात धुवावेत, सकाळी उठताच ब्रश करावे. कितीही उशीर होवो, रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्यावर तिचा भर असतो. हा दंडक ती स्वत:ही पाळत असते.
व्यवहार : डिझायनर सुझान खान आपले निर्णय स्वत: घेत. मुलांत आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून त्यांचे निर्णय त्यांनाच घेऊ देते.

बातम्या आणखी आहेत...