आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री-लेखिका ट्विंकल खन्नाने अलीकडेच ट्वीक इंडिया प्लॅटफॉर्मवर करीना कपूरसोबतच्या गप्पांमध्ये एक मोठा खुलासा केला. आई डिंपल कपाडिया सिंगल मदर असल्याने इच्छा नसतानाही अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवावे लागले, असे ट्विंकलने यावेळी उघड केले. तसेच या शोमध्ये करीनाने तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दलही सांगितले आणि म्हणाली, "अभिनेत्री बनण्यासाठी एक कलाकार व्हावे लागते. लोक म्हणतात की हा सोपा मार्ग आहे, पण मला वाटते की ते खूप कठीण आहे.' करीनाच्या या मताशी सहमत असलेली ट्विंकल म्हणाली की, "मला वाटत नाही की हे सोपे आहे, कारण मी ते करू शकले नाही."
करीना तिच्या करिअरबद्दल बोलली
त्यानंतर ट्विंकलने करीनाला प्रश्न विचारला की, 'कपूर घराण्यातील मुलींना चित्रपटात जाण्याची परवानगी नव्हती, पण तुला चित्रपटात काम करायचे आहे हे तू तुझ्या कुटुंबाला कसे पटवून दिले? करीनाने उत्तर दिले, "माझी आई खूप सपोर्टिव्ह होती. जेव्हा माझ्या वडिलांना कळले की लोलो (करिश्मा कपूर) अभिनेत्री बनू इच्छिते तेव्हा ते थोडे दुःखी झाले होते पण अनेकांना हे देखील माहित असेल की ते खूप मोकळ्या मनाचे आहेत. आमच्यासाठी ते वडिलांपेक्षा अधिक मित्रासारखे आहेत."
ट्विंकलने तिच्या करिअरच्या निवडीबद्दल सांगितले
ट्विंकल तिच्या करिअरच्या निवडीबद्दल पुढे म्हणते, "मला माहित आहे की ही एक चॉइस होती, पण ती माझ्यासाठी नव्हती. मला खरंच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. गरजेपोटी मी अभिनयात आले होते. माझी आई सिंगल मॉम होती आणि तिच्यावर आमची संपूर्ण जबाबदारी होती. मला वाटते की लोलोच्या बाबतीही असेच झाले असावे, तिला कॉलेज सोडावे लागले आणि अभिनयात यावे लागले. आम्ही अगदी लहान वयात करिअरला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या कुटुंबाला आधार देण्याचा हा सर्वात सोपा मार्ग होता."
डिंपल-राजेश विभक्त झाल्यानंतर आईसोबत राहत होती ट्विंकल
ट्विंकलची आई डिंपल कपाडिया यांनी 1973 मध्ये राजेश खन्नासोबत लग्न केले आणि 1982 मध्ये दोघे वेगळे झाले होते. त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली आहेत. विभक्त झाल्यानंतर ट्विंकल आणि रिंकी दोघीही आईसोबत राहू लागल्या. ट्विंकलने जानेवारी 2001 मध्ये अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आरव आणि एक मुलगी नितारा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.