आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या मृत्यूमध्ये नवा दावा:माजी मॅनेजरने सांगितले - सुशांतला स्टाफने मिळून मारले, तो दरवाजे बंद करुन झोपत नव्हता, भाऊ नीरज म्हणाला - साक्षिदारांची हत्या होऊ शकते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचा माजी मॅनेजर अंकितने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे
  • सुशांतचा भाऊ जीरज म्हणाला - साक्षिदारांची हत्या होऊ शकते, मुंबई पोलिस सुरक्षात देत नाहीये

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाला दोन महिने उलटून गेले आहेत, परंतु त्याचे कथानक गुंतागुंतीचे होत आहे. आता त्याचा माजी मॅनेजर अंकित आचार्य यांनी दावा केला आहे की सुशांतला त्याच्या कर्मचार्‍यांनी मिळून मारून टाकले. अंकितने असा दावाही केला आहे की, सुशांत प्रकरणात साक्षीदार झाल्यास त्यांची हत्या केली जाईल, अशी धमकी फोनवर चार दिवसांपूर्वी मिळाली होती. दुसरीकडे सुशांतचा चुलत भाऊ आणि पाटणा येथील आमदार नीरज सिंग यांनीही साक्षीदारांच्या हत्येचा अंदाज वर्तविला आहे.

माजी व्यवस्थापक अंकितने एका वाहिनीशी झालेल्या संभाषणात 5 दावे केले

  1. 'सुशांत आत्महत्या करू शकत नाही, कारण तो एक सकारात्मक मनुष्य होता. तो इतरांना प्रोत्साहन द्यायचा. सुशांत जेव्हा जेव्हा नाराज होता तेव्हा तो रडायचा किंवा लिहायचा'
  2. 'मी जोपर्यंत सुशांतसोबत काम करत होतो तोपर्यंत तो कधीच खोलीचा दरवाजा बंद करुन झोपला नाही'
  3. 'मी गेल्यानंतर दीपेशला कामावर घेण्यात आले. सुशांतची काळजी घेणे हे दीपेशचे मुख्य काम होते'
  4. 'जर सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता. तर त्याच्या कर्मचार्‍यांनी तो का उघडले नाही?'
  5. 'रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वी कृती मॅडम त्याच्या आयुष्यात होती. जेव्हा कृती मॅडम होत्या तेव्हा सुशांत डिप्रेशनमध्ये नव्हते, परंतु त्यानंतर त्याचे काय झाले हे मला माहिती नाही.'
  6. 'जेव्हा मी ऑगस्ट 2019 मध्ये माझ्या गावातून परत आलो तेव्हा मला अचानक त्यांचे संपूर्ण कर्मचारी बदललेले आढळले. त्यांच्या नवीन अंगरक्षकाने मला त्याच्या घरात प्रवेशदेखील केला नाही. मला दिसले की रिया मॅडमने संपूर्ण कर्मचारी बदलले आहेत. त्यांनी हे का केले हे मला माहिती नाही.'

पंख्याला लटकलेला मिळाला होता मृतदेह
सुशांत (34) चा मृतदेह 14 जूनला मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेला मिळाला होता. तेव्हापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत या प्रकरणात कमीत कमी 56 जणांची चौकशी झाली आहे. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...