आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरणात 'ईडी'ची उडी:ईडीने दाखल केला गुन्हा, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर लावला 15 कोटी रुपये हडपल्याचा आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी गुरुवारी ईडीने बिहार पोलिसांकडून एफआयआर आणि सुशांतच्या बँक खात्यांचा तपशील घेतला होता.
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची ईडीकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत आता ED म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने उडी घेतली आहे. शुक्रवारी ईडीने पीएमएलए अंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप केला. पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर पैसे हडपल्याचा आरोप केला आहे.

  • गुरुवारी ईडीने बिहार पोलिसांकडून तपशील घेतला

यापूर्वी गुरुवारी ईडीने बिहार पोलिसांकडून एफआयआर आणि सुशांतच्या बँक खात्यांचा तपशील घेतला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला. यासंदर्भात फडणवीस यांनी ट्विट केले आहे. 'एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने मनी लाँडरिंगच्या कोनातून त्याचा तपास सुरू करायला हवा', असे ट्विट फडणवीसांनी केले. सीबीआय चौकशीबाबत राज्य सरकारने लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.

  • स्टार्ट अप आणि पैसे ट्रान्सफर हे चौकशीचे कारण ठरले

सुशांतच्या वडिलांनी त्याच्या बँक खात्यातील 15 कोटी रुपये तीन वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप केला आहे. ही खाती रिया, तिचा भाऊ शोविक आणि तिच्या आईच्या नावी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. सुशांत आणि रियाने एकाच वेळी तीन स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे. सुशांतला आयटी उद्योजक बनायचे होतं. त्यासाठी तो गुंतवणूक देखील करत होता. अशीच एक गुंतवणूक त्याने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या नावे असलेल्या कंपनीत केली असल्याची माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये ही कंपनी सुरु करण्यात आली होती. ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) आणि प्रयोगशील तंत्रज्ञानात काम करत होती. केवळ उद्योजक बनून कमाई न करता आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने त्याने गरीब आणि कुपोषित मुलांसाठी एक संस्था सुरु केली होती.

  • सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय, ईडी चौकशीची मागणी केली होती.