आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BoycottRadhikaApte:बोल्ड सीन देणा-या राधिका आपटेला ट्विटरवर बायकॉट करण्याची मागणी, यूजर म्हणाले - तुझ्यामुळे भारतीय संस्कृतीची बदनामी होत आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय आहे कारण?

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिने चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. अंधाधुन, पार्च्ड, पॅडमॅन, मांझी : द माउंटन मॅन, बदलापूर, सेक्रेड गेम्स या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये तिने आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. पण आता राधिका आपटेवर बहिष्कार घालण्याची मागणी ट्विटरवर ट्रेंड होऊ लागली आहे.

काय आहे कारण?
राधिका आपटेने पार्च्ड, हंटर या चित्रपटांमध्ये न्यूड सीन दिले आहेत. त्यातील पार्च्ड हा २०१६ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातील काही बोल्ड सीनचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे राधिकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. काही युझर्सने 'राधिकामुळे भारतीय संस्कृतीची बदनामी होत आहे,' असा आरोप केला आहे.

राधिकाच्या या बोल्ड फोटोंमुळे तिला ट्रोल केले जात आहे. हिंदी सिनेमांमधून अशा पद्धतीने बोल्ड सीन दाखवले जातात. त्यामुळे भारतीय संस्कृतीची बदनामी होतेच. त्याचप्रमाणे देशात अश्लिल सिनेमा पाहण्याचे प्रमाणही वाढते, असे मत काही युझर्सनी व्यक्त केले आहे.

राधिका आपटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'रात अकेली है' या चित्रपटात ती दिसली होती. तर 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासह राजकुमार राव आणि हुमा कुरैशी लीड रोलमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...