आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या घरात दोन विवाह सोहळे:एका दशकानंतर दोन लग्नांच्या सेलिब्रेशनमध्ये कंगनाचे कुटुंबीयांनी मग्न, अभिनेत्रीने लिहिले- माझ्या भावांनी शाप पुसून काढला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाचा भाऊ अक्षतचे लग्न नोव्हेंबरमध्ये आहे.

अभिनेत्री कंगना रनोटच्या घरात सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. तिच्या घरी एक नव्हे तर दोन विवाह सोहळ्यांची तयारी सुरु आहे. एक म्हणजे तिचा सख्खा भाऊ अक्षत आणि दुसरा कजिन करण यांचे लग्न आहे. रविवारी कंगनाने अक्षतचा 'बधाई' व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता तिने करणच्या हळदीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

'लग्नाच्या उत्सवात आमचे वडिलोपार्जित घर मग्न आहे'
कंगनाने आपल्या पोस्टसह लिहिले आहे, "रंगोलीच्या लग्नानंतर एक दशक उलटून गेले आहे, तेव्हापासून आमच्या कुटुंबात लग्न सोहळा झालेला नाही. याचे श्रेय मला जाते. पण माझे भाऊ करण आणि अक्षत यांनी हा शाप पुसून काढला आहे. आमचे वडिलोपार्जित घर विवाहाच्या उत्सवात मग्न आहे. तीन आठवड्यात दोन लग्ने. आज करणला हळद लागली", अशी पोस्ट कंगनाने टाकली आहे.

  • रविवारी अक्षतचा बधाई व्हिडिओ शेअर केला होता

कंगनाने रविवारी अक्षतचा बधाई व्हिडिओ शेअर करुन सांगितले होते की, बधाई ही हिमाचलची एक परंपरा आहे. याची सुरुवात मामाच्या घरी लग्नाचे पहिले आमंत्रण पाठवून होते. यानंतर उर्वरित लोकांना आमंत्रणे पाठविली जातात.

कंगनाचा भाऊ अक्षतचे लग्न नोव्हेंबरमध्ये आहे. कंगनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या कुटुंबातील सदस्य हिमाचली गाण्यांसह करणला हळद लावताना दिसत आहेत. खुद्द कंगना या विधीचा आनंद घेताना दिसत आहे. 2011 मध्ये कंगनाची बहीण रंगोलीचे लग्न दिल्लीतील बिझनेसमन अजय चंदेलसोबत झाले होते. त्यानंतर आता एवढ्या वर्षांनी तिच्या घरी लग्न सोहळे होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...