आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतवर चित्रपट:जिवंत असताना 7 चित्रपटांतून काढून टाकण्यात आले, आता निधनाच्या आठवड्याभरातच दोन निर्मात्यांनी केली बायोपिक बनवण्याची घोषणा 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निखिल आनंद सुशांतच्या आयुष्यावर हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपट बनवणार आहेत.
  • विजय शेखर गुप्ता-शमिक मौलिकसुद्धा सुशांतशी संबंधित कथेवर चित्रपट बनवणार आहेत.

इंजिनियरिंग स्टुडंट, बॅकग्राऊंड डान्सर, टीव्ही अभिनेता आणि त्यानंतर बॉलिवूडचा चमकता तारा राहिलेला सुशांत सिंह राजपूत आता एक कथा बनला आहे. 14 जून रोजी आत्महत्या करुन सुशांतने या जगाचा कायमचा निरोप घएतला. आता दोन मेकर्स त्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. दोन निर्मात्यांनी याची घोषणादेखील केली आहे. पहिली बायोपिक असून त्याची घोषणा दिग्दर्शक निखिल आनंद यांनी केली आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल, ज्यासाठी सार्वजनिक निधीतून पैसे जमा केले जातील. दिग्दर्शक शामिक मौलिक यांनीही सुशांतच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे.

  • तीन भाषांमध्ये बनणार चित्रपट

निखिल आनंद हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये सुशांतच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहेत. याशिवाय अद्याप नाव न ठरलेल्या या चित्रपटाचे अधिकृत सोशल मीडिया पेज बनवले जाईल. मिड-डेच्या वृत्तानुसार, निखिल सुशांतला श्रद्धांजली म्हणून या चित्रपटाचे वर्णन केले आहे. ते म्हणतात- मला त्याला सिनेजगतात अजरामर करायचे आहे. मला आशा आहे की यातून धडे घेत बॉलिवूड घराणेशाहीपेक्षा प्रतिभेला अधिक पसंती देईल.

आनंद म्हणतात, "साथीची परिस्थिती सुधारताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या काही महिन्यांत सुरुवात होईल. या दरम्यान चित्रपटाची टीम कथेवर आणि कास्टवर काम करेल. हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होईल. आमचा प्रयत्न हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्याचा आहे, जेणेकरुन लोक सुशांतच्या आयुष्यातून प्रेरणा घेतील', असे आनंद यांनी सांगितले.  चित्रपटाच्या तयारीसाठी आनंद यांनी सुशांतचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रांना भेटण्याची योजना आखली आहे जेणेकरून ही कथा खरी असेल.

  • शमिक म्हणाले - मी बॉलिवूडचा पर्दाफाश करेन

विजय शेखर गुप्ता आणि शमिक मौलिक यांनीही सुशांतवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. चित्रपटाचे शीर्षक 'सुसाइड या मर्डर: ए स्टार वॉज लॉस्ट' हे आहे.  चित्रपटाची पार्श्वभूमी नसलेल्या सुशांते इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख कशी निर्माण केली, हे शमिक आपल्या चित्रपटातून सांगणार आहेत. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडचा पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. चित्रपटात सुशांतच्या आयुष्यात घडलेल्या त्या प्रत्येक घटनेचा उल्लेख असेल, ज्यामुळे त्याने आपले जीवन संपवले. 

  • सुशांतची निर्माता होण्याची योजना होती

स्पॉट बॉयच्या वृत्तानुसार, सुशांत निर्माता होण्याची योजना आखतहोता. तो त्याचा मित्र आणि दिग्दर्शक संदीप सिंहच्या ‘वंदे भरतम’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता म्हणून पदार्पण करणार होता. आता संदीपने चित्रपटाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. यात सुशांत तिरंग्यात दिसतोय. संदीपच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात सुशांत अभिनयदेखील करणार होता.

बातम्या आणखी आहेत...