आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ullu App च्या CEO वर आरोप:आणखी दोन पीडितांचा विभू अग्रवालवर विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप, म्हणाल्या - या अ‍ॅपवर देखील पॉर्न कंटेंट प्रसारित केला जातो

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विभू अग्रवालवर 4 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला

Ullu (उल्लू) अ‍ॅपचा CEO विभु अग्रवालच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अलीकडेच त्याच्या कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्याने त्याच्यावर लैंगिक छळ आणि विनयभंगाचा आरोप केला होता. आता आणखी दोन पीडितांनी विभू अग्रवालवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपप्रमाणेच विभू अग्रवालच्या उल्लू अ‍ॅपवरदेखील पॉर्न कंटेंट दाखवला जातो, असा खुलासादेखील या दोन तरुणींनी केला आहे. आता विभूने पॉर्न कंटेंट त्याच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकल्याचेही त्यांनी सांगितले.

पीडितेवर अनेक आठवडे मानसिक अत्याचार करण्यात आले
या वर्षी फेब्रुवारीमध्ये राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश करणारी सागरिका शोना सुमन या दोन पीडितांपैकी एका तरुणीला ओळखते. सागरिका म्हणाली की, पीडित मुलीवर अग्रवालने अनेक आठवडे मानसिक अत्याचार केले.

सागरिका सुमनने सांगितल्यानुसार, "उल्लूच्या विभू अग्रवालविरोधात लैंगिक छळ, विनयभंग आणि मानसिक छळाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मी बुधवारी पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यातील सर्व नावे उघड करणार आहे. पीडित तरुणी पुढे येण्यास घाबरतात. कारण अग्रवालकडे वकिलांची एक टीम आहे. ते पीडित तरुणींविरोधात खोट्या तक्रारी दाखल करतात. अनेक प्रकरणात पोलिस त्यांना पाठिशी घालत आहेत.'

अनेक प्रकरणात पोलिस अग्रवालचा बचाव करत आहे
सागरिका सुमन पुढे म्हणाली, "पीडित मुलीने आरोप केला आहे की, उपनगरीय मुंबईच्या अंधेरीतील आंबोली पोलिस स्टेशनसोबत विभू अग्रवालचे साटेलोटे आहे. तेथील अधिकारी सध्याच्या प्रकरणात विभू अग्रवालला संरक्षण देत आहेत."

विभू अग्रवालवर 4 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता विभू अग्रवाल विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून विभूविरोधात भादंवि कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभू व्यतिरिक्त, त्याच्या कंपनीत कंट्री हेड असलेल्या अंजली रैनाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध 4 ऑगस्ट रोजी आंबोली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. 28 वर्षीय पीडितेने आरोप केला आहे की, विभूची कंपनी उल्लू डिजिटलच्या ऑफिसमधील स्टोअर रूममध्ये तिचा विनयभंग करण्यात आला.

उल्लूचे स्पष्टीकरण - तक्रार दाखल करणारी स्वतः आरोपी आहे
या संपूर्ण वादावर, कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उल्लूने 10 जून रोजी लखनौ पोलिसांच्या सायबर सेलमध्ये अज्ञात लोकांविरोधात फसवणूक आणि लाखो रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात, आयपी अ‍ॅड्रेसच्या चौकशीत उल्लूची माजी कायदेशीर प्रमुख, एक महिला आणि तिचा साथीदार यामागे असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील आरोपींनी आता विभू अग्रवाल आणि अंजली रैना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत काउंटर अटॅक करताना महिलांसाठी बनवलेल्या कायद्याचा गैरवापर केला आहे.

विभू यांनी 2018 मध्ये ULLU अ‍ॅप लाँच केले
विभू अग्रवाल उल्लू डिजीटल नावाने कंपनी चालवत होता. उल्लू अ‍ॅप अश्लील कंटेटसाठी ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी, एका मुलाखतीदरम्यान, विभू अग्रवालने उल्लू प्लॅटफॉर्मचा कंटेंट कौटुंबिक कंटेंटमध्ये बदलण्यात येणार असल्याचे सांगितले होते. 2013 मध्ये विभू अग्रवालने 'बात बन गई' या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याने 2018 मध्ये ULLU अ‍ॅप लाँच केले होते. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, या अ‍ॅपवर भोजपुरी, बंगाली, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि गुजराती भाषेत अ‍ॅडल्ट कंटेंट दाखवला जातो.

बातम्या आणखी आहेत...