आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफी प्रकरण:राज कुंद्राविरूद्ध डायरेक्ट एविडन्स नाही, परंतु त्याचे नाव चेन ऑफ एविडन्समध्ये सामील, जो ठोस पुरावा असू शकतो

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरिष्ठ वकील उज्ज्वल निकल यांनी दैनिक भास्करसोबत राज कुंद्रा प्रकरणी खास बातचीत केली.

अश्लील चित्रपट बनवणे आणि ते अ‍ॅपवरून स्ट्रीम केल्याप्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या संभाषणावरून असे दिसून आले आहे की या प्रकरणात राज कुंद्रा आर्थिक व्यवहारात सामील होता. मॉडेल, अभिनेत्रींच्या असहाय परिस्थितीचा फायदा घेत त्याने त्यांना अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले.

याप्रकरणी दैनिक भास्करने वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली. या दरम्यान राज कुंद्राविरोधात कायदेशीर कारवाई शक्य आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या संभाषणातील महत्त्वाचा अंश -

  • राज कुंद्रावरील आरोप गंभीर आहेत, ते सिद्ध झाल्यास त्याला काय शिक्षा होऊ शकते?

उज्ज्वल निकम - शिक्षेबाबत सध्या काही बोलणे कठीण आहे. कारण हे प्रकरण अद्याप चौकशीच्या टप्प्यावर आहे. पुढे कागदोपत्री पुरावे असतील. त्याआधारे, तपास यंत्रणेकडून कोणते दावे केले जातात, हे सर्व त्याच्यावर अवलंबून असेल. राजविरूद्ध डायरेक्ट एविडन्स नाही, परंतु त्याचे नाव चेन ऑफ एविडन्समध्ये आहे, आणि जर ते योग्य पद्धतीने जोडले गेले तर त्याच्याविरूद्ध ठोस पुरावे असू शकतात.

  • केवळ व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरील राज कुंद्राच्या चर्चा, त्याच्याविरोधात किती ठोस पुरावे ठरु शकतात?

उज्ज्वल निकम - जे व्यक्तीच्या मोबाइलवरुन चॅट झाले आहेत, त्यावरून तोही त्यात सामील असण्याची शक्यता असते. ज्या व्यक्तीच्या मोबाइलवरुन चॅट झाले आहेत, जर ती व्यक्ती त्याने चॅट केले नसून सर्व बनावट आहेत, हे सिद्ध करु शकला तर काही पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

  • भारतात काय नियम आहे, पॉर्न बनवणा-या व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकते?

उज्ज्वल निकम - केवळ पॉर्न बनवणेच नाही, तर एखाद्यास त्यात आमंत्रित करणे देखील गुन्हा आहे. भारतात यावर बंदी आहे.

  • 'उल्लू' किंवा 'अल्ट बालाजी' अ‍ॅपवर जो बोल्ड आणि इरॉटिक कंटेंट असतो, तो कोणत्या प्रकारात येईल? उदाहरणार्थ 'गंदी बात' सारखी सीरिज?

उज्ज्वल निकम - कायद्यानुसार हे सर्व गुन्हेगारीच्या कक्षेत येतात. हे पोलिसांवर अवलंबून आहे. 'गंदी बात' अश्लीलतेच्या कक्षेत येते. मात्र, राज कुंद्रा प्रकरणात मॉडेल्सनीही आरोप केले आहेत, त्यानंतर पोलिसांनी दखल घेतली आहे.

  • जर कोणी एखाद्यावर आरोप करत नसेल आणि ती व्यक्ती इरॉटिक कंटेंट बनवत राहिली तर त्या प्रकरणातही पोलिस संबंधित निर्मात्यांविरूद्ध कारवाई करू शकतात?

उज्ज्वल निकम - नक्की कारवाई करु शकतात. पोलिस स्वत: अ‍ॅक्शन घेऊ शकतात. तो पोलिसांचा अधिकार आहे.

बातम्या आणखी आहेत...