आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायकात दिसत आहेत रिकव्हरीची चिन्हे:यूकेचे सर्जन चार्ल्स अंडुका म्हणाले - जस्टिन बीबर उपचाराने लवकर बरा होईल

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जस्टिनच्या चेह-याला अर्धांगवायू झाल्यामुळे शो रद्द झाले

हॉलिवूडचा पॉप गायक जस्टिन बीबरने व्हिडिओ शेअर करत त्याला 'रामसे हंट सिंड्रोम' नावाचा आजार झाल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर ब्रिटनचे प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन चार्ल्स अंडुका यांनी सांगितल्यानुसार, जस्टिन लवकरच बरा होईल, त्याची रिकव्हरी चांगल्या प्रकारे होत आहे. डॉक्टरांनी एका मुलाखतीत सांगितले की, सुरुवातीच्या टप्प्यावर स्टेरॉईड आणि अँटीव्हायरल उपचार घेणारे 75 टक्के रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे होतात.

यूकेतील सर्जनने जस्टिन लवकर बरे होण्याचे संकेत दिले
चार्ल्स यांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, "मिस्टर बीबर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, माझ्या लक्षात आले आहे की त्यांच्यात बरे होण्याची चांगली चिन्हे दिसत आहेत. चेहऱ्याच्या अर्धांगवायूची सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे डोळ्याची पापणी न पडले आणि हसता न येणे. असे रुग्ण माझ्याकडे आहेत. अशा रुग्णांमध्ये आधी चेहरा पुर्वीसारखा होतो आणि नंतर त्यांचे नाक आणि चेहऱ्याचे स्नायू सुधारतात. त्यानंतर ते हसण्यास सक्षम होतात. मला आशा आहे की बीबर उपचारातून लवकरच बरे होतील."

जस्टिनच्या चेह-याला अर्धांगवायू झाल्यामुळे शो रद्द झाले
जस्टिन बीबरने येत्या काळातले काही शोज रद्द केल्याने त्याचे चाहते खूप नाराज झाले. टोरंटो आणि वॉशिंग्टन डीसीमधील शो रद्द केल्यानंतर जस्टिनने एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करून त्याने चाहत्यांना त्याचा कॉन्सर्ट शो का रद्द करत आहे, याबद्दल सांगितले. सध्या आपण स्टेजवर फिजिकली परफॉर्म करू शकत नाही. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्यास सांगितले आहे, असा खुलासा जस्टिनने केला.

व्हिडिओत तो म्हणाला, 'ही गोष्ट खूपच गंभीर आहे, तुम्ही बघू शकता. असे व्हायला नको होते, असे मला वाटते; पण माझे शरीर मला थोडे थांबून आराम करायला सांगत आहे. मला आशा आहे, की तुम्ही समजून घ्याल. पुढचा काही वेळ मी विश्रांती आणि आराम करणार आहे, जेणेकरून मी 100 टक्के बरा होऊ शकेन आणि परत येऊन मी ते करीन, ज्यासाठी माझा जन्म झालाय.’

तो पुढे म्हणाला, 'मला हा आजार एका व्हायरसमुळे झाला आहे. त्याने माझ्या चेहऱ्याच्या नर्व्ह्जवर हल्ला केला आहे. यामुळे माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे पॅरालिसिस झाला आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या एका डोळ्याची पापणी लवत नाही. मला या बाजूने हसताही येत नाही आणि या बाजूची माझी नाकपुडीही हलत नाही.’

लवकरच बरा होऊन परत येईन, असे जस्टीन म्हणाला आहे. ‘मी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार चेहऱ्याचा व्यायाम करत आहे, जेणेकरून माझा चेहरा पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होऊ शकेल. यासाठी किती वेळ लागेल माहीत नाही; पण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे,’ असे तो म्हणाला आहे.

वयाच्या 13 व्या वर्षी मिळाली होती प्रसिद्धी
जस्टिनने वयाच्या 13 व्या वर्षी प्रसिद्धी मिळवली होती. वास्तविक त्याच्या आईने त्याचा गातानाचा एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. आणि त्यानंतर तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने 'बेबी' आणि 'बिलिव्ह'सारखे हिट चार्टबस्टर दिले. जस्टिनने 22 नामांकनांपैकी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. मार्चमध्ये जस्टिनची पत्नी हेली बीबरला मेंदूमध्ये रक्त गोठल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रामसे हंट सिंड्रोम म्हणजे काय?
रामसे हंट सिंड्रोम म्हणजेच RHS हा एक दुर्मिळ न्यूरॉलॉजिकल आजार आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर वेदनादायक पुरळ उठते. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर पॅरालिसिस होऊ शकतो. यामुळे बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते. जेव्हा व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या नर्व्ह्जना संसर्ग करतो तेव्हा हा दुर्मिळ आजार होतो.

बातम्या आणखी आहेत...