आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कॉमेडी क्वीन टुनटुनची कहाणी:नातेवाईकांनी आई-वडील आणि भावाची हत्या केली, वयाच्या अडीच वर्षापासून नोकरासारखे वागवले

अरुणिमा शुक्ला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या सुरुवातीच्या दिवसांत चित्रपटांमध्ये फक्त मेल कॉमेडियन असायचे. पण मग एका लठ्ठ मुलीने कॉमेडियन बनून हिंदी चित्रपटसृष्टीचे नवे पर्व सुरू केले. तिचे नाव होते उमा देवी. हे खरं तर त्यांचे खरे नाव होते, चित्रपटसृष्टीत त्यांना टुनटुन या नावाने ओळखले जाते. दिलीप कुमार यांनी त्यांना हे नाव दिले होते. कधी मोठ्या पडद्यावर टुनटुन यांनी हिरोईनची मैत्रीण साकारली, तर कधी नायकाची बहीण बनून लोकांना हसवले. मात्र, टुनटुन यांचे खरे आयुष्यच इतके वेदनादायी होते की त्याची कल्पनाही करणे कठीण आहे.

वयाच्या अवघ्या अडीच वर्षापासून सुरू झालेली संघर्षांची मालिका वयाच्या 80 व्या वर्षी अज्ञात आजाराशी लढत मृत्यूने संपली. त्या अडीच वर्षांची असताना नातेवाईकांनी मालमत्तेसाठी आई, वडील आणि भावाची हत्या केली. अनाथ टुनटुन आपल्याच नातेवाईकांच्या घरी मोलकरीण बनून राहिल्या. परिस्थिती अशी होती की ज्या नातेवाईकाला घरकामासाठी मोलकरणीची गरज भासायची, त्या घरी त्यांना पाठवले जायचे. वर्षे सरत गेली, काळ बदलत गेला पण परिस्थिती बदलली नाही.

एके दिवशी नशिबाने कलाटणी दिली आणि त्या गायिका होण्यासाठी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून मुंबईला पळून आल्या. संघर्ष केला, गायिकाही झाल्या. पहिले गाणे देखील त्या काळातील चार्टबस्टर होते. अफसाना लिख रही हूं दिल-ए-बेकरार हे ते गाणे होते. अशी अनेक हिट गाणी त्यांनी दिली, पण नंतर नशिबाने पुन्हा कलाटणी दिली आणि त्या अभिनय क्षेत्रात आल्या. येथे संघर्ष आणि यश दोन्ही होते.

आज गायिका आणि कॉमेडियन टुनटुन यांची 20 वी पुण्यतिथी आहे. वाचा, हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या कॉमेडी क्वीनची वेदनादायी कहाणी...

अडीच वर्षांच्या असताना झाली होती आईवडिलांची हत्या
टुनटुन यांचा जन्म 11 जुलै 1923 रोजी अमरोहा, उत्तर प्रदेश येथे झाला. आई-वडिलांनी तिचे नाव उमादेवी खत्री ठेवले. टुनटुन अवघ्या अडीच वर्षांच्या असताना एके दिवशी त्यांच्या आईवडिलांची जमीन ताब्यात घेण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्या त्यांचा 9 वर्षांचा भाऊ हरी यांच्यासोबत राहत होत्या. हरी आईवडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेत असे.

भावाच्या हत्येनंतर नातेवाईकांच्या घरी झाल्या मोलकरीण
टुनटुन अवघ्या 4 वर्षांचा असताना याच जमिनीसाठी त्यांच्या भावाचीही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर टुनटुन अनाथ झाल्या. अशा परिस्थितीत त्यांना नातेवाईकांच्या घरी सोडण्यात आले. नातेवाईकांनी त्यांना ठेवले, पण दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना घरातील सर्व कामे करावी लागायची. टुनटुन यांना नोकरांसारखी वागणूक दिली जात असे. अशाच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. अत्यंत गरीबीत त्यांचे बालपण गेले होते.

फाळणीमुळे मित्र विभक्त झाला

यादरम्यान टुनटुन यांची उत्पादन शुल्क अधिकारी अख्तर अब्बास काझी यांच्याशी भेट झाली होती. अख्तर अब्बास यांनी टुनटुन यांची गायनाची प्रतिभा ओळखली. त्यांनीच टुनटुन यांना गायिका होण्याचा सल्ला दिला होता. टुनटुन वयाच्या 14 व्या वर्षापासून चांगल्या गायच्या. अख्तर यांच्यासोबतची त्यांची मैत्री फार काळ टिकली नाही आणि फाळणीनंतर अख्तर अब्बास काझी पाकिस्तानात गेले.

मुंबईत आल्यानंतर नौशादला धमकावले
टुनटुन गरीबी आणि नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळल्या होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी चित्रपटात गाण्याचे ठरवले होते. त्यामुळे त्या सर्व सोडून मुंबईला पळून गेल्या. परंतु मुंबई त्यांच्याकडे राहायला जागा नव्हती. त्या फक्त संगीतकार नौशादला ओळखत होत्या. त्यामुळे त्या त्यांच्या घरी गेल्या आणि जोरजोरात दरवाजा ठोठावू लागल्या. एका महिलेला असे पाहून नौशाद घाबरले. त्यांनी दार उघडताच टुनटुन म्हणजेच उमा देवी यांनी त्यांच्याकडे चित्रपटात गाणी गाण्याची संधी देण्यासाठी हट्ट धरला. नौशाद यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही, त्यामुळे टुनटुन यांनी त्यांना म्हटले की, जर तुम्ही मला गाण्याची संधी दिली नाही तर मी आत्महत्या करेन, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. टुनटुन यांच्या या बोलण्याने नौशाद अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्यांना गाणे म्हणायला सांगितले. टुनटुन यांचे गाणे ऐकून नौशाद खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना गाण्याचा पहिला ब्रेक दिला. खरे तर टुनटुन कुठेही गाणे शिकल्या नव्हत्या. पण तरीही त्यांना गाण्याची समज असल्याचा नौशाद यांना आनंद झाला. "अफसाना लिख ​​रही हूँ दिल बेकरार का" हे त्यांनी गायलेले त्यांचे पहिले गाणे होते.

पहिले गाणे ठरले होते सुपरहिट
टुनटुन यांचे पहिले गाणे इतके हिट झाले की, त्यानंतर त्यांना सतत गाण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्याच्या गाण्यांची क्रेझ खूप पाहायला मिळाली. टुनटुन यांनी 40 ते 45 गाणी चित्रपटांमध्ये गायली. पुढे आशा भोसले, लता मंगेशकर, नूरजहाँ या गायिकांच्या आगमनामुळे टुनटुन यांना गाणी मिळणे बंद झाले.

गाणे ऐकून पाकिस्तानातून मुंबईत आला मित्र
टुनटुन यांच्या गाण्यांना खूप मोठा चाहतावर्ग होता. एके दिवशी पाकिस्तानात बसलेला त्यांचा मित्र अख्तर अब्बास काझी याने रेडिओवर त्यांचे गाणे ऐकले. यामुळे ते खूप खूश झाले आणि टुनटुनच्या भेटीसाठी ते पाकिस्तानातून मुंबईत आले. त्यानंतर काही काळानंतर दोघांचे लग्न झाले. दोघांना 4 मुले होती.

नौशाद यांनी अभिनय करण्याचा दिला होता सल्ला
टुनटुन खूप बबली होत्या. त्यांची कॉमिक टायमिंग उत्कृष्ट होती आणि त्या एवढ्या लठ्ठ होत्या की, लोक त्यांना पाहून हसायचे. एके दिवशी नौशाद त्यांना भेटायला गेले तेव्हा गाण्यांच्या ऑफर्स येत नसल्याने त्या अडचणीत होत्या. तेव्हा नौशाद यांना त्यांच्यात आणखी एक प्रतिभा दिसली आणि त्याच वेळी नौशाद यांनी त्यांना अभिनय करण्याचा सल्ला दिला.

दिलीप कुमार यांच्यावर होते क्रश आणि त्यांच्यासोबतच मिळाला पहिला चित्रपट
टुनटुन यांचे दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम होते आणि योगायोगाने त्यांना त्यांच्यासोबतच पहिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी घडले असे की, दिलीप कुमार हे नौशाद यांचे खूप चांगले मित्र होते. त्यामुळेच नौशाद यांनीच दिलीप यांना चित्रपटासाठी टुनटुन यांचे नाव सुचवले होते. त्यावेळी दिलीप यांच्या 'बाबुल' या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू होती. या चित्रपटात दिलीप कुमार आणि नर्गिस मुख्य भूमिकेत होते आणि टुनटुन यांना साईड रोल मिळाला होता.

टुनटुन यांचे खरे नाव उमा देवी होते. चला तर मग जाणून घेऊया उमा देवी टुनटुन कशा बनल्या.

1950 ची ही गोष्ट आहे. 'बाबुल' हा चित्रपट प्रदर्शित झाला. टुनटुन यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी टुनटुन यांना मिळाली होती. चित्रपटातील एका सीनमध्ये टुनटुन यांना दिलीप कुमार यांना धडकून बेडवर पडायचे असते. या सीनच्या शूटिंगदरम्यान टुनटून पडल्यावर कोणाला तरी उचला या टुनटुनला असे दिलीप कुमार म्हणतात.

दिलीप कुमार यांच्या तोंडून बाहेर पडलेले हे नाव उमा देवी यांना इतके आवडले की, त्यानंतर त्या टुनटुन झाल्या. या नावाने त्या एवढी मोठी इनिंग खेळतील हे कदाचित त्यावेळी कुणालाही वाटलं नसेल.

एक एक चित्रपट करत बनल्या फिल्म इंडस्ट्रीतील पहिली महिला कॉमेडीयन
टुनटुन यांनी अनेक हिट चित्रपट केले आणि त्या यशाच्या पायऱ्या चढत गेल्या. सर्व दिग्दर्शक विनोदी भूमिकांसाठीच त्यांच्याशी संपर्क साधू लागले. त्यांनी आपल्या अभिनयाचा असा ठसा उमटवला की, त्या भारताच्या पहिली महिला विनोदी कलाकार ठरल्या. काळ असा होता की, चित्रपटांमध्ये खास त्यांच्यासाठी भूमिका लिहिल्या गेल्या होत्या. टुनटुन यांनी त्या काळातील सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले होते.

पतीच्या निधनानंतर इंडस्ट्रीपासून दुरावल्या
प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर टुनटुन यांच्या चित्रपटांची संख्या कमी होऊ लागली. एक काळ असा होता जेव्हा त्या एका वर्षात 10 ते 12 चित्रपट करायच्या, तिथे त्या वर्षातून एकच चित्रपट करु लागल्या. काही वर्षांनी त्या चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दुरावल्या. पती काझी यांचा मृत्यू हे त्यामागील कारण होते. 1992 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवला.

यशस्वी कारकीर्द असूनही पुरस्कार मिळाला नाही
एवढी यशस्वी कारकीर्द असूनही टुनटून यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही. प्रेक्षकांचे प्रेम हाच त्यांच्यासाठी सन्मान होता. मात्र, ज्या भूमिकांनी प्रेक्षकांना लोटपोट हसवले, त्या भूमिकांसाठी त्यांनाएकही सन्मान देण्यात आला नाही, ही खंतच आहे.

दीर्घ आजारानंतर वयाच्या 80 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
टुनटुन या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. 1992 मध्येच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीत 23 नोव्हेंबर 2003 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी टुनटुन यांनीही जगाचा निरोप घेतला. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांची 4 मुले आणि नातवंडे त्यांच्यासोबत होते.

मृत्यूच्या दोन दिवस आधी सांगितली होती वेदनादायक कहाणी
टुनटुन यांना हसताना बघून त्यांच्या आयुष्यात सारंकाही आलबेल आहे असेच सगळ्यांना वाटायचे. मात्र मृत्यूच्या दोन दिवस आधी मुंबईत येऊन त्यांनी आपल्या आयुष्याचे रहस्य उलगडले होते. चित्रपट समीक्षक आणि इतिहासकार शिशिर कृष्ण शर्मा यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आई-वडील आणि भावाच्या हत्येचा खुलासा केला होता. या मुलाखतीनंतर दोन दिवसांनी टुनटुन यांचे निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...