आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र'ला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा:पायरसीपासून संरक्षण करण्यासाठी 18 वेबसाइट ब्लॉक करण्याचा आदेश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षीचा बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या पायरसीला आळा घालण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ब्रह्मास्त्रच्या अनधिकृत स्ट्रिमिंगवर बंदी घालण्यात आली आहे. पायरसीमुळे होणारे नुकसान पाहता न्यायालयाने 18 वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकेवर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला-
लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाची सह-निर्माती स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या याचिकेवर अंतरिम आदेश देताना हा निकाल दिला. कोर्टाने म्हटले आहे की, रिलीजच्या वेळी चित्रपटाची ऑनलाइन उपलब्धता किंवा पायरसीमुळे निर्मात्यांना मोठे आर्थिक नुकसान होते, ज्यामुळे चित्रपटावर वाईट परिणाम होतो आणि त्याचे मूल्य देखील कमी होते.

पायरसीला आळा घालण्याची गरज आहे
हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे - केवळ पायरसीला आळा घातला पाहिजे असे सांगून उपयोग होणार नाही. याबाबत आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे. बनावट वेबसाइट्सद्वारे कॉपीराइट केलेल्या कंटेंटचे स्क्रीनिंग किंवा ऑनलाइन उपलब्धता यावर कारवाई केली पाहिजे.

'ब्रह्मास्त्र' हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट
'ब्रह्मास्त्र' हा या वर्षातील सर्वात मोठा बजेट चित्रपट आहे. हिंदी व्यतिरिक्त हा तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यामुळेच चित्रपटाचे अॅडव्हानस बुकिंग वेगाने होत आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे ब्रह्मास्त्र पार्ट 1 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...