आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री दिव्या भारतीचे लग्नानंतर अवघ्या 11 महिन्यांतच निधन झाले होते. दिव्या- साजिद जास्त काळ त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकले नाहीत, परंतु असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी लग्नाच्या काही महिन्यांतच मतभेद किंवा भांडणाचे कारण पुढे करत आपापले मार्ग वेगळे केले -
रेखा - मुकेश अग्रवाल
एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने 1990 मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांनी डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केली होती. दोघांचे लग्न केवळ 12 महिने टिकले होते.
सारा खान - अली मर्चंट
सध्या रिअॅलिटी शोमध्ये दिसणारी सारा खानने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये अली मर्चंटसोबत लग्न केले. शो सोडल्यानंतर दोन महिन्यांनी दोघांनी घटस्फोट घेतला. पब्लिसिटी स्टंटमुळे दोघांनी शोमध्ये लग्न केल्याची बातमी आली होती.
करण सिंग ग्रोव्हर - श्रद्धा निगम
करण सिंग ग्रोव्हरने पहिले लग्न अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत केले होते. 2008 मध्ये दोघांचे लग्न झाले होते, पण लग्नाच्या 10 महिन्यांतच म्हणजे 2009 दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतर करणने जेनिफर विंगेटशी लग्न केले पण हे लग्नही दोन वर्षांतच तुटले.
मल्लिका शेरावत - करण सिंग गिल
अभिनेत्री मल्लिका शेरावतने पायलट करण सिंग गिलसोबत लग्न केले होते, मात्र मल्लिकाने कधीच हे मान्य केले नाही. पण वृत्तानुसार अवघ्या 11 महिन्यांत हे लग्न तुटले. मल्लिकाच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. चित्रपटात काम करण्यासाठी मल्लिकाने तिचे लग्न मोडले होते.
पुलकित सम्राट - श्वेता रोहिरा
'फुकरे' फेम अभिनेता पुलकित सम्राटने नोव्हेंबर 2014 मध्ये श्वेता रोहिरासोबत लग्न केले. हे लग्न एका वर्षातच तुटले. पुलकित आणि यामी गौतम यांच्यातील जवळीक हे लग्न मोडण्याचे कारण ठरल्याचे म्हटले गेले होते.
चाहत खन्ना - भरत नरसिंघानी
टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने 2006 मध्ये बिझनेसमन भरत नरसिंघानीसोबत लग्न केले. काही महिन्यांनंतर चाहतने पतीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आणि घटस्फोट घेतला.
मंदाना करीमी - गौरव गुप्ता
मंदाना करीमीने 2017 मध्ये बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केले होते. पण 6 महिन्यांनंतर मंदानाने पतीपासून घटस्फोट घेतला. तिने पती आणि सासरच्यांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.