आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंगमध्ये अडचण:केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी परदेशात शूटिंगला परवानगी नाकारली, प्रोड्युसर संघटनेने घेतला आक्षेप 

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रह्लाद पटेल यांच्या या वक्तव्यावर निर्मात्यांच्या संघटनेने आक्षेप घेतला आहे.

गुरुवारी संध्याकाळी केंद्रीय पर्यटनमंत्री प्रह्लाद पटेल यांनी फिक्कीच्या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये सांगितले की, चित्रपट निर्मात्यांनी देशात शूटिंगसाठी आग्रह धरला पाहिजे. परदेशात शूटिंगमध्ये अनेक अडचणी आहेत. खूप कागदी प्रक्रिया आहे, त्या पूर्ण करण्यात अनेक वर्ष निघून जातील.

  •  परदेशात सुरक्षेची चांगली व्यवस्था आहे - टीपी अग्रवाल

प्रह्लाद पटेल यांच्या या वक्तव्यावर निर्मात्यांच्या संघटनेने आक्षेप घेतला आहे. इंपाचे प्रमुख टीपी अग्रवाल म्हणाले, देशातील विविध ठिकाणीही परिस्थिती कुठे चांगली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे इथे निर्मात्यांना जास्त पैसा खर्च करावा लागतो. परदेशात केवळ 20 ते 30 लोकांची टीम सोबत न्यावी लागते. उर्वरित स्टाफ तिथून हायर केला जातो. फिजी, श्रीलंका, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील शूटिंग खर्च भारतापेक्षा 30 ते 40% कमी असतो. तेथे सुरक्षा व्यवस्थादेखील चांगली आहे.

  • परदेशात शुटिंग करणे भारतापेक्षा कमी खर्चीक आहे

टी.पी.अग्रवाल यांच्या म्हणण्याला व्यापारी पंडितांनीही दुजोरा दिला आहे.  ते म्हणतात की, भारतातच निर्मात्यांनी काम करावे, यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. कोरोनाचा काळ बघता सरकार चित्रपट उद्योगाला चित्रीकरणासाठी इन्सेटिव्ह देण्याची योजना आखत आहे. या संदर्भात लवकरच एक स्टँडर्ड प्रोसिजर येत आहे. अन्यथा, आतापर्यंत याच इंडस्ट्रीवर जास्तीत जास्त कर लादला गेला आहे. हे स्पष्ट आहे की, आतापर्यंत भारतात परदेशांपेक्षाही चित्रपटनिर्मिती महाग आहे.

टीपी अग्रवाल यांचा आग्रह आहे की, 'इंग्लंडमधील प्रशासन अशा प्रकल्पांना सवलती देत ​​आहे जिथे या इंडस्ट्रीतील मोठी नावे संबंधित आहेत. उदाहरणार्थ अक्षय कुमार. बेल बॉटमची टीम इंग्लंडला रवाना होत आहे कारण तेथे परवानगी सहज मिळात आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्र्यांचे विधान व दावा बरोबर नाही. चित्रपटात उद्योगाला नवी उभारी मिळण्यासाठी सरकारने उपाय केले पाहिजे. गोंधळाची परिस्थिती निर्माण करायला नको.

बातम्या आणखी आहेत...