आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील:चित्रपटात काम केल्यामुळे विश्वजित यांना घरातून काढण्यात आले होते बाहेर, रेखासोबतचा किसिंग सीन ठरला होता 'द किसिंग क्रायसिस ऑफ इंडिया' 

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • चार्मिंग हीरो म्हणून अभिनेते विश्वजित चॅटर्जी यांना ओळखले जाते. या अभिनेत्याच्या रोमान्स आणि किसिंग सीनची चर्चा दीर्घकाळ होती. अभिनय, गायन आणि दिग्दर्शन यामध्ये पारंगत असलेले आणि 60 च्या दशकात हिंदी-बंगाली चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे किंग ऑफ रोमान्स विश्वजित चटर्जी, आजदेखील हेच म्हणतात... पुकारता चला हूं मैं...

विश्वजित चटर्जी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात वयाच्या 10 व्या वर्षीच सुरू केली होती. चित्रपटात येण्यापूर्वी ते कार्टूनिस्ट आणि पेंटर होते. त्यांचे वडील सैन्यात डॉक्टर होते. त्यांचे बालपण लखनऊ, मेरठ आणि कराची येथे गेले म्हणून त्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. विश्वजित यांच्या आईला अभिनयाची खूप आवड होती. ते 13 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. ‘माया मृग’ आणि ‘दुई भाई’सारख्या बंगाली चित्रपटात यश मिळवल्यानंतर विश्वजित हिंदी चित्रपटाकडे वळले.

 • चित्रपटात काम केल्यामुळे नाराज, घरातून काढले बाहेर

विश्वजित यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या घरात रंगमंचावर आणि चित्रपटात काम करण्याची परवानगी नव्हती, त्या काळात त्यांचे मित्र महिला पात्र साकारत होते. म्हणून विश्वजित यांनी लपूनछपून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच घरात सर्वांना माहीत झाले. यामुळे घरातील सर्व त्यांच्यावर नाराज झाले आणि त्यांना घर सोडावे लागले. सुरुवातीला विश्वजित यांनी कृष्णाची भूमिका साकारली, तर त्यांना कृष्णाच्याच भूमिकेच्या ऑफर येऊ लागल्या. ते फक्त कृष्णच बनून राहतील, याशिवाय काहीच करू शकणार नाही, असे त्यांच्याबाबत बोलले जाऊ लागले. त्यांना लोक केस्टो म्हणून संबोधू लागले.

 • '20 साल बाद' मधून मिळाला ‘सस्पेन्स हीरो फ्रॉम बंगाल'चा टॅग

बंगाली चित्रपटात गुरुदत्त यांनी विश्वजित यांचे काम पाहिले होते. ते विश्वजित यांना म्हणाले, तू माझा भूतनाथ आहे, तुला मुंबईला यावे लागेल. गुरुदत्त यांच्या सांगण्यावरून विश्वजित मुंबईला आले आणि त्यांची भेट मीना कुमारी आणि वहिदा रहमान यांच्याशी झाली. ते एका करारात अडकले हाेते म्हणून त्यांना ‘साहिब बीबी और गुलाम’चा भाग होता आले नाही. त्यामुळे बंगालला परत जावे लागले. त्यादरम्यान त्यांंची भेट हेमंत कुमार यांच्याशी झाली. त्यांनी विश्वजित यांना मुंबईला बोलावले. 1962 मध्ये ते पुन्हा मुंबईला आले आणि त्यांनी ‘20 साल बाद’या थरारक चित्रपटात काम केले. हा चित्रपट लोकप्रिय झाल्यावर त्यांना ‘सस्पेन्स हीरो फ्रॉम बंगाल’ची उपाधी मिळाली. पुढे त्यांना थरारक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या. याादरम्यानच त्यांना भीती वाटू लागली की, त्यांच्यावर सस्पेन्स नायकाचा शिक्का बसू नये म्हणून ते रोमँटिक चित्रपटाकडे वळले आणि पुढे त्यांना ‘म्युझिकल रोमँटिक हीरो’चा टॅग मिळाला.

 • रेखा साेबतचा किसिंग सीन बनला ‘द किसिंग क्रायसिस ऑफ इंडिया'

विश्वजित यांना चाहते ‘किंग ऑफ रोमान्स’देखील म्हणायचे. एकदा ‘अनजाना सफर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेखा आणि विश्वजित यांना किसिंग सीन साकारायचे होते. परंतु, ज्यावेळी हे दृश्य चित्रीत होत होते, तर विश्वजित दृश्यात इतके रमले की, दिग्दर्शकांनी कट म्हटले तरी त्यांना समजले नाही. ते रेखा यांना किस करत राहिले. दृश्य पूर्ण झाल्यानंतर रेखा यांच्या डोळ्यांत पाणी होते. रेखाला या दृश्याबाबत संपूर्ण माहिती दिली नव्हती असे म्हटले जाते. हे दृश्य कॅॅमेऱ्यासमोर पाच मिनिटांपर्यंत चित्रीत झाले. युनिटमधील सदस्यांनीदेखील शिट्ट्या वाजवल्या होत्या. अमेरिकेच्या लाइफ मॅगझिनने याला ‘द किसिंग क्रायसिस ऑफ इंडिया’म्हटले होते. या दृृश्यामुळे खूप वाद झाला त्यामुळे सेन्साॅर बोर्डाला चित्रपटच बॅन करावा लागला. काही दिवसांनंतर नवीन शीर्षक ‘दो शिकारी’सह हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 • ‘कजरा मोहब्बत वाला...’ गाण्यासाठी बनले मुलगी

विश्वजित यांच्या 1968 मधील ‘किस्मत’ या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झालीत. विशेषत: ‘कजरा मोहब्बत वाला...’ या गाण्यात त्यांनी मुलीचा गेटअप केला होता. त्यांना तासन‌्तास मेकअपसाठी सेटवर बसून राहावे लागायचे. त्यांनी लहानपणी रंगमंचावर दादांचा स्त्री भूमिकेचा अभिनय पाहिला हाेता. त्यातूनच प्रेरणा घेऊन या चित्रपटात अभिनय केला होता. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले, ‘चित्रीकरणादरम्यान मला असे जाणवले की कलाकाराने लवचिक राहावे आणि स्वत:ची व्याप्ती वाढवण्यासाठी स्वत:ला प्रेरित करावे याशिवाय प्रयोगात्मक गोष्टी करण्यासाठी सदैव तयार राहावे. रंगमंचामुळेच अशा प्रकारचे प्रयोग करण्याचा आत्मविश्वास माझ्यात आला.’

 • विश्वजित यांच्या सांगण्यावरून किशोर दा यांनी मानधन न घेता केले काम

विश्वजित बंगाली चित्रपटात गाणी गायचे, परंतु त्यांनी हिंदी चित्रपटात गाणी गाणार नाही असा निश्चय केला होता. त्यांना असे वाटायचे की, त्यांच्यासाठी किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गाणी गावी. तरीदेखील ‘दो शिकारी’ चित्रपटाचे शीर्षक गीत त्यांंनाच गावे लागले. किशोर कुमारसाेबत त्यांची चांगली मैत्री हाेती. एकदा त्यांनी बंगालमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका चॅरिटी शोचे आयोजन केले होते. त्यावेळी काही लोकांनी सांगितले होते की, यासाठी किशोर कुमार येणार नाहीत, कारण ते मानधन न घेता कोणतेच काम करत नाहीत. ते किशोर यांना भेटायला गेले. त्यांना म्हणाले, रणजी स्टेडिअममध्ये कार्यक्रम होणार आहे. बरीच मोठी कलाकार मंडळी येणार आहे तुम्हालाही यावे लागेल. किशोर म्हणााले -‘मानधन किती देणार?’ त्यावर विश्वजित यांनी सांगितले, हा एक चॅरिटी शो आहे. तर, किशार दा म्हणाले,- ठीक आहे, मी येईल, पण मंचावर माझ्यासाठी पियानो आणावा लागेल. किशोर दा यांच्या सादरीकरणामुळे विश्वजित यांच्या कार्यक्रमाला खूप लोकप्रियता मिळाली.

त्यांच्यावर चित्रीत झालेली लोकप्रिय गाणी

 • बेकरार करके हमें यूं न जाइए... - बीस साल बाद (1962)
 • आ गले लग जा मेरे सपने मेरे अपने... - अप्रैल फूल (1964)
 • आपसे मेरी जान मोहब्बत की है... - ये रात फिर न आएगी (1966)
 • आओ हुज़ूर तुमको, सितारों में ले चलें... - किस्मत (1968)
 • आंखों में कयामत के काजल, होंठों पे गजब की लाली है... - किस्मत (1968)
 • हुए हैं तुम पे आशिक हम, भला मानो बुरा मानो... - मेरे सनम (1965)
बातम्या आणखी आहेत...