आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

माहीत आहे का?:ऐश्वर्या-अनिल यांच्या ‘हमारा दिल आपके पास है’मध्ये एका मोठ्या नेत्याने केली होती भूमिका, वाचा चित्रपाटविषयीच्या रंजक गोष्टी

उमेशकुमार उपाध्याय, मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • ऐश्वर्या आणि अनिल कपूर अभिनीत ‘हमारा दिल आपके पास है’ ला नुकतीच 20 वर्षे झाली.
 • त्यानिमित्त या चित्रपटािवषयी काही रंजक आणि मजेदार गोष्टी जाणून घेऊ.

‘हमारा दिल आपके पास है’ चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीदेखील हा चित्रपट स्मरणात आहे. कारण यात इंडस्ट्रीतील दिग्गज लोकांच्या टीमने क्रिएटिव्हिटी दाखवली होती. शिवाय निर्माते बोनी कपूर यांची दिवंगत पत्नी श्रीदेवी यांच्याही आठवणी या चित्रपटाशी आहेत. सामाजिक विषयावर बनलेल्या या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि अनिल कपूर यांनी दमदार अभिनय केला होता.

चित्रपटात अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मुलीवर बलात्कार केला जातो. यात नायक मुलीवर प्रेम करतो आणि बलात्काऱ्यांना तुरुंगात पाठवतो. बोनी कपूरसाठी हा चित्रपट अविस्मरणीय आहे. कारण श्रीदेवी यांच्या दोन मुली जान्हवी आणि खुशी यांचे नाव बोनी यांनी 'जुदाई’ आणि 'हमारा दिल आपके पास है’ मधील हिरोइनच्या नावावर ठेवले होते. या चित्रपटातील कलाकार चित्रपटातील आठवणीविषयी काय सांगतात पाहा...

 • अनुपम-सतीश यांच्यामुळे हिमानीला द्यावी लागली टिप

अभिनेत्री हिमानी शिवपुरी याबद्दल सांगितले, चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये चालू होती. चित्रपटाचे कलाकार तेथील हॉटेलमध्ये थांबले हाेते. एकदा जेवणानंतर, जेव्हा टीप देण्याची वेळ आली तेव्हा अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांनी त्यांचा कंजूषपणा दाखवला. आम्ही हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेल बंजारा येथे थांबलो होतो. एकदा अनिल कपूर, अनुपम खेर, सतीश कौशिक आणि मी एकत्र डिनर घेत होतो. अनिल आपले स्टार्टर घेऊन निघून गेले. पण आम्ही तिघांनी हैदराबादी बिर्याणी, कबाब वगैरे मागवून जेवण केले. हॉटेलमध्ये थांबलो होतो, म्हणून आम्हाला बिलावर फक्त सही करायची होती, पण जेव्हा टिप द्यायची वेळ आली तेव्हा या दोघांनी मला पुढे केले. आम्ही पाकीट आणले नाही, असे सांगून ते दोघे निघून गेले. त्यामुळे मलाच टिप द्यावी लागली.

 • उपासनाच्या मेकअपमुळे थांबले हाेते शूटिंग

या चित्रपटात एक दृश्य होते, त्यात पूर्ण चाळ एकत्र होते. या विशेष शूटसाठी जास्त मेकअप करायचा नाही, असे सर्वांना सांगण्यात आले होते. कारण चाळीचे लोक वाटायला हवे. त्या दृश्यात सर्वच सामान्य कुटुंबातील वाटायला हवेत. त्यांच्या चेहऱ्यावर गरीबी आणि लाचारी दिसायला हवी होती. निर्मात्यांचे ऐकून सर्वच कलाकार नॉर्मल मेकअप करून आले. मात्र उपासना सिंहने भडक मेकअप केला होता. त्यामुळे कॅमेरामनपासून ते दिग्दर्शक सर्वच त्यांच्यावर नाराज झाले. त्यानंतर उपासना सिंहला आपला मेकअप काढावा लागला. त्यामुळे एक ते दीड तास शूटिंग थांबवावे लागले. रात्री शूटिंग झाले. ती तेव्हा मेकअप काढुन आली तेव्हा शूटिंग सुरू झाले.

 • भूमिकेला अनुसरुण नसल्याने मीता वशिष्ठ झाल्या दूर

चित्रपटात प्रीती म्हणजेच ऐश्वर्या रायच्या मैत्रिणीची भूमिका आधी मीता वशिष्ठ करणार होती. त्यांनी एक दिवस शूटिंगही केले हेाते. शूटिंगनंतर दिग्दर्शक सतीश कौशिकला ती या भूमिकेसाठी योग्य वाटली नाही. ऐश्वर्याची मैत्रिणी थोडी खोडकर असावी असे सतीशला वाटले. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट मीतालादेखील सांगितली. कथेच्या अनुसार तुम्ही या भूमिकेत येाग्य नाहीत, असे दिग्दर्शकांनी म्हटल्यावर मीता स्वत: दूर झाल्या. त्यानंतर ही भूूमिका तनाज करीमने साकारली. पुरु राजकुमारच्या भूमिकेसाठी आधी आशुतोष राणाला घेतले जाणार होते पण पुरु घेण्यात आले.

 • बोनी यांनी सांगितले, चित्रपटाचे नाव बदलण्याचे गुपित

चित्रपटाचे टायटल ‘हमारा दिल आपके पास है’ देण्याचे श्रेय सतीश कौशिक यांना जाते. ते चित्रपटाचे दिग्दर्शक हाेते. त्यांच्यासोबत आमचा हा तीसरा चित्रपट होता. यापूर्वी 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके दिल में रहते हैं' बनवले होते. यात अनिल कपूर हिरो होते, हीरोइनसाठी ऐश्वर्याला घेण्यात आले हाेते. कारण चित्रपटातून सामाजिक संदेश देण्यात आला होता. ही कथा भूपती राजाची होती. तेलगूमध्ये डी. रामा नायडू साहेबांनी बनवला होता. सहा महिन्यात याचे शूटिंग पूर्ण झाले. या चित्रपटामुळे मला बराच फायदा झाला. शेवटपर्यंत चित्रपटाची स्टार कास्ट बदलण्यात आली.

 • महिमा चौधरीने चित्रपट साइन करून सोडला

या चित्रपटात सोनाली बेंद्रेने साकारलेल्या खुशीच्या भूमिकेसाठी सर्वात आधी सुष्मिता सेनला घेण्याची योजना आखली होती. पण नंतर महिमा चौधरीला घेण्यात आले. शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या 3 ते 4 दिवस आधी महिमाने हा चित्रपट सोडला. महिमाला हा विषय सांगितला होता. विषयही तिला आवडला होता. तिने या चित्रपटावर सहीदेखील केली होती, पण एका निर्माता-दिग्दर्शकाने तिला दुय्यम भूमिका म्हणवून भडकवले. त्यामुळे शूटिंग सुरू होण्याच्या 3 ते 4 दिवस आधी तिने चित्रपट सोडला. तिने मला एक पत्र लिहिले आणि त्या चिठ्ठीसह आग्रिम रक्कम परत पाठवली. त्यानंतर आम्ही सोनाली बेंद्रेला घेतले. रिलीजनंतर सोनाली बेंद्रेला अनेक नामांकने व पुरस्कार मिळाले.

 • अमरसिंह यांनी केला होता अभिनय, स्वत: डबिंगही केली

या सिनेमात प्रथमच ज्येष्ठ नेते अमरसिंह यांनी अभिनय केला होता. चित्रपटात अमरसिंह पुरस्कार देण्यासाठी स्टेजवर येतात. अभिनयाबरोबरच त्यांनी स्वत:चे डबिंगही केले होते. जेव्हा त्यांना डबिंगसाठी बोलावण्यात आले, तेव्हा संपूर्ण दिवस लागेल, असे वाटत होते. पण त्यांनी एका तासात डबिंग पूर्ण केले. चित्रपटात ते भाषण देण्यासाठी येतात. त्यांच्या बऱ्याच ओळी होत्या.

 • साेनालीचे गाणे चित्रित करूनही घेतले नाही

चित्रपटाचे 60 टक्के शूटिंग हैदराबादमध्ये झाले. याशिवाय काही चित्रीकरण दिल्लीमध्येही झाले. या चित्रपटाची गाणी कॅनडा आणि लॉस एंजलिसमध्ये चित्रित करण्यात आली. चित्रपटात एकूण चार गाणी होती. जास्त गाणी झाल्यामुळे अखेर सोनालीवर चित्रीत झालेले गाणे चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

लोकांना माहीत नसणाऱ्या गोष्टी

 • चित्रपटाचे शीर्षक आधी ‘हमारा कानून रखा गया था’नंतर बदलण्यात आले.
 • या चित्रपटाच्या 18 वर्षानंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय यांनी पुन्हा एकदा फन्ने खान चित्रपटात काम केले होते.
 • चित्रपटातील गीत ‘तुझको देखा तो’ एक पाक चित्रपट ‘दीवारें’ मधील गीत ‘होठों पे तेरा नाम है’ वर आधारित होते. ते अमझद बॉबीने कंपोज केले होते.
 • सोनाली बेंद्रे आणि अनिल कपूरचा हा सोबतचा एकमेव चित्रपट आहे.
 • पुरु राज कुमारचा अनिल आणि ऐश्वर्यासोबतचा नकारात्मक भूमिकेचा पहिला आणि शेवटचा चित्रपट.