आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील:जेव्हा एका मुलीने मारली होती मनोज कुमार यांना चापट, हेमा मालिनी यांना दिवसभर 'क्रांती'च्या सेटवर ठेवले होते बसून, वाचा या खास गोष्टी 

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1999 मध्ये फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • 2016 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 • 1975 मध्ये 'रोटी कपडा और मकान' साठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर मिळाला.
 • 1992 मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले.
 • 1968 मध्ये "उपकार'साठी उत्कृष्ट चित्रपट, कथा, दिग्दर्शन आणि संवादासाठी फिल्मफेअर मिळाला.
 • 1972 मध्ये "बेईमान'साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर

हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकारांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक आठवणीत राहणारे चित्रपट दिले. त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘भारत कुमार’ आणि ‘क्रांती कुमार’ ही नावे दिली. म्हणूनच आजही मनोज म्हणतात - भारत का रहने वाला हूं.. 

 • बालपणी आईला म्हणत मनोज- एक दिवस मी देवदूत होईन...

मनोज कुमार म्हणजेच हरिकिशन गिरी गोस्वामी यांना बालपणी खूप कष्ट सहन करावे लागले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते..., बालपणीचे दिवस आठवले की डोळ्यात पाणी येते. फाळणीच्या वेळेस लाहोर सोडण्याचे मला खूप दु:ख झाले होते. नंतर आम्ही दिल्लीला आलो आणि हडसन लेनमध्ये रिफ्युजी कॅम्पमध्ये राहू लागलो. हळूहळू काळ बदलला. मला चित्रपट पाहण्याची आवड लागली. त्या काळी मी राज कपूर साहेबांचा ‘जुगनू’ पाहिला होता. दिलीप कुमार साहेबांचा शहीद पाहिला. दोन्ही चित्रपटांत हीरो मरतात. त्या वेळी मी आईला विचारले होते, एक माणूस किती वेळेस मरतो. त्या म्हणाल्या.. एकदाच.. मी पुन्हा विचारले.. जे लोक दोन-तीन वेळेस मरतात, ते कोण असतात ? आई म्हणाली..,ते देवदूत असतात. त्या वेळी मीदेखील देवदूत बनण्याचा विचार केला होता. त्याच काळात मी 'शबनम' चित्रपट पाहिला. त्यात हीरोचे नाव मनोज कुमार होते. ज्या दिवशी देवदूत बनेन त्या दिवशी हेच नाव ठेवणार, असे मी ठरवले होते. येथूनच मनोज यांच्या हीरो बनण्याचा प्रवास सुरू झाला. त्यांनी आपल्या आई-वडिलांची परवानगी घेतली आणि 1956 मध्ये हीरो बनण्यासाठी मुंबईला रवाना झाले.

 • पहिल्याच चित्रपटात मिळाली 90 वर्षांच्या ज्येष्ठाची भूमिका

मुंबईत आल्यावर मनोज यांना खूप संघर्ष करावा लागला. स्टुडिओच्या बाहेर द्वारपालदेखील त्यांचा अपमान करत असे, पण मनोज देवदूत होण्यावर ठाम हाेते. बऱ्याच संघर्षानंतर 1957 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटात त्यांना भिकाऱ्याचे पात्र मिळाले. शूटिंगदरम्यान मनोज 19 वर्षांचे होते आणि त्यांना 90 वर्षांच्या भिकाऱ्याची भूमिका मिळाली. त्यानंतर 1958 मध्ये त्यांना 'सहारा' चित्रपटात काम मिळाले. मीना कुमारीसोबत 6 ते 7  सीन्स होते. यानंतर ते दिग्दर्शक हरनामसिंह रवैल यांच्या नजरेत भरले आणि 1961 मध्ये आलेल्या ‘कांच की गुडिया’ मध्ये त्यांना मुख्य भूमिका मिळाली.

 • शास्त्रीजींच्या सांगण्यावरून बनवला 'उपकार’

1965 मध्ये रिलीज झालेला ‘शहीद’ मनोज कुमार यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. यानंतरदेखील भगतसिंग यांच्या जीवनावर अनेक चित्रपट बनले. मात्र मनोज कुमारसारखा अभिनय कोणत्याच कलावंताने केला नाही. चित्रपटात भगतसिंगाची भूमिका करण्याआधी मनोज यांनी भगतसिंगाची आई विद्यावती कौर यांची भेट घेतली. हा चित्रपट पाहून लालबहादूर शास्त्रीजी यांच्या डोळ्यातदेखील पाणी आले होते. चित्रपट संपल्यानंतर शास्त्रींजीनी मनोज यांना आपला नारा ‘जय जवान जय किसान’वर चित्रपट बनवण्याचे सांगितले. या थीमवर मनोज यांनी उपकार चित्रपट बनवला. यानंतर त्यांचे नाव भारतकुमार पडले. विशेष म्हणजे, प्रेक्षकांना “भारत’ नाव इतके आवडले की, मनोज, भारत कुमारच्या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी, कपड़ा और मकान’ आणि ‘क्रांती’ ,‘क्लर्क’पर्यंत अनेक चित्रपटांत त्यांनी जे पात्र साकारले त्याचे नाव भारत ठेवले.

 • जेव्हा एका मुलीने मारली मनोज यांना चापट

मनोज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, त्यांना एका मुलीने सर्वांसमोर चापट मारली होती. कारण ते त्या वेळी एका रेस्टॉरंटच्या बाहेर उभे राहून सिगरेट पीत होते. ते पाहून ती मुलगी आली आणि म्हणाली, तुम्ही भारत कुमार आहात आणि सिगरेट पीत आहात, तुम्हाला लाज वाटत नाही का? लाखो लोक तुम्हाला फॉलो करतात. चित्रपटात साकारलेले पात्र आणि त्याचे वैशिष्ट्य लोकांना किती प्रभावित करते, यांची जाणीव मनोज यांना तेव्हा झाली.

 • चित्रपट पाहून सेटवर भेटायला आला व्यापारी

मनोज कुमार यांच्या उपकार चित्रपटाशी जोडलेला हा किस्सा आहे. चित्रपट पाहून एका व्यापाऱ्याचे डोळे उघडले आणि तो त्यांना भेटायला सेटवर गेला. भेटण्याआधी त्या माणसाने आपल्या मुलाला मनोज यांच्याकडे पाठवले होते. तो मुलगा भरपावसात मनोज कुमार यांच्या गेटवर उभा होता. त्याला पाहून मनोज यांनी सुरक्षा रक्षकाला त्याची विचारपूस करायला पाठवले. मुलाने सांगितले, त्याच्या वडिलांना मनोज कुमारला भेटायचे. मनोज यांनी त्याच्या वडिलांना रूपतारा स्टुडिओमध्ये येण्याचे सांगितले. मुलगा त्याच दिवशी वडिलांना घेऊन स्टुडिओमध्ये पोहोचला. तेथे गेल्यावर त्या मुलाच्या व्यापारी वडिलांनी मनोज यांना वाकून नमस्कार केला आणि तेथून जाऊ लागले. मनोज यांना आश्चर्य वाटले, भेटायचे नव्हते तर मुलाला पावसात का पाठवले ? मनोज यांनी व्यापाऱ्याला विचारले, येथे येण्याचे कारण सांगा ? यावर तो व्यापारी म्हणाला, आम्ही राजस्थानवरून आलो आहोत. मी गव्हाचा व्यापारी आहे. मला फक्त तुम्हाला दंडवत करायाचा होता. कारण तुम्ही माझे जीवन बदलून टाकले. पैसे कमवण्यासाठी मी गव्हाचा काळाबाजार करत होतो, मात्र उपकार पाहून माझे डोळे उघडले. आता मी ते काम सोडले आहे. हे सांगून तो जाऊ लागला तेव्हा मनोज यांनी त्याला आपल्या जवळ घेतले.

 • दिवसभर 'क्रांती'च्या सेटवर बसून ठेवले

मनोज “क्रांती” चित्रपटाचे शूटिंग करत होते तेव्हा हेमा मालिनी स्टार होत्या. शूटिंगच्या वेळी त्या काही ना काही तांत्रिक अडचण सांगून फक्त एकच तास शूटिंग करायच्या. त्या काळात हेमा “रझिया सुलतान” देखील करत होत्या. हा चित्रपट “क्रांती “पेक्षाही हिट ठरणार असा त्यांचा विश्वास होता. एक दिवस “क्रांती“च्या सेटवर पोहोचल्यावर मनोज यांनी त्यांना दिवसभर बसवून ठेवले. त्या दिवशी त्यांच्याकडून शूटिंग करून घेतली नाही. मनोजच्या अशा वागण्यामुळे हेमा खूप नाराज झाल्या आणि रागात तेथून निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी कमल अमरोहीकडे त्यांची तक्रारही केली होती.

 • पहिल्या दिवशी ऋषीसोबत झाला वाद

मनोज कुमार आणि ऋषी कपूर यांनी एकाच चित्रपटात एकत्र काम केले. हा चित्रपट ‘जय हिंद’ होता. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि मनोजच्या शूटिंग स्टाइलमुळे नाराज ऋषी सेट सोडणार होते. खरं तर, मनोज यांनी पहिल्याच दिवशी त्यांना 12 पानांचा एक सीन दिला होता आणि तो एकाच शॉटमध्ये चित्रित करायचा होता. तथापि नंतर हा वाद मिटविण्यात आला. मनोज यांनी आपला खास मित्र प्रेम चोप्राला काय करावे, असे विचारले, यावर त्यांनी सल्ला दिला, दुसऱ्या दिवशी ऋषीला विचारा, त्याला हा सीन कसा शूट करायचा आहे. त्यानंतर तो कॅमेऱ्यानुसार सेट करून घ्या. अनेकदा मनोज यांचे शूटिंगदरम्यान अभिनेतांसोबत वाद व्हायचे.

 • अभिनेत्री नंदा यांनी दिली साथ

एकेकाळी मनोज कुमार यांना मदतीची गरज होती, तेव्हा अभिनेत्री नंदा यांनी त्यांची साथ िदली होती. एक किस्सा 'शोर' चित्रपटाशी जोडलेला आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून जया भादुरीला फायनल करण्यात आले होते. मात्र रोल छोटा असल्यामुळे त्यांनी नकार दिला. कोणीच अभिनेत्री यासाठी तयार होईना. चित्रपटाच्या सुरुवातीला अभिनेत्रीचे पात्र मरते. तेव्हा नंदा या भूमिकेसाठी तयार झाल्या. एवढेच नव्हे तर यासाठी त्यांनी एक रुपयाही मानधन घेतले नाही. अशी अटच त्यांनी मनोज कुमारसमोर ठेवली होती. चित्रपटात काम करेन मात्र पैसे घेणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.

 • फक्त 11 रुपयांत 'रोटी कपडा और मकान’

1974  मध्ये बनलेल्या “रोटी कपडा और मकान’ चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केले होते. याची कथादेखील त्यांनीच लिहिली होती. या चित्रपटासाठी त्यांनी फक्त 11 रुपये घेतले. हा 1974 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. मनोज कुमार यांचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात आजचे महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील काम केले हेाते. त्या काळात अपयश आल्यामुळे अमिताभ बच्चन मुंबई सोडून जाणार होते. मात्र मनोज यांनी त्यांना थांबवले आणि आपल्या चित्रपटात संधी दिली. हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा अमिताभ बच्चन यांचा फोटो पोस्टरमध्ये छोटा होता. मात्र जेव्हा 10 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा रिलीज केला तेव्हा अमिताभ यांचे पोस्टर इतर कलाकारांपेक्षा मोठे करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...