आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील:'निशांत'मधील रोमँटिक दृश्य करताना अस्वस्थ होते गिरीश कर्नाड, आजारपणात नाकात नळी घालून केले चित्रीकरण; साहित्य-सिनेमातील जीनियसविषयीच्या या खास गोष्टी

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1961 मध्ये ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना ‘ययाति’ हे पहिले नाटक लिहिले.
 • 1970 मध्ये 'संस्कारा' या कन्नड चित्रपटातून अभिनय, स्क्रीन रायटिंगचा प्रवास सुरू केला.
 • 1971 मध्ये कन्नड 'वंशवृक्ष' चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले.

रंगमंचाचा नवीन काळ आणणारे ते मास्टर होते. त्यांनी लिहिलेल्या नाटकांना दुनियेने पोलाद मानले. आपल्या लिखाणामुळे त्यांनी विक्रम केले. चित्रपट आणि दिग्दर्शनाच्या जगात ते एक वेगळा माणूस होते. त्यांचा अभिनय, लेखन आणि नाटक आवडणारे लोक त्यांचे कौतुक करताना म्हणतात... गिरीश कर्नाड साहित्य, सिनेमातील एक जीनियस

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीतील काही मोजक्या कलाकारांमध्ये गिरीश कर्नाड यांचे प्रमुख नाव आहे. कर्नाड हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. ज्या कलाकारांनी भारतीय रंगभूमीसाठी गंभीर आणि शाश्वत नाटयमय लेखनाचा पाया रचला त्यापैकी ते एक होते. कर्नाड यानी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये प्रोफेसर म्हणून कामदेखील केले. नोकरीत मन रमले नाही म्हणून भारतात परतले आणि पूर्णपणे साहित्य आणि चित्रपटासाठी झोकून दिले. त्यांच्या काही गोष्टी आणि खास किस्से जाणून घेऊयात....

 • सिरसमध्ये नाटके पाहत असताना रंगभूमीकडे वाढला कल

गिरीश कर्नाड यांचा जन्म महाराष्ट्रातील माथेरान येथे झाला. परंतु, 1945 च्या जवळपास त्यांच्या वडिलांची पोस्टिंग सिरसीत (कर्नाटक) झाली. ते असे ठिकाण होते जेथे कधी कधीच वीज नसायची. गिरीश त्यावेळी सहा वर्षांचे होते. रात्र झाल्यावर सर्व मुले एकत्र जमायचे आणि म्हाताऱ्या लोकांकडून गोष्टी ऐकायचे. त्या काळात नाटक मंडळे खूप फिरायची. ही नाटक मंडळे सिरसीत आल्यावर काही लोकांना नाटकांचे तिकीट पाठवून द्यायचे. गिरीश यांचे वडील डॉ. रघुनाथ कर्नाड यांच्याकडे वेळ नसल्यामुळे गिरीश नाटकांची आमंत्रण पत्र घेऊन नाटक पाहायला जायचे. येथूनच त्यांच्या मनात नाटकांप्रति एक विशेष आवड निर्माण झाली.

 • इतिहासाचा करायचा होता अभ्यास, परंतु गणित घ्यावे लागले

गिरीश 14 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब कर्नाटकतील धारवाडमध्ये शिफ्ट झाले होते. कर्नाड यांना लहानपणापासून रंगभूमीची आवड होती. त्यांचा हळूहळू रंगमंचाकडे कल वाढला आणि ते शाळेतील नाटकांमध्ये भाग घेऊ लागले. तरुणपणी ते कवीदेखील झाले, परंतु ते काही जमले नाही. त्यांना पुढे शिकायचे होते, परंतु त्यासाठी पैसे पाहिजे होते. सुरुवातीला त्यांना कन्नड आणि इतिहासाचा अभ्यास करायचा होता, परंतु गणित घ्यावे लागले. त्यांना कर्नाटक आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. येथेच त्यांच्याहून 15 वर्षांनी मोठे असलेल्या कीर्तिनाथ कुर्तकोटे यांच्याशी मैत्री झाली. दोघेही बऱ्याच दिग्गज कवींना भेटायचे. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर कर्नाड पुढच्या शिक्षणासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत निघून गेले.

 • 'ययाति’ आणि ‘तुघलक’सारखी नाटके झालीत प्रसिद्ध

ऑक्सफर्डला गेल्यानंतर काही दिवसांतच गिरीश कर्नाड यांनी 'ययाति’हे पहिले नाटक लिहिले. त्यांचे हे नाटक खूप प्रसिद्ध झाले. याबाबत कर्नाड यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, मी सुरुवातीला कविता लिहिण्याचा प्रयत्न करायचो, परंतु मला कविता करताच यायच्या नाही. एक दिवस मला नाटक लिहिण्याचा विचार आला आणि मी नाटक लिहिण्यास सुरुवात केली. ही कला अचानक माझ्यात आली होती. मला असे वाटत होते जसे रंगभूमी माझ्यासमोरच आहे. प्रत्येक पात्र स्वत:हून बोलत आहे आणि मी स्टेनोग्राफरप्रमाणे त्यांचे संवाद लिहित आहे. मी खूप नाटके लिहिली, परंतु अशाप्रकारची जाणीव कधीच झाली नाही. ‘ययाति’ माझ्या मनातून आले आहे. ययाति नंतर कर्नाड यांचे ‘तुघलक’ नाटकही खूप प्रसिद्ध झाले. यात त्यांनी महमंद बिन तुघलकचे जीवन दाखवले होते.

 • आयरिश लेखकाच्या पत्राने बदलले आयुष्य

कर्नाड यांनी वयाच्या 17 व्या वर्षी आयरिश लेखक शॉन ओ कैसी यांना स्केच बनवून पाठवले होते. ते स्केच पाहून कैसी आनंदी झाले आणि उत्तरादाखल त्यांनी िगरीश यांना एक पत्र पाठवले. ज्यात लिहिले होते, गिरीश तुम्ही असे करून स्वत:चा वेळ वाया घालवू नका. काही असे करून दाखवा की लोकांनी तुमचा ऑटोग्राफ मागितला पाहिजे. हे पत्र गिरीश यांना मिळाले ते वाचून त्यांचे आयुष्यच बदलले.

 • 'निशांत’ मधील रोमँटिक दृश्य करताना अस्वस्थ होते

गिरीश कर्नाड यांना चित्रपटात नेहमी रोमँटिक दृश्य करताना संकोच वाटायचा. 1974 मध्ये ‘निशांत’चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रपटात गिरीश एका शिक्षकाची भूमिका साकारत हाेते. या चित्रपटात पती-पत्नीत रोमँटिक दृश्य चित्रीत करायचे होते. पत्नीच्या भूमिकेत शबाना आझमी होत्या. बऱ्याच रिटेकनंतरही गिरीश रोमँटिक हावभाव देत नव्हते. गिरीश यांना अस्वस्थ झालेले पाहून शबाना म्हणाल्या आम्ही एकदा प्रयत्न करतो, नंतर शबाना यांनी दृश्यादरम्यान गिरीश यांच्या पायाला गुदगुल्या केल्या. यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर श्याम बेनेगल यांना पाहिजे होते तसेच हावभाव आले. त्यानंतर गिरीश यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मला शबानासाेबत रोमँटिक दृश्य करताना भीती वाटायची आणि ही माझी भीती शबानानेच दूर केली.

 • शेतकऱ्यांच्या योगदानातून बनवला एक चित्रपट

गिरीश यांचा एक ‘मंथन’ नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी बनवला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी 5 लाख रुपये दिले होते हे कोणीही विसरू शकत नाही. हा चित्रपट श्वेत (दुग्ध) क्रांतीचेे जनक वर्गीज कुरियन यांच्या प्रेरणेने तयार झाला होता. ‘मंथन’ला 1976 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. याशिवाय गिरीश यांनी 1986-87 दरम्यान दूरदर्शनवरील मालगुडी डेज मधूनदेखील आपली ओळख निर्माण केली.

 • आजारपणात नाकात नळी घालून केले चित्रीकरण

‘टाइगर जिंदा है’ च्या चित्रीकरणाच्यावेळी ते खूप आजारी होते. असे असूनही त्यांनी डॉ शेनॉयचे पात्र उत्तमरीत्या साकारले. याच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचे प्रत्येक दृश्य इनडोअरच चित्रीत केले गेले होते, कारण आजारपणामुळे त्यांना उन्हात जाण्यास परवानगी नव्हती. एवढेच नाहीतर चित्रीकरणादरम्यान त्यांनी नाकात नळीदेखील लावली होती. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

चित्रपटातील योगदानासाठी

 • 1971 मध्ये "वंशवृक्ष' या कन्नड चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
 • 1973 मध्ये बेस्ट फीचर फिल्म "काडू' साठी राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान
 • 1978 मध्ये "भूमिका'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

साहित्यासाठी...

 • 1972 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार
 • 1974 मध्ये पद्मश्रीने सन्मान
 • 1992 पद्मभूषण आणि कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार
 • 1994 साहित्य अकादमी पुरस्कार
 • 1998 ज्ञानपीठ पुरस्कार आणि कालिदास सन्मान
बातम्या आणखी आहेत...