आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कल हो ना हो'ची 16 वर्षे:एवढी बदलली शाहरुखच्या ‘कल हो न हो’मधील जिया, प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, नाकारला होता संजय लीला भन्साळींचा चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ल्या 16 वर्षांत तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे.

28 नोव्हेंबर 2003 रोजी प्रदर्शित झालेल्या कल हो ना हो या चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख खान स्टारर या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. विशेषतः चित्रपटात प्रीती झिंटाच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारणारी क्युट मुलगी नक्कीच तुम्हाला आठवत असेल. आता या क्यूट गर्लने तारुण्यात पदार्पण केले आहे. तिचे नाव झनक शुक्ला आहे. गेल्या 16 वर्षांत तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव असते.

'सोनपरी' मालिकेतही केले होते काम
- 2000 साली छोट्या पडद्यावर प्रसारित झालेली 'सोनपरी' ही मालिका आठवतेय का तुम्हाला... या मालिकेतील सोनपरीपासून ते फ्रुटीपर्यंतचे सर्वच पात्र अतिशय गाजले होते. विशेषतः या मालिकेतील चिमुकली प्रिन्सीला तर आपण विसरु शकत नाही. त्यावेळी प्रिन्सीची भूमिका साकारली होती चार वर्षांच्या झनक शुक्लाने.
-24 जानेवारी 1996 रोजी जन्मलेली झनक आता 24 वर्षांची एक सुंदर तरुणी आहे.
- झनक 'कुमकुम भाग्य' या मालिकेत काम करणारी अभिनेत्री सुप्रिया शुक्ला आणि डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर हरी शुक्ला यांची मुलगी आहे. 'कुंडली भाग्य' या मालिकेत सुप्रिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

नाकारली होती संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाची ऑफर
- 2005 साली रिलीज झालेल्या ‘ब्लॅक’ या सिनेमातील आयशा कपूरने साकारलेली भूमिका सर्वप्रथम झनकला ऑफर झाली होती. पण शूटिंग जास्त दिवस चालणार असल्याने ही ऑफर झनकने नाकारली होती. या सिनेमासाठी आयशाला बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसचा ‘फिल्मफेयर अवॉर्ड’ मिळाला होता.
- ‘कल हो न हो’ या सिनेमाव्यतिरिक्त झनकने 'डेडलाइन: सिर्फ 24 घंटे' या सिनेमातसुद्धा काम केले आहे.
- तर छोट्या पडद्यावर 'सोनपरी' शिवाय ती ‘करिश्मा का करिश्मा’, 'हातिम', 'गुमराह' आणि अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे.

झनकला सुरु करायचे आहे NGO
- झनकने BA पूर्ण केले आहे. तिला सामाजिक कार्य करायचे आहे. सोबतच स्वतःचे NGO उघडण्याची तिची इच्छा आहे. घरगुती हिंसेला बळी पडलेल्या महिलांसाठी तिला एनजीओ सुरु करायचे आहे.
- झनकला चित्रपटसृष्टीत करिअर करायचे नाही. 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, ती अभिनय करुन आता कंटाळली आहे. त्यामुळे तिने चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser