आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहा आणि बरंच काही:नेहा महाजनच्या 'या' चित्रपटावर भारतात घालण्यात आली होती बंदी, वडिलांकडून घेतले आहे सतार वादनाचे धडे

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सध्या नेहावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, मिड नाईट्स चिल्ड्रन या गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन हिने अटकेपार झेंडा रोवला आहे. नेहा आणि लॅटीन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्या ‘Pausa’ या अल्बमला मानाच्या ‘ग्रॅमी’ पुरस्कारांत नॉमिनेशन मिळाले आहे. त्यामुळे तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. जाणून घेऊयात मराठमोळ्या नेहाबद्दल बरंच काही...

 • नेहा महाजन मुळची पुण्याजवळील तळेगावची आहे.
 • नेहाचे वडील पंडित विदुर महाजन प्रसिद्ध सतारवादक आहेत.
 • एएफएस म्हणजे अमेरिकन फिड सर्व्हिस ही संस्था अमेरिकेतल्या लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी काम करते. या संस्थेकडून विद्यार्थी सांस्कृतिक देवाणघेवाणी अंतर्गत नेहा अकरावीत असताना अमेरिकेत गेली होती.
 • नेहा अकरावीच्या मध्यावर अमेरिकेत गेली. त्यामुळे अकरावीचं अर्ध वर्ष आणि बारावी ती अमेरिकेत शिकली आहे.
 • अमेरिकेहून परतल्यानंतर नेहाने पुण्यातील फग्र्युसन कॉलेजमधून बीए आणि पुणे विद्यापीठातून फिलॉसॉफी या विषयात एमए केले.
 • बारावी झाल्यानंतर भारतात आल्यानंतर नेहाला पहिला ब्रेक मिळाला तो सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या ‘बेवक्त बारीश’ या सिनेमात. राजस्थानी हिंदी असलेला हा सिनेमा करताना भरपूर काही शिकायला मिळाल्याचं नेहा सांगते.
 • एमए करताना 2012 मध्ये नेहाला दीपा मेहता यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या सिनेमात काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा माझ्यासाठी खऱ्या अर्थाने मोठा ब्रेक ठरला होता, असे नेहाने एका मुलाखतीत सांगितले होते.
 • लहानपणापासूनच नेहाला अभिनय क्षेत्राचं आकर्षण होतं. पण, त्याचा करिअर म्हणून तिने कधी विचार केला नव्हता. एमए झाल्यानंतर मात्र अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं तिने पक्कं ठरवलं.
 • वडिलांसोबत मैफिलींमध्ये त्यांना साथ करण्याचा अनुभवही नेहा घेत असते.
 • नेहामध्ये एक संगीतप्रेमीही दडलेली आहे. गेली 13 वर्षे तिने तिच्या बाबांकडे म्हणजे पंडित विदुर महाजन यांच्याकडे सतारवादनाचं शिक्षण घेतले.
 • नेहाला गाण्याचीही आवड आहे. आनंदात असते तेव्हा ती गात असते. पार्श्वगायनाची संधी मिळाली, तर नक्की त्याचा विचार करेल, असे नेहा सांगते.
 • 'मिडनाइट चिल्ड्रन' या सिनेमात शबाना आझमी हिचे लहान प्रतिरूप असलेली नसीम नावाची व्यक्तिरेखा नेहाने साकारली होती.
 • एका ओरिया सिनेमातही काम केले आहे.
 • ज्या ठिकाणी जाऊ तिथल्या लोकांशी त्यांच्याच भाषेत बोलण्याकडे तिचा कल असतो.
 • मल्याळम, बंगाली, हिंदी, मराठी अशा सिनेमांमध्ये तिने काम केलंय.
 • ‘आजोबा’, ‘संहिता’ या मराठी तर ‘जीबून संदेश’ या आोरिया फिल्ममध्ये नेहाने भूमिका केली आहे.
 • कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, टीटीएमएम या मराठी फिल्म्समध्ये नेहा झळकली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटात न्यूड सीन दिल्याने आली होती चर्चेत

'छायम पोसिया वीडू' या मल्याळम सिनेमासाठी न्यूड सीन्स दिल्याने नेहा तीन वर्षांपूर्वी अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. 'द पेटेंड हाऊस' या कादंबरीवर आधारीत 'छायम पोसिया वीडू' या मल्याळम सिनेमात धाडसी नेहाने अंगप्रदर्शनाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले होते. आईवडिलांच्या परवानगीनंतरच या सिनेमात न्यूड सीन्स दिल्याचे स्पष्टीकरण नेहाने दिले होते. विशेष म्हणजे हा सिनेमा भारतात बॅन झाला होता. या सिनेमातील अभिनेत्रीवर चित्रीत झालेले हे तिन्ही सीन्स वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाला सांगितले होते. मात्र दिग्दर्शकाला सेन्सॉरचे म्हणणे मान्य नसल्याने या सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आली होती.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser