आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहीत आहे?:मीनाक्षी शेषाद्रीसाठी वेडे होते राजकुमार संतोषी, या कारणामुळे डिंपल कपाडियांसोबत झाला होता मीनाक्षी यांचा वाद 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मिस्ट्रेस ऑफ वंडरफुल एक्सप्रेशन्स मीनाक्षी

बॉलिवूडमधील अभिनेत्री मीनाक्षी यांनी पडद्यावर कमालीचे नृत्य केले आहे. त्यांचा अभिनय आणि सौंदर्यदेखील असे होते की, त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षीच मिस इंडियाचा किताब जिंकला होता. ‘दामिनी’ आणि ‘स्वाती’ सारख्या चित्रपटांमधून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आणि सिद्ध केले की, हे फक्त आणि फक्त त्याच करू शकतात...

मीनाक्षी याचे खरे नाव शशीकला शेषाद्री आहे. त्यांचा जन्म झारखंड येथील सिंदरीमधील एका तामिळ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा एक स्वत:चा कारखाना होता. शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे मन नृत्यात रमले. मीनाक्षी या भरतनाट्यम, कुचीपडी, कथ्थक आणि ओडिसी या चार प्रकारच्या भारतीय शास्त्रीय नृत्यात पारंगत आहेत. त्यांनी नृत्याचे प्रशिक्षण पद्मभूषण वेम्पती चिन्ना सत्यम आणि गुरू जय रामा रावा यांच्याकडून घेतले होते. हे दोघेही कुचीपुडीतील जगप्रसिद्ध उस्ताद आहेत. नृत्याचे प्रशिक्षण घेत असतानाच मीनाक्षी यांनी 1981 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. वयाच्या 17 व्या वर्षीच त्यांनी हा किताब जिंकला. त्या काळात सौंदर्य स्पर्धा जिंकली की चित्रपटात काम मिळेल असे नव्हते. म्हणून मीनाक्षी यांचा नृत्याचा सराव सुरूच होता. ज्यावेळी बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केले त्यावेळी शशीकला नावाच्या एक अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांना पडद्याावर आपले नाव बदलावे लागले. मीनाक्षी शेषाद्री यांनी वयाच्या 18 व्या वर्षी ‘पेंटर बाबू’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

 • सुभाष घई यांनी दिली होती अभिनयाची संधी

‘पेंटर बाबू’ चित्रपट अयशस्वी झाल्यामुळे मीनाक्षी खूप खचल्या होत्या. त्यांनी पुन्हा नृत्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सुभाष घई यांनी असे करू नको म्हणून सांगितले. आणि आपल्या ‘हीरो’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी घेतले. हा चित्रपट सुपरहिट झाला आिण मीनाक्षी आणि जॅकी श्रॉफ दोघांचे करिअर चमकले. यानंतर त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, रजनीकांत, विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, अनिल कपूर, ऋषी कपूर, सनी देओल यांच्यासोबत कामे केलीत. ‘हिरो’नंतर त्यांचे बरेच चित्रपट आले, ज्यात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. यादरम्यान त्यांचा ‘मेरी जंग’(1985) हा आणखी एक हिट चित्रपट आला.

 • मीनाक्षी शेषाद्रीसाठी वेडे होते राजकुमार संतोषी

राजकुमार संतोषी यांच्या जास्तीत जास्त चित्रपटात मीनाक्षी यांनाच घेतले जात होते. ते मनातल्या मनात मीनाक्षी यांच्यावर प्रेम करायचे हे यामागचे कारण हाेते. ज्यावेळी संतोषी यांनी मीनाक्षीजवळ आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा लोकांना हे रहस्य समजले. परंतु, मीनाक्षीने त्यांना नकार दिला. मीनाक्षी यांचा संतोषीसोबतचा ‘घातक’ हा चित्रपट शेवटचा होता. घायल’च्या चित्रीकरणादरम्यान संतोषी मीनाक्षीवर फिदा झाले होते असे म्हटले जाते. ‘दामिनी’च्या चित्रीकरणादरम्यान संतोषी यांनी मीनाक्षी यांना खूप त्रास दिला होता. ते बरेचदा शॉट ओके झाल्यानंतरही मीनाक्षीकडून पुन्हा शॉट करून घ्यायचे. मीनाक्षी यांनी त्यांना लग्नासाठी नकार दिल्यामुळे ते असे करायचे. नंतर ज्यावेळी मीनाक्षी यांना ‘घातक’च्या चित्रीकरणादरम्यान संतोषी यांनी खूप त्रास दिल्यामुळे त्यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाला कायमचा रामराम ठोकला.

 • कुमार सानूसोबत अफेअरची होती चर्चा

मीनाक्षी आणि गायक कुमार सानू यांच्या अफेअरची खूप चर्चा होती. या अफेअरच्या वृत्तामुळे कुमार सानू यांच्या पत्नीने त्यांना घटस्फोट देण्याचा विचारही केला होता, असे म्हटले जाते. कुमार सानू आणि मीनाक्षी यांची पहिली भेट महेश भट यांच्या ‘जुर्म’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात कुमार सानू यांनी ‘जब कोई बात बिगड जाए’ हे गाणे गायले होते. या दोघांच्या अफेअरबाबत सानू यांच्या पहिल्या पत्नी रीता म्हणाल्या होत्या की, सानू यांच्या बऱ्याच गर्लफ्रेंड आहेत, त्यातील एक मीनाक्षी शेषाद्रीदेखील आहे. कुमार सानू यांनी मीनाक्षीमुळे आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता, असेही म्हटले जाते. मात्र, या गोष्टीत कितपत सत्यता आहे हे काही सागंता येणार नाही. 

 • डिंपल कपाडियांसोबत मीनाक्षी यांचा झाला होता वाद

सुरुवातीच्या काळात डिंपल कपाडिया यांची प्रतिमा एक बोल्ड अभिनेत्री अशी होती. तर, मीनाक्षी यांना मिस थंडी असेही म्हटले जायचे. या दोन्हीं अभिनेत्रींमध्ये एकदा खूप वाद झाला होता. गोष्ट अशी होती... 1986 मध्ये मनमोहन देसाई यांचा मुलगा केतन देसाई यांनी अभिताभ बच्चन यांना ‘अल्लारखा’ चित्रपटासाठी साइन केले होते. नंतर अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट सोडला आणि यात जॅकी श्राॅफ यांना घेण्यात आले. अभिनेता बदलल्यामुळे अभिनेत्रीही बदलली गेली. डिंपलऐवजी मीनाक्षी यांना घेण्यात आले होते. ही गोष्ट डिंपल यांना आवडली नाही. डिंपल यांना असे वाटत होते की, मीनाक्षीने जॅकीच्या मैत्रीचा फायदा घेत चित्रपट मिळवला. तर, केतन देसाई यांना चित्रपटात फ्रेश आणि व्हर्जिन फेस घ्यायचा होता म्हणून मीनाक्षी चित्रपटात आल्या. केतन यांनी म्हटलेल्या व्हर्जिन शब्दाचा डिंपल यांनी वेगळा अर्थ काढला होता. यानंतर त्यांनी सांगितले... मी तर विवाहित आहे, परंतु मीनाक्षी एवढ्या चित्रपटात काम केल्यानंतरही व्हर्जिन अाहे, तर ही आश्चर्याची गोष्ट आहे.

 • 104 डिग्री ताप असतानाही मीनाक्षी यांनी पावसात केले होते चित्रीकरण

सुभाष घई ज्यावेळी ‘हिरो’ चित्रपट बनवत होते त्यावेळी ते अगोदर जॅकी सोबत मुनमुन सेन यांना घेणार होते. परंतु, त्यांनी नकार दिल्यामुळे सुभाष यांनी मीनाक्षी यांना चित्रपटात घेतले होते. याच चित्रपटातील ‘निंदिया से जागी बहार’या गाण्याचे चित्रीकरण ऊटीमध्ये होणार होते. तेथे खूप थंडी होती. त्याच दिवशी मीनाक्षी यांना 104 डिग्री ताप होता. त्यांना पहाटे 4 वाजता चित्रीकरणासाठी बोलावले तर त्या लगेच तयार झाल्या. या गाण्यात त्यांना झऱ्यात भिजत असल्याचे दृश्य चित्रीत करायचे होते. मात्र, घई यांना ज्यावेळी त्यांच्या तापाबाबत समजले तर ते चित्रीकरण करण्यास तयार झाले नाहीत. परंतु, मीनाक्षी यांनी सहमती दिली. या गाण्याच्या चित्रीकरणानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.

 • करिअरच्या पीक पाॅइंटला सोडली होती इंडस्ट्री

मीनाक्षी यांचे करिअर खूप चांगले सुरू होते. 1996 मध्ये सनी देओल सोबतचा ‘घातक’ सुपरहिट झाला हाेता. हा चित्रपट त्या वर्षीचा टॉप कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. सनी देओल सोबत पुन्हा एकदा मीनाक्षीच्या अभिनयाचे कौतुक केले गेले, परंतु हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. तसे पाहिले तर मीनाक्षी यांनी अगोदरच चित्रपटातून संन्यास घेण्याचा विचार केला होता. 1995 मध्ये त्यांनी अमेिरकेत वास्तव्यास असलेला एक गुंतवणूदार हरीश मैसूर यांच्याशी लग्न केले होते. यादरम्यान त्यांचे नाव चित्रपट इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांशी जोडले जात होते, मीनाक्षी यांनी लग्न करून या सर्व अफवांना ब्रेक लावून टाकला.

पुरस्कार आणि कामगिरी

 • 1986 मध्ये ‘स्वाती’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा लक्स अवॉर्ड मिळाला.
 • 1991 मध्ये ‘जुर्म’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर नामांकन मिळाले.
 • 1994 मध्ये ‘दामिनी’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर नामांकन मिळाले.
 • 1993 मध्ये ‘दामिनी’ चित्रपटासाठी स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्डने सन्मानित केले गेले.
 • 1993 मध्ये ‘आपाबंधावुडु’साठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आंध्र प्रदेश स्टेट अवॉर्ड मिळाला.
बातम्या आणखी आहेत...