आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील:द फेस ऑफ इंडियन पॅरलल सिनेमा... सावळी, सलोनी...स्मिता; वाचा ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखल्या जाणा-या स्मिताविषयीच्या खास गोष्टी 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • बेनेगल पाहताक्षणीच म्हणाले होेते, ही मुलगी ‘हिरोइन मटेरिअल’ आहे

बॉलिवूडमधील ती सुंदर महिला जिचे डोळेच सर्वकाही सांगायचे, आपल्या मनातील कोणतीही गोष्ट स्पष्टपणे सांगण्यास मागेपुढे न पाहणारी इतकी ती बोल्ड आणि बिनधास्त होती. कामाप्रति समर्पण असे होते की, पात्राच्या आत्म्यात एकरूप होत होती. कला चित्रपटांपासून ते मसाला चित्रपटांपर्यंत प्रत्येक ठिकाणी तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. आज भारतीय चित्रपटात ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळख असणाऱ्या या अभिनेत्रीबाबत जाणून घेऊया...

स्मिता पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले होते. स्मिता या राजकीय कुटुंबातील होत्या. त्याचे वडील शिवाजीराव पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, तर आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या. स्मिता यांनी ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’, पुणे येेथून ग्रॅज्युएशन केले होते. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्मिता यांनी दूरदर्शनवर वृत्त निवेदका म्हणून काम केले. हे काम त्यांना कसे मिळाले यामागेही एक गोष्ट आहे. ती अशी- एक दिवस स्मिता यांची बहीण अनिता यांचे काही मित्र पुण्यात आले होते. ज्यात पुणे दूरदर्शनची प्रसिद्ध वृत्त निवेदिका ज्योत्स्ना किरपेकर यादेखील होत्या. त्यांचेच एक मित्र दीपक किरपेकर यांना फोटोग्राफीचा छंद होता आणि ही घरातली मॉडेल आहे असे म्हणून ते स्मिता यांचे खूप फोटो काढायचे. अनिताच्या मित्र-मैत्रिणींनी ठरवले की, स्मिता यांचे फोटो ज्योत्स्नाला दाखवायचे. एक दिवस कॉलेज संपल्यानंतर सर्वांनी दूरदर्शन ऑफिसला जायचे ठरवले. सर्व तेथे पोहचले. दूरदर्शन कार्यालयात एक समतल जागा होती तेथे स्मिता यांचे फोटो पसरवले. त्याचवेळी मुंबई दूरदर्शनचे दिग्दर्शक पी. व्ही. कृष्णमूर्ती तेथून जात होते. त्यांचे लक्ष स्मिता यांच्या फोटोंकडे गेले. त्यांनी विचारले, ही मुलगी कोण आहे, मला तिचे आॅडिशन घ्यायचे आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर स्मिताला ऑडिशनसाठी तयार करण्यात आले. नंतर ऑडिशन झाले आणि स्मिता यांची वृत्तनिवेदिका म्हणून निवड झाली. 

 • मृत चिमणीसाठी बनवली कापसाची गादी

स्मिता लहानपणापासूनच खूप प्रेमळ आणि दयाळू होत्या. त्यांची आई विद्या त्यांना प्रेममई म्हणायच्या स्मिता 7 वर्षांच्या असताना त्यांना एक मृत चिमणी सापडली होती. त्यांनी तिच्यासाठी कापसाची गादी तयार केली होती, आणि खूप रडल्या हाेत्या आणि उदास मनाने तिला दफन केले होते. त्या नेहमी गल्लीतील कुत्र्यांना चहामध्ये बिस्कीट बुडवून खाऊ घालत होत्या.

 • बेनेगल पाहताक्षणीच म्हणाले होेते, ही मुलगी ‘हिरोइन मटेरिअल’ आहे

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक श्याम बेनेगल त्यावेळी ‘चरणदास चोर’ (1975) चित्रपट बनवण्याची तयारी करत होते. एक दिवस बेनेगल यांनी स्मिता यांना दूरदर्शनवर बातम्या देताना पाहिले. त्यानंतर त्यांनी स्मिता यांची भेट घेतली आणि निश्चय केला की, त्यांना चित्रपटात घ्यायचे. बेनेगल म्हणाले होते की, मी स्मिताला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच समजले की ही पडद्यावर खूप गाजेल. ती हिरोइन मटेरिअल आहे.

 • राज बब्बर सोबत राहिल्यात लिव्ह इन मध्ये आणि नंतर केले लग्न

‘भीगी पल्के' चित्रपटाच्या सेटवर राज स्मिताला भेटले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. राज आधीपासूनच विवाहित होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. यामुळे स्मिता यांच्यावर खूप टीका झाली होती. त्यांची आईदेखील या नात्यामुळे नाराज होती, त्यांचे म्हणणे होते की, स्मिता कशी काय दुसऱ्या स्त्रीचे घर तोडू शकते. स्मिता, राज यांच्या प्रेमात वेड्या हाेत्या‌. त्यांनी कुणाचेच ऐकले नाही आणि राज बब्बर यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. स्मितासाठी त्यांची आईच राेल मॉडेल होती. त्यांच्या आयुष्यात आईच्या निर्णयाचे खूप महत्त्व होते. परंतु त्यांनी आईचे न ऐकता राज यांच्याशी नाते जोडल्यामुळे आईचे आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला. दोघांची साथ जास्त दिवस राहिली नाही. कारण मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर स्मिता यांना ब्रेन इंफेक्शन झाले आणि एक दिवस ऑर्गन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.

 • सोबत काम करत असतानाही शबाना आझमीसोबत सुरू होता व्यावसायिक वाद

स्मितासोबत आर्ट चित्रपटात शबाना आझमी यादेखील असायच्या. स्मिता आणि शबाना 80 च्या दशकातील कट्टर प्रतिस्पर्धी होत्या. बरेच चित्रपट दोघींनी एकत्र केलेत, परंतु त्यांच्यातील तणाव तसाच राहिला. चित्र असे होते की, एक वर्ष स्मिता यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळायचा, तर दुसऱ्या वर्षी शबाना यांना पुरस्कार मिळायचा. शबाना यांनी एकदा सांगितले होते की, आम्ही चित्रटातील खूप चांगल्या पार्टनर आहोत, परंतु कधीच मैत्रिणी होऊ शकलो नाही. मी तिच्याबाबत एक कठोर टीका केली होती, परंतु त्याची मला नेहमीच खंत वाटते.

 • घटनेमुळे दीपकला मानले भाऊ

स्मिता लहानपणी जितक्या लाजाळू होत्या तेवढ्यात मोठ्या झाल्यावर बोल्ड होत गेल्या‌. त्या चित्रीकरणासाठी एकट्याच जायच्या. मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी त्यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला होता. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान स्मिता यांना मेकअपची गरज होती तर त्या मला म्हणाल्या, हे पाहा, माझी एवढी ताकद नाही की, मी तुम्हाला पैसे देऊ शकेल. मला एक किट बनवून द्या. माझा मेकअप मी स्वत:च करत जाईल. त्यावेळी ही किट मी त्यांना दिली होती. जी त्या नेहमी सोबत ठेवायच्या. त्या नेहमी चित्रीकरणासाठी एकट्याच जायच्या. एकदा त्या जंगलाच्या दिशेने जात होत्या मला त्यांची काळजी वाटली तर मीदेखील त्यांच्या मागे-मागे गेलो. नंतर मी त्यांना एकटीच अशी कशी कुठेही निघून जातेस म्हणून रागावले. तर त्या म्हणाल्या, मला माहीत होते की, माझ्या भावाचे माझ्याकडे लक्ष आहे. म्हणून मी बिनधास्त गेले. त्या दिवशी त्या मला भाऊ म्हणाल्या आणि तेव्हापासून आमचे बहीण-भावाचे नाते निर्माण झाले. मीच त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. जी त्यांनी मला सांगितली होती की, माझ्या मृत्यूनंतर सुवासिनींप्रमाणे माझा मेकअप कर. त्यांच्या मृत्यूनंतर मी त्यांना जी किट दिली होती त्यातूनच त्यांचा मेकअप केला.

पुरस्कार आणि कामगिरी

 • 1977 मध्ये ‘भूमिका' चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
 • 1980 मध्ये ‘चक्र' चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
 • 1982 पुन्हा “चक्र'साठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
 • 1985 मध्ये स्मिता यांना पद्मश्री पुरस्काराचा सन्मान मिळाला
 • 1986 मध्ये प्रियदर्शिनी अकॅडमी द्वारे स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्डची सुरुवात.
 • 2013 मध्ये चित्रपटाला 100 वर्षे पूर्ण झाली म्हणून भारतीय टपाल विभागाद्वारे एक पोस्टाचे तिकीट काढले.
बातम्या आणखी आहेत...