आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील:ट्रॅजिडी किंगची डबल ट्रीट 'राम और श्याम', वैजयंती माला-माला सिन्हाची लागली होती वर्णी पण नंतर झाली मुमताज-वहिदा रहमानची एन्ट्री   

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1967 मध्ये 'उपकार’ नंतर सर्वात कमाई करणारा चित्रपट
  • 1968 मध्ये दिलीप कुमार यांना या चित्रपटासाठी उत्कृष्ट फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला.
  • 1972 मध्ये 'राम और श्याम'ला रशियातही 1,160 प्रिंट्ससह प्रदर्शित करण्यात आले होते. 33.4 दक्षलक्ष तिकिटे विकली गेली होती.

आज आपण 1967 मध्ये आलेल्या चित्रपटाविषयी बोलुया. यात दिलीप कुमार यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटाने देशातच नव्हे तर विदेशातही प्रचंड कमाई केली होती. विदेशातील लोकांनाही हा चित्रपट आवडला होता. पहिल्यांदाच जुळ्या भावांच्या एकमेकांपासून वेगळे होण्याच्या कथेवर हा चित्रपट बनवण्यात आला होता.

'राम और श्याम' हा चित्रपट जुळ्या भावांवर आधाारित आहे. त्यातील एक साधा-भोळा असतो तर दुसरा हुशार असतो. असो, चित्रपटात राम आणि श्याम बालपणीच वेगळे होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मोठे होतात. जो सरळ असतो तो आपल्या मेहुण्याकडून गजेंद्र (प्राण) रोज मार खातो. गजेंद्र एक प्लान करतो, तो त्याचे लग्न एक श्रीमंत मुलगी अंजना (वहीदा रहमान) सोबत करू इच्छित असतो. कारण तिच्या वडिलाकडून तो जास्त हुंडा घेऊ इच्छित असतो. मात्र अंजना रामला पहिल्याच भेटीत रिजेक्ट करुन टाकते. त्यानंतर त्याची प्रॉपर्टी घेण्यासाठी गजेंद्र रामला मारण्याची योजना आखतो. एक दिवस राम घरातून शहराकडे पळून जातो. तेथे त्याची भेट शांतासोबत (मुमताज) होते. ती जुळ्या भावाची मैत्रीण असते. दुसरीकडे श्यामदेखील आपल्या सांभाळ करणाऱ्या आईला भांडून घर सोडून जातो. तो अंजनाला भेटतो. चेहरा सारखाच असल्यामुळे दोघे एकमेकांच्या घरी जातात. श्याम गावाकडे जाऊन गजेंद्रला धडा शिकवतो. एक दिवस गजेंद्र राम आणि शांताला किडनॅप करुन रामाच्या खुनाचा आरोप श्यामवर लावत त्याला अटक करण्याचे सांगतो. अंजना आणि तिच्या वडिलांना राम आणि श्याम दोघे भाऊ असल्याचे कळते. इकडे श्याम तुरुंगातून पळून जातो आणि गजेंद्रच्या तावडीतून राम आणि शांताला सोडवतो. लढाई होते, शेवटी दोघे भाऊ आपल्या बहिणीसाठी मेहुण्याला माफ करतात आणि चित्रपटाचा शेवट गोड होतो.

  • 1967 मध्ये सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरला, नंतर आले अनेक रिमेक

'राम और श्याम’ हा चित्रपट दिलीप कुमार यांच्या सुपरहिट चित्रपटापैकी एक आहे. यात दिलीप साहेबांनी दुहेरी भूमिका साकारली होती. अनेक चित्रपटात गंभीर भूमिका केल्यानंतर 'राम और श्याम’च्या माध्यमातून दिलीप साहेबांनी कॉमेडीमध्येही आपले कौशल्य दाखवले. हा चित्रपट 1964 मध्ये आलेल्या तेलुगू चित्रपट 'रामुडू भीमुडू’चा हिंदी रिमेक होता. हा चित्रपट 1967 मधील सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरला होता. सोव्हिएत युनियनमध्येही त्याचे कौतुक झाले होते. चित्रपटात वैजयंती माला आणि माला सिन्हा यांना घेण्यात आले होते. मात्र त्यांच्या जागी मुमताज आणि वहिदा रहमान मुख्य भूमिकेत दिसल्या. नंतर याच थीमवर 1972 मध्ये 'सीता और गीता’, 1989 मध्ये 'चालबाज आणि 1990 मध्ये 'किशन कन्हैया’ आला. हे सर्वच चित्रपट हिट ठरले.

  • कानातल्या झुमक्यासाठी नाराज झाल्या हाेत्या वैजयंतीमाला

चित्रपटाच्या सुरुवातीलाच वाद झाला हाेता. झाले असे की, वैजयंतीमाला यांनी कानाच्या झुमक्याचा सेट पसंत करून ठेवला हाेता. मात्र दिग्दर्शक तापी चाणक्यच्या असिस्टंटने तो दुसऱ्याला देऊन टाकला. त्यामुळे वैजयंतीमाला भडकल्या. त्यानंतर तुमच्या या वागण्यामुळे तुम्हाला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. मात्र दिलीप कुमार यांनी आपल्याला काढले, असा गैरसमज वैजयंती यांना झाला. दिलीप कुमारनेच माझ्या जागी वहिदा रहमान यांना घेतल्याचे त्यांना वाटले.

  • माला यांच्या निर्णयामुळे दिलीप साहेबांसोबत काम करण्याची संधी गमावली

आधी या चित्रपटात माला सिन्हा यांना घेण्यात येणार होते. मात्र नंतर ही भूमिका मुमताज यांना देण्यात आली. खरं तर चित्रपटात अभिनेत्रीच्या निवडीदरम्यान माला यांना चित्रपटात शांताची भूमिका देण्यात येत होती. मात्र माला खुश नव्हत्या. माला यांना वहिदा रहमान यांची भूमिका हवी होती. माला यांनी हा चित्रपट केला असता तर दिलीप कुमारसोबत पहिला चित्रपट असता. खरं तर दिलीप साहेबांसोबत चित्रपट करण्याची माला यांची मनापासून इच्छा होती.

  • सायरा बानोच्या नावावर झाला होता विचार पण दिलीप साहेबांनी दिला होता नकार

हा चित्रपट पूर्ण करण्याआधी दिलीप कुमार यांनी सायरा बानोसोबत लग्न केले होते. विशेष म्हणजे चित्रपट सुरू करण्याआधी निर्मात्यांनी दिलीप कुमार यांना सायरा बानोला घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र िदलीप साहेबांनी सांगितले, मी सायराला घेण्याच्या विचारात नाही. आपल्याला मॅच्योर हिरोइन हवी आहे, मात्र सायराच्या चेहऱ्यावर निरागसता दिसून येते. त्यानंतर दिलीप साहेबांच्या सांगण्यावरुन मुमताजला घेण्यात आले.

  • प्राण यांनी शेवटपर्यंत सोडली नाही दिलीप साहेबांची साथ

दिलीप कुमार आणि प्राण साहेबांनी अनेक चित्रपटात काम केले होते. 'राम और श्याम’ मध्येदेखील त्यांच्या पात्रासोबत प्राणची लढाई होते. शूटिंगनंतर ते एकमेकांसोबत बसून गप्पा मारत असत. प्राण साहेब दिलीप कुमार यांचा पाठलाग करणे सोडत नाही, असे मद्रासमध्ये फेमस झाले होते. दोन्ही कलाकार एकमेकांचा सन्मानदेखील करत. चित्रपटात दोघांचे काही विनोदी सीनदेखील होते सरावादरम्यान दोघेही सीनचा आनंद घेत असत. दिलीप कुमार यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी प्राण साहेब खराब हवामानातही श्रीनगरमधून विमानाने आले होते.

  • दिलीप साहेबांसाठी तर खूप महत्त्वाचा होता हा चित्रपट

दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मकथेत 'राम और श्याम’च्या शूटिंगचा उल्लेख केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगआधी वहिदासोबत त्यांनी 'आदमी’चे शूटिंग केले होते. या चित्रपटाचे डबिंग आणि एडिटिंग सुरु असतानाच दिलीप साहेब 'राम और श्याम’चेदेखील डबिंग करत होते. दोन्ही चित्रपटासाठी ते मेहनत घेत होते. दिलीप साहेबांसाठी “राम और श्याम’ खूपच महत्त्वाचा चित्रपट होता आणि त्याचे यशही. चित्रपटात काही चूक होऊ नये यासाठी ते पूर्ण युनिटसोबत बोलत असत.

बातम्या आणखी आहेत...