आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य याचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. किडनी निकामी झाल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली. आदित्य हा संगीतकार आणि अरेंजर होता. 2019 मध्ये आलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटातील 'साहेब तू' हे गाणे त्याने संगीतबद्ध केले होते. हा चित्रपट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असून यात नवाजुद्दीन सिद्दीकीने मुख्य भूमिका साकारली होती.
4 ऑगस्ट रोजी शेअर केला होता फॅमिली फोटो
आदित्य 19 ऑगस्टपर्यंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. 19 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त त्याने स्वत: कंपोज केलेल्या गणेश वंदनाबद्दल माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती. आदित्यने आपल्या प्रोजेक्टशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करत असते. पण मृत्यूच्या 38 दिवस आधी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी त्याने एक फॅमिली फोटो शेअर केला होता.
या फोटोमध्ये आदित्य त्याची आई अनुराधा, वडील अरुण, बहीण कवितासोबत दिसला होता. आदित्यने फोटोसह कॅप्शन दिले- होप म्हणजे आशा.
आदित्य त्याचे वडील दिवंगत अरुण पौडवाल यांना खूप मिस करायचा. 1 नोव्हेंबर 1991 रोजी एका अपघातात अरुण पौडवाल यांचे निधन झाले होते, त्यावेळी आदित्य फक्त 6 वर्षांचा होता. अरुण स्वतः एक संगीतकार होते. ते सचिन देव बर्मन यांच्यासोबत संगीत सहाय्यक म्हणून काम करायचे.
View this post on InstagramA post shared by Aditya Paudwal (@adityapaudwal) on Mar 16, 2020 at 10:32pm PDT
एका मुलाखतीत, जेव्हा आदित्यला विचारले गेले होते की, त्याची आई अनुराधा पौडवाल यांनी दिल है की मानता नहीं, मुझे नींद ना आए यासारखी शेकडो हिट गाणी बॉलिवूडला दिली, मात्र नंतर त्या भजन गायनकडे वळल्या. यावर आदित्य म्हणाला होता की, "आईने भक्ती संगीतात मोठे स्थान मिळवले आहे. अजूनही त्यांचा आवाज ऐकून लोक मंत्रमुग्ध होतात. त्यांनी स्वरबद्ध केलेल्या आरती आणि मंत्रांनी मी ब-याच लोकांचे जीवन बदलताना पाहिले आहे, त्यामुळे त्यांचे बॉलिवूड गाणे मी मिस करत नाही.
अनुराधा पौडवाल यांच्याविषयी सांगायचे म्हणजे त्यांनी 1973 मध्ये आलेल्या अमिताभ आणि जया बच्चन स्टारर 'अभिमान' या चित्रपटाद्वारे आपल्या सिंगिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांनी काही संस्कृत श्लोक गायले, त्यानंतर त्यांचे नशीब चमकले आणि बर्याच चित्रपटांमध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली. बॉलिवूड आणि हिंदी भजनांव्यतिरिक्त अनुराधा यांनी पंजाबी, बंगाली, मराठी, तामिळ, तेलुगू, उडिया आणि नेपाळी भाषांमध्येही गाणी गायली आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.