आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग:सयामी खेरसह अवघ्या 5 दिवसांत केले 'अनपॉज्ड' या चित्रपटाचे चित्रीकरण, अभिनेता गुलशन देवैया म्हणाला - 'झूम कॉलवर करायचो वर्कशॉप'

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तांत्रिकदृष्ट्या याला अँथोलॉजी म्हणतात. म्हणजेच पाच लघुपटांचा संग्रह.

अ‍ॅमेझॉन प्राइमने गुरुवारी पाच शॉर्ट फिल्मचे कलेक्शन असलेल्या अनपॉज्डचा टीजर रिलीज केला. यातील एका शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन 'द फॅमिली मॅन' फेम राज आणि डीके यांनी केले असून यात गुलशन देवैया आणि सयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत. या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण अवघ्या पाच दिवसांत पूर्ण करण्यात आले. भास्करसोबतच्या खास बातचीतमध्ये गुलशनने या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित मनोरंजक किस्से शेअर केले आहेत.

गुलशन म्हणाला, "तांत्रिकदृष्ट्या याला अँथोलॉजी म्हणतात. म्हणजेच पाच लघुपटांचा संग्रह. प्रत्येक चित्रपट बहुधा अर्धा तासाचा असेल. मी पाच दिवसांत सयामी बरोबरच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. आम्ही सप्टेंबरमध्ये याचे चित्रीकरण केले. हा अनलॉकचा पहिला टप्पा होता, तेव्हा आम्ही अचानक चित्रपटावरचे काम सुरु केले होते."

  • चित्रीकरणावर येता-जाता व्हायची कोविड 19 टेस्ट

गुलशन पुढे सांगतो, "सेटवरील वातावरण पूर्णपणे बदलले होते. क्रू मेंबर्स अतिशय कमी होते. या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सयमीबरोबर पहिल्यांदा काम करत आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर एक प्रेमकथा आहे. शूटच्या आधी आणि नंतर आमच्या सर्वांची कोविड 19 ची चाचणी होत असे. जे ऑफिसमध्ये काम करत होते, त्यांची दर आठवड्याला टेस्ट होत होती. पाच दिवसांचा इन्क्यूबेशन कालावधी असतो. त्यानुसार देखील चाचणी घेण्यात आली. शूट संपल्यानंतरही पाच दिवस कोविड 19 चा रिपोर्ट येण्याची प्रतीक्षा करावी लागली. ते यासाठी की इन्क्यूबेशन पीरियड फॉलो करावा लागतो."

  • शॉर्ट फिल्मचे शूटिंग पूर्ण सुरक्षेसह करण्यात आले

येथे बायो-बबलचे अनुसरण केले गेले नाही. कारण त्या फॉर्मेटमध्ये सेट आणि मुक्कामाचे ठिकाण पूर्णपणे माहिती आणि नियंत्रणात असते. येथे असे नव्हते. सेटवरून लोक त्यांच्या घरी जात असत. तथापि, आम्ही शूटिंग अतिशय सुरक्षितपणे केले. कुणालाही सेटवर कोरोनाची लागण झाली नाही, असे गुलशन देवैयाने स्पष्ट केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser