आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अनपॉज्ड: नया सफर':हृदयस्पर्शी, आशा आणि विजयाची कहाणी सांगणाऱ्या अँथॉलॉजी 21 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला, नागराज मंजुळे दिग्दर्शित 'वैकुंठ' लघुपटाचा समावेश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड- 19 महामारीमुळे आपलं जीवन कशाप्रकारे बदललं आहे याची झलक पाहायला मिळेल. यात प्रेम, आठवण, भीती, मैत्री अशा वेगवेगळ्या मानवी भावनांचे शब्दचित्रण दाखवले जाणार आहे.

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज 'अनपॉज्ड- नया सफर' या अँथॉलॉजीच्या 21 जानेवारी पासून जगभरातील 240 देशांत प्रीमियर होणार असल्याचे जाहीर केले. 202 मध्ये आलेल्या अनपॉज्डच्या पहिल्या सीझनला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर या अँथॉलॉजीच्या सिक्वेलमध्ये पाच हिंदी शॉर्ट फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. या फिल्म्समधून महामारीमुळे आपल्या सगळ्यांसमोर उभी राहिलेली आव्हाने, आपल्याशा वाटणाऱ्या समस्या दाखवण्यात आल्या असून त्याचबरोबर नव्या वर्षाचे स्वागत करत असताना कशाप्रकारे सकारात्मक वृत्तीचा स्वीकार करायला हवा हे सांगण्यात आले आहे.

दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला 'अनपॉज्ड- नया सफर' आपल्याला काळोख्या रात्रींनंतर येणाऱ्या पहाटेच्या प्रकाशाची जाणीव करून देतो. प्रेम आणि सकारात्मकतेनं परिपूर्ण असलेली ही अँथॉलॉजी आपल्या नव्या वर्षाच्या सुरुवातीसह नव्या प्रारंभाचा स्वीकार करण्याची विनंती करते. या अँथॉलॉजीमध्ये पुढील शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे.

  • तीन तिगाडा – रूचित अरूण दिग्दर्शित – सकीब सालेम, आशिष वर्मा आणि सॅम मोहन यांच्या मुख्य भूमिका
  • द कपल – नुपूर अस्थाना दिग्दर्शित – श्रेया धन्वंतरी आणि प्रियांशी पेन्युली यांच्या मुख्य भूमिका गोंद के लड्डू – शिखा मकान दिग्दर्शित – दर्शना राजेंद्रन, अक्षवीर सिंग सरन आणि नीना कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका
  • वॉर रूम – दिग्दर्शित अयप्पा केएम – गीतांजली कुलकर्णी, रसिका अगाशे, पुरानंद वांधेकर आणि शर्वरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका
  • वैकुंठ – नागराज मंजुळे दिग्दर्शित - अर्जुन करचे, हनुमंत भंडारी यांच्या मुख्य भूमिका

अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या इंडिया ओरिजनल्स विभागाच्या प्रमुख अर्पणा पुरोहित म्हणाल्या, ‘सध्याच्या आव्हानात्मक काळात आशा, सकारात्मकता आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टींचा हृदयस्पर्शी संग्रह असलेल्या अनपॉज्ड- नया सफरसह या वर्षातल्या ओरिजनल्सची सुरुवात करणं खूप खास आहे. ही सीरिज देशातील स्वतंत्र आणि खिळवून ठेवणाऱ्या सिनेमाविषयक गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देण्याची आमची बांधिलकी परत अधोरेखित करणारी आहे.’

बातम्या आणखी आहेत...